व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि नंदीश्वर पर्वांत अष्टमी दिवशीं या व्रतिकांनीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्ने धारण करावीत. सर्व पूजाद्रर्षे आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर जिन- प्रतिमा यक्षबक्षीसइ स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. देवापुढे शुद्धभूमीवर गणधरवलयाचे यंत्रदल विधानांत सांगितल्या प्रमाणे पंचवर्णांनी काढून गणधरवलय यंत्र असल्यास यंत्र स्थापावे. नसल्यास एका ताटांत गंधाने यंत्र काढून ते गंधाने अभिमंत्रित करून त्यावर तीर्थकर प्रतिमा बसवावी, मंडपश्रृंगार वगैरे करावें. नित्यपूजाक्रम करून गणधरवलयविधान वाचून यथानुक्रम अर्चना करावी, मंत्रजाप्य विधानांत सांगितल्या प्रमाणे घालावे. अंतीं एक महार्घ्य करून त्याने ओवाळोत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. याप्रमाणे अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस हा पूजाक्रम करावा. अर्थात् गणधरवळ्याची आराधना करावी. चतुःसंघास चारप्रकारचीं दानें द्यार्वीत. है व्रत ४८ वर्षे केल्यास उत्कृष्ट नियम म्हणतात. २४ वर्षे किवा १२ वर्षे अगर ६ वर्षे अथवा ३ वर्षेहि करण्याचा नियम कर-