व्रतविधि – माघ शु. १५ दिवशीं प्रातःकाळीं या व्रतिकांनीं शुद्धोद- कार्ने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास गमन करावें. मंदिरास तीन प्रद- क्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणाम करावा. नंदादीप लावावा. मंडप श्रृंगार करून नूतन वस्त्राचे चंद्रोपक बांधावे. देवापुढे शुद्धभूमीवर पंचवणानों अष्टदल कमल काढून त्याच्या सभोवतीं चतुरस्र पंचमंडले काढावीत. मध्ये एक सुशोभित कलश ठेवून मंडलाभोवतीं अष्टमंगल कलश मांडून त्यांना पंचवर्ण सूत्र व वस्त्र गुंडा- ळावे, अष्टमंगलद्रव्ये ठेवावीत. एका पात्रांत नवदेवता यंत्रदल अष्ट- गंधाने लिहून त्यावर नऊ पार्ने, अक्षता, फुले, फले बगैरे ठेवून तो ताट मध्यकुंभावर ठेवावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिला पंचामृताभिषेक करावा. सुगंधी पुष्पमाला घालावी. तसेच अपराण्ड कालीं पूजाभिषेक करून नागवल्ली पत्रमालाहि घालावी. मग ती प्रतिमा यंत्रपात्रांत बसवून अष्टद्रव्यांनी त्यांचीं अर्चना करावी, चरु करावेत. श्रुत व गणधर पूजा करून यक्षयक्षी ब्रह्मदेव यांचे अर्चन करावे. ॐ नहीं अई अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा । या मंत्राने १०८ पुष्पें घालून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर महार्घ्य करून त्यांत नारळ ठेवून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी त्यादिवशीं यथाशक्ति ब्रह्मचर्यपूर्वक उपवासादिक करावें, पंच अणुव्रते तीन गुणव्रते, चार शिक्षाव्रते अशी बाराव्रते पाळावीत. कृषी, व्यापार वगैरे आरंभाचा त्याग करून धर्मध्यानांत काल घालवावा.
या प्रमाणें एकमास है व्रतपूजन करावे. व शेवटीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं पंचवर्ण धान्यांनीं जंबूद्वीपाचे यंत्रदल काढून त्याच्या मध्यभागीं मंदर ठेवावा. त्यावर पंचपरमेष्ठी प्रतिमा ठेवून त्यांची आराधना करावी. पंचपक्वान्नांचे चरु अर्पावेत. महाभिषेक पूजा करावी चतुःसंघात चार प्रकारचीं दाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
कुरुजांगण नांवाचा देशांत कनकपुर नामक मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी विजयकोर्ति नांवाचा मोठा शूर व नीतिमान् असा राज्जा राज्य करीत होता. त्याला विनयवती नामें सुशील, रूपवती,लावण्यवती अशी राणी होती, त्यांचा जिनदत्त नामक राजश्रेष्ठी होता. त्याला रत्नमाला नांवाची धर्मपत्नि होती. त्यांना वनमाला नामक सुंदर सौंदर्यवती अशी कन्या होती. अशा प्रकारे असतां, – एके दिवशीं तो वनमाला अभयमति आर्थिकेजवळ माघमाला व्रत घेऊन यथाविधि पालन करून धर्मध्यानांत काल घालवीत असे.
येव्हां तिकडे सिधुदेशांतील रत्नपुर नामक नगरामध्ये जितशत्रु नामें राजा आपल्या कमलावती नामें रूपवती, गुणवती, सुशील अशा राणौसह सुखाने राज्य करीत होता. त्यांचा विनयदत्त नामक राजश्रेष्ठो असून त्याला सुभद्रा नांवाची सुंदर, सद्गुणी मार्या होती. त्यांना सुशर्मा नांवाचा कुरूपी पुत्र होता. त्याचे लग्न कोणत्या तरी युक्तीने करावे या उद्देश्याने वन्हाडासह त्या कनकपुर नगराच्या नंदन वनांत बेऊन उतरले होते. त्याच वेळीं – इकडे अवंती देशांतील सुसीमा नांवाचे नगरांत वसुपाल नांवाचा राजा निपुणावती नामक राणीसह सुखाने राज्य करीत होता. त्यांचा मंत्री अभिचंद्र नांवाचा असून त्याला कुसुमलेखा नांवाची सौंदर्यवती रूपवती अशी स्त्री होती. यांच्यासह सुखाने कालक्रमण करीत असतां, एकदां त्या कनकपुर येथील राजश्रेष्ठी जिनदत्त हा व्यापारासाठीं रत्नद्वीपास गेला होता. दो तिकडून परत येत असतांना त्या सुसीमा नगरांतील वसुपाल राजाच्या भेटी करितां राजसभेत गेला. त्याने आपण आणलेल्या अमूल्य रत्नांचा नजराणा सुवर्ण पात्रांत घालून राजापुढे ठेविला. नंतर मोठ्या आद- रार्ने त्यांना नमस्कार करून उभा राहिला. तेव्हां राजार्ने त्याला बसण्यासाठीं सेवकांकडून आपल्या पुत्राचे सिहासन आणवून दिले. ते पाहून त्याला लाज वाटल्यामुळे तो श्रेष्ठी राजास म्हणाला, हे राजन् ! या सिंहासनावर बसण्यास मी बोग्य नाहीं. कारण मला पुत्रसंतान नाहीं. म्हणून त्यावर बसावे, असे मला वाटत नाहीं. ते ऐकून राजानें दुसरे एक सिहासन आणवून दिले. मग त्यावर तो बसून त्यांशीं कुशलसंलाप करूं लागला. नंतर राजाने त्यांचा आदर सत्कार करून त्याला त्याच्या नगरी पाठविले. त्याप्रसंगी हा वृत्तांत जाणून त्या वसुपाल राजाच्या प्रधानास मोठा विषाद वाटला. मग घरी जाऊन त्याने आपल्या धर्म- पत्नीस राजदरबारांतील सर्व हकिगत सांगितली तेव्हां ते ऐकून विलाहि फार वाईट वाटलें. मग अशा रीतीने ती दंपती संतानचिंतेत अस्त असतां, – एके दिवशीं त्या नगराच्या उद्यानवनांत बोधसिंधु नामक महा अवधिज्ञानी मुनि संघासह बेऊन उतरले. हैं वृत्त राजांस कळतांच तो आपल्या परिजन आणि पुरजन यांसह दर्शनार्थ गेला. त्रिप्रदक्षिणा- पूर्वक त्याना वंदनादि करून त्यांच्या समीप बसला. मग कांहीं वेळ त्यांच्या मुखें धर्मोपदेश ऐकश्यावर तो अभिचंद्र प्रधान विनयानें आपले दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाला, हे ज्ञानसिंघो स्वामिन् ! मला पुत्रसंधान होईल कीं नाहीं! हैं कृपा करून आपण मला सांगावे. है त्याचे नम्रमाषण ऐकून ते मुनीश्वर त्याला म्हणाले, हे मंत्रिन् ! तुला पुत्रसंतान होणार आहे. परंतु सोळाव्या १६ वर्षी त्याला सर्पदंश होऊन तो मरण पावेल. हे ऐकून त्याला हर्षविषाद वाटला, मग सर्वजन त्या मुनीश्वरांस नमस्कार करून नगरींत परत आले.
पुढें कांहीं दिवसांनी त्या प्रधानाच्या भार्येस गर्भ राहिला. नऊमास पूर्ण झाल्यावर तिला पुत्र झाला. त्याचे नांव मृत्युंजय असे ठेविलें, तो बाल्यावस्था उल्लंघून तरुणावस्थेत आला. पुत्र जन्म झाल्यावर प्रधानाने एक नूतन चैत्यालय बांधून त्यांत तीर्थकर प्रतिमा पंचकल्याणपूर्वक स्थापून चिंताक्रांत होऊनच धर्मानुष्ठाने चालविले होते.
एके दिवशीं मृत्युंजय आपल्या सहोदर मावळ्यासह तीर्थयात्रेस निघाला. तेव्हां मार्गात कनकपुर नगराच्या उद्यान वनांत ते दोषे उतरले. मृत्युंजय अत्यंत श्रांत झाल्यामुळे एका वृक्षाच्या छायेंत निजला. आणि त्याचा मावळा भोजन सामग्री आणण्यासाठीं नगरांत गेला. त्याच उद्यानवनांत जो पूर्वीचा वरदत्त श्रेष्ठी आपल्या सुशर्मा नायक कुरूपो पुत्राचे लग्न करण्यासाठी बन्हाडासह येऊन उतरलेला होता. त्याची भार्या सुभद्रा तेथील तलाबावर पाणी पिण्यासाठी आली असतो, तिने त्या तलावाच्या काठीं असलेल्या एका वृक्षाखालीं निज- लेल्या त्या सुत्युंजय युवकास पाहिले. मग ती त्याच्या समीप जाऊन त्याचे पाय चुहे लागली तेव्हां तो जागा होऊन म्हणाला, हे माते ! है अनुचित कृत्य काय आरंभिले आहेस ? ते ऐकून ती त्याला म्हणालो, हे पुत्रा । आतां माझ्या मनांत अनुचित कांहीं नाहीं. माझा एकुलता एक कुरूपी पुत्र आहे. त्याला कन्या कोणी देईनात. तेव्हां आतां त्याचा कोणत्याहि रीतीने विवाह करावा, अशी माझी इच्छा आहे. त्याच्या ऐवजी तुला तेथे नेवून तुझ्याशींच त्या कन्येचा विवाह करावा, असे मला वाटते. कारण दीन अनाथावर उपकार करणे हे आपल्या सारख्या सज्जनांचे कर्तव्य आहे. म्हटले आहे कीं, – सत्पुरुषाः सोपकारिणः ।॥ म्हणून मी तुला उठविले. हे ऐकून मृत्युंजय युवक तिला म्हणतो, हे माते ! माझा मामा भोजन साहित्य आणण्याकरितां नगरांत गेला आहे. तो आला म्हणजे त्याला विचारून तुला काय ते कळवितों. इतक्यांत तो तेथे आला. मग तिने त्याला आपली सायंत हकिगत सांगितली. तेव्हां त्याने त्या कार्याला आपली संमति दिली. नंतर तिने त्या मृत्युंजय युवकास आपल्या वन्हाडीं नेलें आणि हा आपलाच कुमार आहे असे त्या जिनदत्त श्रेष्ठीत दाखविले मग त्या जिनदत्त श्रेष्ठीनें आपल्या वनमाला कन्येशीं त्या मृत्युंजय युवकाचा विवाह केला आणि त्याला शय्यागृहीं पाठविले. तेथे तो मंचकावर जाऊन बसतांच फराळाचे पदार्थ त्या वनमालेनें स्याला आणून दिले. ते पाहून तो म्हणाला, – मी रात्रींच्या वेळीं कांहीं खात नाहीं. कारण माझा अहोशनाचा नियम आहे. असे म्हटल्यावर त्या वनमालेनें त्याला तांबूकाचा विडा दिला; आणि आपल्या अंगांतील कंचुकी काढून मंचावर ठेवून बाहेर गेली. तेव्हां मृत्युंजयानें कंचुकीवर जुन्याने आपल्या नांवाची अक्षरे लिहून ठेविली. नंतर तो बाहेर जाऊन त्या सुशर्मास आपल्या जागीं भाजून बसवून निघून गेला, इतक्यांत ती तेथे आली, आणि पाहते तो कुरूप पति दिसका, तेव्हां ती ‘पाणी आणावयास जाते’ असे म्हणून बाहेर येऊन दुसन्या एका खोळींत दार झोकून निजली, पातःकाळीं सर्वांनी त्या कुरूपी सुशमीला पाहिले. हा असा कुरूपी नवरा आमच्या कन्येस मिळाला. हे फारच वाईट शाले, असे म्हणून ते त्याची अनेक प्रकारें चेष्टा करूं लागले, तेव्हां तो लज्जित होऊन आपल्या बन्हाडी गेला. रात्री घडलेली सर्व हकिगत त्थाने आपल्या मातापित्यांस सांगितली. से ऐकून आपल्या कपटाचारांत बादला अपमान झाला असे समजून ते सर्वजन आपल्या नगरी परत गेले.
इकडे तो मृत्युंजय युवक आपल्या मावळ्यासह परिभ्रमण करीत करीत त्या रत्नसंचयपुर नगराच्या उद्यानांत आला तेथे असा एक प्रकार घडला होतां कीं; त्या रत्नसंचयपुर नगरीच्या राजा सिंहरथ आणि त्याची धर्मपत्नि सुनंदादेवी यांना विशालनेत्री व कुवळयनेत्री अशा दोन कन्या सुंदर होत्या. त्या उपवर झाल्याने ‘आतां यांना वर कोण, कसा व केव्हां मिळेल यां विषर्थी राजा आपल्या मनांत चितित होता. तेव्हां त्यांने एका अवधिज्ञानी मुनीश्वराजवळ जाऊन आपल्या कन्यांची भावीस्थिति विचारिली होती. त्या समयीं त्यांनीं त्याला असे सांगितलें होतें कीं, तुमच्या नगराच्या उद्यानांत चित्रकूट नांवाचे एक प्राचीन जिनमंदिर आहे. त्याला वज्जाचे कवाट लाविले असून ते अद्यापि कोणी उघडले नाहींत. ते कवाट जो उघडील तोच तुझ्या कन्यांचा पति होईल ? असे भविष्य ऐकल्यापासून त्याने त्या मंदिरासमीप ते कवाट उघडण्यास येणाच्या पुरुषांची आपणांस समजण्या- साठीं दोन रक्षक ठेविले होते.
मृत्युंजय आपल्या मामासह तेथील उद्यानांतील सरोवरांत स्नान करून उत्तम कमले आपल्या हातीं घेऊन त्या चित्रकूट चैत्यालयीं आला आणि मंदिराचे वज्र कवाट उघडून आंत जाऊन जिनेश्वरांची वंदनादि किया करूं लागला. ही शुभवार्ता सिंहरथ राजांस कळविण्या- करितां एक सेत्रक नगरी गेला. त्याने त्याला घडलेली सर्व हकिगत यथास्थित सांगितली. मग त्या सिंहथ राजाने मृत्युंजय युवकास इत्तोवर बस- वून मोठ्या समारंभाने आपल्या राजवाड्यांत नेले. नंतर एक शुभ मुहूर्त पाहून त्यावर आपल्या त्या दोन्ही कन्यांशी त्याने मृत्युंजय युव- काचा विवाह केला. पुढे कांहीं दिवस तो आपल्या श्वशुर गृहीं मोठ्या आनंदानें राहिला.
त्यानंतर आपल्या श्वशुरादिकांची अनुज्ञा घेऊन आपल्या माव- ळ्यासह उज्र्जयंत गिरीचे दर्शनार्थ गेला. तेथे मात्र तो आपला मरणा- वधीचा काल जाणून ” माझ्या मरणाचा उपसर्ग निवारण होईपर्यंत मी अन्नपानादि ग्रहण करणार नाहीं.” अशी सल्लेखना धारण करून तो एका शिळेवर णमोकार मंत्राचा जप करीत बसला. नंतर तेथे एक सूर्व येऊन त्याला दंश करून (चावून) त्या शिलेखालींच जाऊन बसला. मृत्युंजयाच्या त्या मरणोपसर्गामुळे आणि ध्यानवलाने पद्मावती देवीचे आसन कंपायमान झाले. अवविज्ञानाने ती त्याचा मरणप्रसंग जाणून तत्काळ तेथे आली आणि मृत्युंजयास निर्विष करून आपल्या ठिकाणीं निघून गेली.
इतक्यांत तेथे मेघरथ नांवाचा एक राजा आला आणि मृत्युंज- यासु समारंमानें आपल्या नगरी घेऊन गेला. त्याने आपल्ल्या कन्येशीं त्याचा विवाह करून त्याला आपले अर्धराज्य देऊन आपले जवळ ठेवून घेतले.
पुढे कांहीं दिवसांनी मृत्युंजय कुमारास आपल्या आईबापांस पाहण्याची प्रबल इच्छा झाली. तेव्हां तो आपली धर्मपत्नि, मावळा बगैरे जनांसह आपल्या नगराकडे जाण्याकरितां निघाला. मार्ग क्रमीत भसतां, त्या रत्नसंचयपुर नगरांत येऊन तेथील आपल्या दोषां मायाँसहि घेऊन कनकपुराच्या उद्यानांत येऊन उतरला. ही बातमी त्या वनमा- लेस कळतांच तिने त्याला भोजनानिमित्त बोलावणेसाठीं आपल्या पित्यास तिकडे पाठविले. मग तो जिनदत्त श्रेष्ठी मृत्युंजयकुमाराजवळ आऊन सर्वांना भोजनाकरितां आपल्या गृहीं बोलाऊन घेऊन आला. सर्वोचे भोजन आटोपल्यावर वनमालेनें आपली ती कंचुकी मृत्युंजय पत्तीदेवास दाखविली, मग त्या कंचुकीवरील आपल्या नांवाची अक्षरे बाचून संतोष व्यक्त केला. नंतर तिने आपल्या लम्माच्या वेळीं घडलेली सर्व हकिगत सर्वांना सांगितली. त्यामुळे सर्वांना मोठा आनंद झाला. मग त्वा वनमालेसह तो आपल्या सुसीमा नगरीं गेला आणि आपल्या आई-बापांचे दर्शन करून सुखाने कालक्रमण करूं लागला.
त्या वनमालेस या माघमालाव्रत पुण्यप्रभावाने सर्व ऐहिक सुसे प्राप्त झाली. अवीं ती सन्यासविधिर्ने मरण पावून स्त्रीलिंग छेडून स्वगौत महार्दिक देव झाली. तेथे तो देव चिरकाल पुष्कळ सुख भोगूं लागला. असा या व्रताचा प्रभाव आहे.