टीप – ( या व्रतविधिमध्ये श्री आदिनाथ तीर्थंकरांची अर्चना करतांना जरूर तर पुढोल मंत्राचा उपयोग करावा – ॐ न्हीं श्रीं क्लीं ऐं अर्ह पंचकल्याणसंपूर्णाय नवकेवललब्धिसमन्विताय श्रीआदिनाथतीर्थकराय जळं निर्वपामि स्वाहा ।। याप्रमाणे करावे. )
व्रतविधिः – माघ कृष्ण १४ दिवशीं या व्रत आइकांनी प्रासुक उदकाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वस्ने धारण करावींत. मग सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्थापथ शुद्धि वगैरे क्रिया करून जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. श्रीपीठावर श्रीआदिनाथ प्रतिमा गोमुख चक्रेश्वरी बक्षीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. आणि त्यांची अष्टद्रव्यांनी पूजा करावी या प्रमाणें चार वेळां अभिषेक आणि पूजा करावी. पंचभक्ष्यांचे पंच पक्वान्न चरु करावेत. ॐ न्हीं अहे श्रीआदिनाथाय गोमुख चक्रे- श्वरी यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनाम स्तोत्र म्हणून श्रीआदिनाथ तीर्थकर चरित्र व ही व्रतकथा ही वाचावी. त्यानंतर श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. व यक्ष, यक्षी आणि ब्रह्मदेव यांचे अर्चन करावे. मग एका पात्रांत चौदा पार्ने लावून ‘त्यांवर अष्टद्रव्ये आणि त्यांनें ओवाळीत मंदिरास तीन पदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास करून वैर्मध्यानांत काळ घालवावा.
सत्पात्रांस आहारादि दाने बाबींत. बम्हचर्य पाळावे. रात्रीं-दश- अक्ति, पंचस्तोत्र, वगैरे म्हणून शास्त्रस्वाध्याय करीत रात्री जागरण करावें. दुसरे दिवशीं पूजा व पंचभक्ष्य पायसांचे चह करून ओवाळावेत. सत्पा- त्रांस चार दानें देऊन आपण पारणें करावें.
या क्रमाने है व्रतपूजन पांच वर्षे करून शेवटीं या व्रताचे उद्यापन करावें, त्यावेळीं श्री आदिनाथ तीर्थकर प्रतिमा गोमुख चक्रेश्वरी यक्ष- बक्षीसहित नूतन तयार करून त्याची पंचकल्याण विधिपूर्वक प्रतिष्ठा करावी. चतुःसंघास चारपकारचीं दाने द्यावीत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
पूर्वी है व्रत यथाविधि पालन केल्यामुळे ज्यांना उत्कृष्ट फल प्राप्त झाले आहे. त्यांची कथा पुढे सांगतो; ऐका, –
-कथा-
या जंबूद्वीपांतील पूर्वविदेहक्षेत्रांत पुंडरीकिणी नांवाचे पट्टण आहे. तेथे सूरसेन नांवाचा एक मोठा नीतिमान्, सदाचारी असा राजा राज्य करीत होता. त्याला मंगलावती नामक राणी होती. त्यांना रुद्रसेन व विष्णुपेण या नांवाचे दोन पुत्र होते. ते दोघे यौवनावस्थेत आल्यावर सप्तव्यसनी बनले. त्यामुळे त्या सूरसेन राजास वैराग्य उत्पन्न झाले. तेव्हां तो आपल्या पुत्रांस राज्यभार देऊन वनांत गेला. तेथे एका दिगंबर महामुनि जवळ ते दीक्षा घेऊन घोर तपश्चर्या करूं लागले. अंतीं समाधिविधीने मरण पावून स्वर्गांत देव झाला.
इकडे त्याचे ते दोन पुत्र आपल्या अंतकाळीं आर्तरौद्रध्यानाने मृत्यु पावून नरकांस गेले. तेथे पुष्कळ काळपर्यंत दुःख भोगून तेथून ते दोघेहि दुःखद संसारांत भ्रमण करूं लागले. याप्रमाणे ते दोघे पुष्कळकाल भ्रमण करून शेवटीं हेमगिरीमध्ये दोन व्याघ्र झाले. तेथेच एका गुहेत जयंधर नामक महाज्ञानी मुनीश्वर राहत होते.
एके दिवशीं ते दोन्ही व्याघ्र त्या गुर्देतील मुनीश्वरांस पाहतांच उपशांतपरिणामी झाले. मग त्या मुनीश्वरांनों त्यांचे भवांतर सांगितले. ते ऐकून त्यांना भवस्मरण झाले. त्यानंतर त्या मुनींनी त्यांना पंचाणुव्रतें सांगून दिली. तेव्हांपासून ते दोन्ही वाघ प्रतिदिवशीं मांसाहार सोडून सदय बुद्धीने फाहार करूं लागले. त्यायोगें आयुष्यांतीं ते दोन्ही व्याघ्र शांतवृत्तीनें मरण पावून सौधर्मस्वर्गात महद्धिक देव झाले. तेथे ते देव चिरकाल पुष्कळ सुख भोगून आयुष्यांतीं तेथून च्यवून- धातकी. खंडांतील पूर्वविदेह क्षेत्रांत मंगलावती नांवाचा मोठा देश आहे. त्यांत अयोध्या नांवाचे मोठे, सुंदर नगर आहे. तेथे पूर्वी विमलसेन नांवाचा सदाचारी, शूर व न्यायचंत असा राजा राज्य करीत होता. त्याला सुमंगलादेवी नामे सुशील, गुणवती, रूपवती अशी राणी होती तिच्या उदरीं ते पूर्वोक्त देव जय- सेन व विजयसेन नामक पुत्र होऊन जन्मले. ते यौवनावस्थेत आल्यावर त्या विमलसेन राजाने आपल्या जयसेन नामक ज्येष्ठ पुत्रास राज्यभार देऊन वनांत जाऊन श्रुतसागर मुनीश्वरांजवळ निश्रेथ दीक्षा घेतली. आणि तो शेवटीं समाधिविधीने मृत्यु पावून सानत्कुमार स्वर्गात उत्कृष्ट ऋद्धिधारी पुष्पकेतू नामक देत्र झाला. आणि तेथे तो चिरफाल विपुल सुस्ख भोगू लागला.
इकडे जयसेन त्याला नवनिधि व चौदारत्नें प्राप्त झाली. त्यायोगानें तो षट्खंडपृथ्वी साधून साम्राज्यैश्वर्यसुख भोगूं लागला. एके दिवशीं तो जयसेन चक्रवर्ति राज्जा मतिसागर नामक केव-ींच्या समवसरणास गेला. तेव्हां त्यांच्या दिव्यवाणीचा धर्मोपदेश कांहीं वेळ ऐकल्यावर तो मोठ्या विनयानें आपले दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाला, – हे ज्ञानसिधो स्वामिन् ! आज मला उत्कृष्ट सद्गतिसुखाला कारणीभूत असे एकादें व्रतविधान सांगावे. हे त्याचे नम्रमाषण ऐकून त्या केवळींनी त्याला हे शिवरात्रीव्रत पालन करण्यास सांगितले. व त्याचा काल आणि विधिही सांगून दिला. ते सर्व ऐकून त्याला मोठा संतोष झाला. मग त्या जयसेनाने आपल्या मुकुटवद्ध राजांसह त्या केवलींस वंदना करून ते व्रत स्त्रीकारिलें. नंतर तो त्यांना नमस्कार करून आपल्या नगरी परत आला. तेथे आल्यावर त्याने ते व्रत सर्व राजांसह यथाविधि पाळून त्याचे उद्याग्न केले.
पुढे कांहीं दिवस धर्मकार्यांत काल घालवीत व साम्राज्यैश्वर्य भोगीत असतां त्याच्या मनांत या संसाराविषयीं वैराग्य उत्पन्न झाले. तेव्हां तो आपल्या श्रीविजय नामक पुत्रांस सर्व राज्यमार देऊन ५००० मुकुटबद्ध राजांसह वनांत गेला. आणि तेथे श्रीमतिसागर नामक केवली जवळ सर्वांसह जिनदीक्षा धारण करून घोर तपश्चर्या करूं लागला व तो आपल्या तपःप्रभावाने घातिकर्माचा क्षय करून केवली झाला. तेव्हां चतुर्णिकाय देवांनी तेथे येऊन गंघकुटी रचिली. मग तो केवली कांहीं दिवस विहार करीत करीत भव्यलोकांस सद्धर्माचा उपदेश करूं लागला. अशा रीतीनें तो कैलास पर्वतावर जाऊन गंधकु- टीचे विसर्जन करून अनेक मुनिसह क्षपणयोग धारण करतां झाला आणि तेथे तो शुक्लध्यानानें सर्व अघाति कर्माचा नाश करून मोक्षास गेला व तेथे अनंत काल शाश्वत सुख भोगूं लागला. असे या व्रताचे माहात्म्य आहे.