व्रतविधिः – आश्विन शु. ७ दिवशीं या ब्रतिकांनीं एकमुक्ति करावी आणि ८ दिवशीं प्रातःकाळों शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावींत. सर्वपूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावे. चैत्यालयांस तीन प्रदक्षिणा घालून ईयर्यापथशुद्धि- पूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर सुनिसुव्रत तोर्थकर प्रतिमा वरुणयक्ष बहुरूपिणी यक्षीसह स्थापून तिला पंचामृता- भिषेक करावा. शृंगारलेल्या मंडपांत देवापुढे शुद्धमूमीवर पंचवर्णानीं अष्टदलयंत्र पंचमंडलासह काढून मध्यभागीं सुशोभित कुंभ ठेवावा. दळा- मोंवतीं अष्टमंगलद्रव्ये व फलश ठेवावेत. एका ताटांत आठ पार्ने अक्षता, फुले, फले वगैरे लावून तो ताट मध्यकुंभावर ठेवावा. नित्यपूजाक्रम करून जीवदयाष्टमीव्रतपूजाविधान वाचावे. त्याममाणें सर्व अर्चना करावी. ॐ हीं अई श्रीं क्लीं ऐं अई मुनिसुव्रततीर्थकराय वरु- णयक्षबहुरूपिणीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ सुगंधी पुष्पें घालावीत. याच क्रमाने चार प्रहरी (नारक झांव) पूजा विधान करावे. मग श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा.
ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत आठ पाने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महाय करून त्याने ओवाळीव मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशीं ब्रह्मचर्यपूर्वक उपवास करावा. रात्री धर्मध्यानपूर्वक जागरण करावे. दुसरे दिवशीं जिनपूजा पंचपकान्नाचे आठ चरु करावेत. चतुःसंघास आहारादि दाने देऊन पारणे करावे.
या प्रमाणे है व्रत आठ वर्षे ८ करून अंतीं याचे उद्यापन करावे. त्यासमयीं श्री मुनिसुव्रत तीर्थकर प्रतिमा वरुणयक्ष आणि बहुरूपिणी यक्षीसहित नूतन करवून तिची पंचकल्याणविधिपूर्वक प्रतिष्ठा करावी. आठ मुनिगणांस आहारादि दाने द्यावींत.
• तसेच आर्यिकांनाहि द्यावें. आठ दंपतींना भोजन करवून त्यांचा शेला, पागोटे, लुगडे, खण, नारळ, डोरले, जोडवी, सर, पुतळ्या, नथ, बुगड्या वगैरे अलंकारांनीं सन्मान करावा. गृहस्थाचार्यांना वस्त्रालंकारांनीं विभूषित करून सुवर्ण दक्षिणा द्यावी. असा या व्रताचा पूर्ण विवि आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील मरतक्षेत्रामध्ये आर्या खंड आहे. त्यांत अवंति नांवांचा एक विशाल देश असून त्यामध्ये उज्जयनी नामक एक मनो- हर नगर आहे. तेथे पूर्वी यशोधन नामें मोठा पराक्रमी, धर्मनिष्ठ, गुण- शाली असा राजा राज्य करीत असे. त्याला चंद्रमती नांवाची एक रूपवती, सौंदर्यवती, गुणशालिनी अशी पट्टराणी होती. त्यांना यशो- घर नामक एक गुणवान् पुत्र होता. त्याला अमृतमति नांवाची सौंदर्य- वत्ती, रूपशालिनी अशी स्त्री होती. त्यांना यशोमती नांवचा एक सुंदर पुत्र होता. या सर्व परिवारासह तो यशोधन राजा सुखानें राज्यै- श्वर्य भोगीत होता.एके दिवशीं या क्षणिक संसाराविषयीं त्याच्या मनांत प्रबल वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे तो यशोधन राजा आपल्या यशोधर नामक पुत्रास राज्यभार देऊन वनांत गेला. तेथे एका निमैथ मुनींश्वराजवळ जिनदीक्षा ग्रहण करून तपश्चरण करूं लागला.
इकडे तो यशोधर राजा मोठ्या आनंदानें राज्यसुखाचा अनुमत्र घेऊं लागला. एके दिवशीं तो आपल्या पत्नीसह शय्यागृहांत निजला असतां, पातःकाळच्या समर्थी हत्तीच्या महागोंठ्यांत मधुर स्वराने कोणी मंजुळ गायन करीत आहे, असे त्या अमृतमती राणीच्या कर्णी पडले, मग ती उठून आपल्या गुणवती नामें दासीस बोलावून म्हणते कीं, हे दासी ! आपल्या त्या हत्तीच्या गोठ्यांत जाऊन तेथे गायन करीत असलेल्या पुरुषांस बोलावून आण. नंतर ती दासी त्या गोठ्यांत जाऊन पाहूं लागली, तोंच तेथे एक अत्यंत कुरूप, कुब्ज, कृष्ण यमासारखा पुरुष बसलेला दिसून आला. मग ती आपल्या राणीजवळ येऊन म्हणते, हे महाराज्ञो ! तुझा प्राणपत्ति प्रत्यक्ष देवेंद्रासमान आहे. आणि तो गायन करणारा मनुष्य अत्यंत काळाकिट्ट, विद्रूप असून पाहतांच कांहीं नाही. उलट किळस येतो. तेव्हां राणी म्हणते, जो आपणांस प्रिय वाटतो, तो कामदेवच समजावयाचा, असें म्हणून ती अमृतमती त्या पुरुषांशी संबंध ठेवून सुखाने राहूं लागलो.
हे तिचे दुष्कृत्य राजांस समजले. मग एके दिवशीं तो रात्रीं आपल्या हातांत खड्ग घेऊन ‘तिचा वध करावा’ या हेतूने त्या गोष्ठासन्निध गेला पण ‘आपण शूर क्षत्रिय पुरुष असून अबला स्त्रीस मारणें है हीन कृत्य आहे. असा विचार करून आपल्या ठिकाणीं परंत येऊन निजला. नंतर त्याला दोन स्वर्भे पडलीं. एक चंद्राची कांति राहूनें आसली. दुसरें सुवर्णपात्रांत कुत्र्यार्ने अन्न खाल्ले. मग तो सकाळीं उठून आपल्या चंद्रमती मातेजवळ जाऊन वरील दोन स्वमें त्याने तिला सांगितली. तेव्हां ती त्याला म्हणते, हे बाळा ही दोन स्वमें तुला अत्यंत कष्टप्रद आहेत. आतां त्या दुष्ट स्वप्नांचा परिहार करण्यासाठीं तूं त्या चंडमारी देवीला सहस्र बकऱ्यांचा बकी दे, हे आपल्या मातेचे निर्दय शब्द ऐकतांच त्याच क्षणीं थर थर बकात आपले दोन्ही हात दोन्ही कानावर ठेवून म्हणाला, हे माते । आमच्या वंशांतील पूर्वज आज पर्यंत श्रीजिनेश्वरांनीं प्रतिपादिलेल्या दयाधर्माचं प्रतिपाकन करून स्वर्गास गेले आहेत. मग है असके घोर दुष्कृत्य तूं काय म्हणून मला सांगतेस !’ मी एक चिंतिले, तर हे दुसरेंच निष्पन्न झालें. स्त्रियांना, बालकांना, अज्ञानी लोकांना, मूर्खाना आणि कुचेष्टकांना स्वप्मादि गोष्टी केव्हांही सांगू नयेत, असे म्हणून तो विचारांत पडला. तेव्हा ती म्हणते, हे बाळा ! असे पशुहिंसा करण्याचे तुझे धैर्य होत नसेल तर राहू दे. करूं नकोस, पण त्या ऐवर्जी तूं गव्हाच्या कणिकेचा कोंबडा चित्रकाराकडून करवून आणवून आश्विन शु. ८ दिनीं त्या चंडमारीस बली देण्यास काय हरकत आहे : हे आपल्या मातेचे वचन ऐकून त्याला बहुतांशी योग्य वाटले. मग त्याने एका चित्रकाराकडून कणिकेचा एक सुंदर कोंबडा तयार करविला. नंतर तो त्या देवीजवळ जाऊन जेव्हां बली देऊ लागला, तेव्हां तो कोंबडा प्रत्यक्ष जिवंत कोंबड्या सारखा ओरडला, ते पाहून हे माझे स्वप्न केवळ नरकाचे दु.खच आहे. असे जाणून तो एकाएकी संसाराविषयीं विरक्त होऊन वनाकडे चालला. हे पाहून त्याची प्राणवल्लमा अमृतमती ही त्याला म्हणते, हे पतिराज ! मागे आपल्या राज्यकारभाराचो व्यवस्था लावून आणि भोजन करून जावें. असे म्हणून ती पाश्गृहांत जाऊन विषमिश्रित स्वयंपाक तयार करविती झाली.
इतक्यांत तो आपश्या यशोमति पुत्रांस पट्टाभिषिक्त करवून भोजन करण्यास गेला. तेव्हां राणीने ते विषमिश्रित अन्न त्याच्या पात्रांत बाढिलें, ते अन्न भक्षण करतांच तो राजा तत्काळ मरण पावला आणि विंध्य पर्वतांत पूर्वीच्या त्या अचेत कुक्कुट हिंसेच्या पातकामुळे मयूर होऊन जन्मला. पुढे त्याची माता चंद्रमती ही मरून त्याचपातकाने तेथे कुत्री होऊन जम्मली, मग परस्पर वैरामुळे ते दोघे मरून क्रमाने अजा व मत्स्य होऊन जन्मले. या प्रमाणे ते सात भवीं उत्पन्न होऊन शेवटीं उज्जयनी नगरांतच एक चंडकमा नामक मातंगाच्या घरी ते दोघे जीव (यशोधरचर व चंद्रमतीचर) कोंचडे होऊन जन्मले, एके दिवशीं त्या यशोमती राजाने त्या चंडकर्माला कांहीं बन
देऊन वश करून घेऊन त्याच्या कोंबड्या सह त्याला बनांत नेले. इतक्यांत तेथे एके ठिकाणीं मद्रसेन नामक महामुनि महाराज असले होते. त्यांच्या समीप जाऊन हे बसले. त्यांच्या मुखे त्यांनी जीवादि तत्त्वांचे स्वरूप यथास्थित ऐकिलें. त्यायोगे त्या कोंबड्याच्या मनांत उपशम भाव उत्पन्न झाला. मग सर्व जन उठून दुसरीकडे वनांत गेले. तेव्हां त्या यशोनती राजानं त्या दोन्ही कोंबड्यावर दुरून बाण मारून त्यांना मारिलें. मग ते दोन्ही कोंबडे भरून त्याच नगरी कुसुममाला नाम स्त्रीच्या पोटीं गुरूपदेशाच्या प्रभावाने अभयरुचि व अभयमति या नांवाचे दोन पुत्र होऊन जन्मले. पुढे तारुण्यावस्थेत आल्यावर सुदत्ताचार्य नामक मुनीश्वरांजवळ जिनदीक्षा घेऊन तप करूं लागले.
तिकडे राजपुर नगरामध्ये मारिदत्त या नांवाचा राजा राज्य करीत होता. त्या नगराच्या बाहेरील उद्यान वनांत एकदां हे सुद- त्ताचार्य आपल्या मुनिसंघासह येऊन उतरले. त्या दिवशीं सुदत्ताचार्य यांचा उपवास होता. म्हणून त्यांनी आपल्या दोघा शिष्यांना (अभय- रुचि व अभयमति) मिक्षेकरितां नगरांत पाठविले. त्यावेळीं मारिदत्त राजानें चंडमारी देवीच्या यात्रेनिमित्त असंख्यात पशुपक्षी गोळा करून त्यांचा बळी देण्यास प्रारंभिळे होते. त्यांना नरयुग्माची आवश्यकता होती. सत्वर नरयुग्म आणण्यास सेवकांना सांगितले होते. सेवर्क शोधित नगरांत गेले. इतक्यांत हे दोघे मुनि त्यांच्या दृष्टीं पडले. तेव्हां राजसेवकांनी त्यांना राजाकडे नेले. त्यावेळीं राजाने त्यांना मारण्यासाठीं खड्ग वरती उगारला. लोक म्हणू लागले कीं; हे
मुनिराज ! तुम्ही या महाराजांना शुभाशीर्वाद द्या. हे शब्द ऐकून ते दोघे मुनि म्हणतात, हे राजन् ! तुम्ही सर्वप्रजाजनांचे पुत्रवत् प्रतिपालन करणारे आणि दयामूळ अशा जिनधर्माचे संरक्षक आहात ना ! इत्यादि सदयवृत्तीचे वचन ऐकतांच राजाला मोठे आश्वर्य वाटून स्यानें आपल्या हातांतील खड्ग खालीं टाकला. नंतर तो विन- योक्तीने त्यांना म्हणाला, – हे महात्म्यांनो ! आपण कोण आहात ? कोणाचे पुत्र आहात ? तरुणावस्थेतच इतके भोगनिस्पृह को शालांत ? हे’ राजाचे उद्गार ऐकून ते मुनीश्वर म्हणाले, हे भूपते ! आमचे ते चरित्र धार्मिक लोकांनाच सांगण्यास योग्य आहे. ते तुमच्या सारख्या मिथ्यामती लोकांना सांगण्यास योग्य नाहीं. तुमची वृत्ती मिथ्यात्वाकडे वळली आहे, तथापि आतां तुमची बुद्धी मोक्षमार्गाभिमुख झाली आहे. त्याकारणाने आमचे चरित्र तुम्हांस यथास्थित सांगावे असे वाटते म्हणू नच ते तुम्हांस सांगतों ऐका – हे राजन् ! येथून मार्गे सातव्या मवीं आम्ही दोघे माता व पुत्र होतो. त्यावेळीं दुःस्वप्नाच्या निवृत्तीकरितां चंडमारी देवीस एक कणीकेचा अचेतन कोंबडा तयार करून बली दिला होता. त्या दुष्कर्मामुळे आम्हांस सात दुःखदयोनीमध्ये जन्म घेऊन भ्रमण करावे लागले, वगैरे रीतीने त्यांनीं आपला सर्व भवप्रपंच त्यांनां निवेदिला. तेव्हां ती चंडमारी देवी त्यांचा तो वृत्तांत ऐकून आश्चर्यचकित होऊन त्यांच्यासमोप येऊन पादा- क्रांत झाली अर्थात् चरणीं नम्र आणि विनयानें आपले हात जोडून त्यांना म्हणाली, हे साधुवर्य ! मी अज्ञानपणामुळे असंख्यांत पशुप- क्ष्यांचा बळी घेतला. इतकेच नव्हे तर आपल्या सारख्या महासाधुवर ही प्रोणांत आघात आणला. या अपराधाबद्दल आपल्याजवळ मी आतां क्षमा मागते. तरी आपण मजवर कृपालु होऊन क्षमा करावी, हे पाहून राजादि समस्त जनांस अत्यंत आश्चर्य वाटले. त्या मरांत सर्व जनांनीं त्या मुनीश्वरांना नमोस्तु केला. मग तो मारिदत्त राजा मोठ्या विनयानें आपले दोन्ही हात जोडून म्हणाला, हे महासाधुत्रर्य ! मी मोठा दुष्ट, पापो, दुराचारी आहे. अज्ञानवशतेनें असंख्यांत पशुपक्ष्यांचा वध केला. आपल्या सारख्या महात्म्यावर ही प्राणसंकट उपस्थित केले. याजबद्दल आपण मजवर क्षमा करावी. आतां या दुःखाचा परिहार होण्याचा उपाय सांगावा, हे त्याचे वचन ऐकून ते साधु त्यांना म्हणाले, राजन् ! पूर्वकर्माच्या उदयाने सर्व कांहीं होत असते. यांत कोणाचा कांहीं दोष नाहीं. आतां तुम्ही आमच्या सद्गुरुसन्निध चला, म्हणजे तुमची तेथे सर्व अभीष्ट सिद्धि होईल. असे म्हणून त्यांनी त्यांना आपल्या गुरुकडे नेलें. तेथे गेल्यावर त्या मारिदत्तरायाने मक्तीने त्या मुदत्ताचार्य मुनीश्वरांना साष्टांग प्रणाम केला आणि मोठ्या विनयाने म्हटले, रे महागुरो ! मी अत्यंत हिंसा वगैरे दुष्कृत्य केले आहे. त्याच्या निवृत्ती- करितां एकादा योग्य उपाय सांगावा. त्यानंतर त्यांनीं त्यांस जीवदया ष्टमी व्रत है करावयास सांगून त्याचा सर्वविधि ही निवेदिला. मग त्याने हे व्रत त्यांच्याजवळ ग्रहण केले. नंतर राज्जा वगैरे नगरी परत गेले. पुढें कालानुसार त्याने है व्रत यथाविधि पाळिले.
एकदां कांहीं निमित्ताने त्याच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाख्यामुळे तो सर्व राज्यभार आपल्या पुत्राकडे सोपवून बनांत गेला आणि एका निर्भथ महामुनीश्वराजवळ जाऊन जिनदीक्षा घेऊन घोरतपश्चर्या करूं लागला, आयुष्यांतीं समाधिविधीनें मरण पावून सानत्कुमार स्वर्गात देव होऊन जन्मला आणि तेथे पुष्कळ सुख भोगूं लागला. याच प्रमाणें त्या नगरांतील भाविक लोकांनीहि है व्रत यथाविधि पाळले. त्यामुळे ते नरेंद्र, मुनींद्र, होऊन स्वगांत देव झाले आणि तेथे चिरकाल मुख भोगू लागले.
अभयरुचि व अभयमति हे दोघे मुनी पुष्कळ दिवस घोरतपश्वरण करून अंतीं समाधिविधीनें मरण पावून देशान्य कल्पांत देव झाले आणि तेथे पुष्कळ सुखाचा अनुभव घेऊ लागले.