व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि नंदीश्वर पर्वात अष्टमी व चतुर्दशीं दिवशीं प्रभातीं शुचिजकांनीं य। व्रतिकांनी अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत.
सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन मंदिरास जावे. जिनालयास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास मक्तीने साष्टांग नम- स्कार करावा. पीठांत पार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा धरणेंद्र यक्ष पद्मावती यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्याची अर्चना करावी, श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्ह- देव यांचे अर्चन करावे. मूगाचे पायस तयार करून त्यांत गुळ व तूप घालून देवांस चरु अर्पण करावेत. ॐ नहीं श्रीं क्लीं ऐं अर्ह पार्श्वनाथ तीर्थकराय घरणेद्रयक्ष पद्मावतीयक्षीसाहेवाय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्प घालावीत. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्वानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशीं ब्रम्हचर्यपूर्वक उपवास करावा. याच प्रमाणें चार महिने त्याच तिथीस पूजा करावी. शेवटीं पार्श्वनाथ तीर्थंकरास महा- भिषेक करून उद्यापन करावें. मूग, गहूं, तुरी, हरभरे, उडीद या धान्यांचीं पांच मंडलें करून त्याच्या मध्यमागीं एकमण तांदळाची एक मोठी राशि घालावी. त्यावर एक कुंम ठेवून वरती एका पात्रांत पार्श्वनाथ प्रतिमा स्थापन करावी. त्याच्यापुढें एक सोळा हातांचे नूतन अखंड वस्त्र पसरून त्याच्यावरती त्रिकटुक्क (सुंठ, मिरे, लेंडपिपळी किंवा लवंग.) जिरे, हळदीचे चूर्ण, कुंकुम, कर्पूर, आणि पूर्वोक्त धान्यांचे पुंज घालावेत. षोडशभावना भावांवीत, १०८ पोळ्या, करंज्या, लाडू, फलें, पुष्पें इत्यादि (प्रत्येकी १०८) देवांस अर्पण करावींत. चार वायर्ने करून देव, शास्त्र, गुरु यांना अर्पण करून आपण एक घेऊन घरीं जावें. सत्पात्रांस याहारादि दानें द्यावींत. असा याचा पूर्णविधि आहे.
-कथा-
या जंबू द्वीपांतील भरतक्षेत्रांत आर्य खंड आहे. त्यांमध्ये अवंती नामक विशाल देश आहे. त्यांत भूतिलक नांवाचे एक मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी यशोभद्र नांवाचा गुणशाली, पराक्रमी व धर्मशील असा राज्जा आपल्या यशोमती नामें पट्टराणीसह सुखानें राज्य करीत होता.
एकदां त्या नगराच्या बाहेरील उद्यानांत यशोभद्र नांवाचे महा- मुनीश्वर येऊन उतरले. है शुमवृत्त राजांस कळतांच तो आपल्या परिजन व पुरजन यांच्या सह उद्यानांत मुनींच्या दर्शनास पादपागीने निघून गेला. तेथे त्रिप्रदक्षिणा पूर्वक भक्तीने त्यांना नमस्कारादिकरून त्यांच्या सन्निध बसला. कांहीं वेळ त्यांच्या मुर्खे धर्मोपदेश श्रवण केल्यावर यशोमती राणी विनयाने आपले दोन्ही हात जोडून त्या मुनींना म्हणाली, अहो स्वामि महाराज ! आतां आम्हांस सुगति- सुखाला कारण असे एकादै व्रतविधान सांगावें. हे तिचे नम्र भाषण ऐकून ते मुनींद्र तिला म्हणाले – हे कन्ये ! आतां तुम्ही सर्वतोभद्र व्रत है यथाविधी पालन करा. म्हणजे तुम्हांस अनेक भोगोपभोगांचे सुख मिळून तुमचे सर्व प्रकारें कल्याण होईल. असे म्हणून त्यांनीं सर्वविधि तिला सांगितला. ते ऐकून तिला सांगितला. ते ऐकून तिला मोठा आनंद झाला. तेव्हा विनें त्यांना मक्तीनें प्रार्थना करून है व्रत ग्रहण केलें. नंतर सर्वजण मुनीश्वरांस प्रणिपात करून नगरी परत आले. पुढे कालानुसार त्या यशोमती राणोने हैं व्रत यथाविधि पाळिलें त्यायोगें ती आयुष्यांती शुभध्यानानें मरण पावून स्वर्गास गेली. तेथे पुष्कळ दिव्यसुख भोगूं लागली.