बृहत्पल्य व्रतविधि – आश्विन शु. ६ दिवशीं या व्रतधारकांनीं प्रातःकाळी सुखोष्णजलाने अभ्यंगस्नान करून दृढधौत वर्षे अंगावर धारण करावींत. सर्वं पूजासाहित्य आपल्या हातीं घेऊन चैत्यालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रांस मक्तीनें साष्टांग प्रणाम करावा. श्रीपी- ठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांचीं अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचें अर्चन करावें, ॐ न्हीं अई अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने सुगंधी पुष्पे १०८ वेळां घालावीत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून तीर्थकर चरित्रे वाचावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. नंतर एका पात्रांत पांच पाने, गंधाक्षता, फळे, पुष्पेंर्षे वगैरे द्रव्ये व एक नारळ लावून एक महार्घ्य करावे आणि त्याने ओवाळीत मंदि- रास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. ब्रम्हचर्य पाळावे. दुसरे दिवशीं सत्पात्रांस आहारादिदाने देऊन आपण पारणा करावी. या दिवशीं होणाऱ्या उपवासाला सूर्यप्रभा असे नांव आहे. या उपवासाने एकपल्य उपवास केल्याचे फल मिळते.
आश्विन शु. १३ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि क.रावा. त्या दिवशीं होणाऱ्या उपवासास चंद्रप्रभा हे नांव आहे. या उपवासानें दोन पल्य उपवास केल्याचे फल मिळते.
आश्विन कृष्ण ५ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा. या उपवासाला कुमारसंभव असे नांव आहे. या उपवासाने चार पल्य उपवास केल्याचे फल मिळते.
आश्विन कृ. ११ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा. या उपवासाला षडशीति है नांव आहे. या उपवासाने आठ पल्य उपवास केल्याचे फल मिळते.
आश्विन कृ. ११ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा. या उपवासाला पुष्पोत्तर असे नान आहे. या उपवासानें एक हजार पल्य उपवास केल्याचें फल मिळते. असे पांच उपवास आश्विनांत होतात.
कार्तिक शु. १२ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा. या उपवासाला नंदीश्वर हे नांव आहे. या उपवासानें दोन हजार पल्य उपवास केल्याचे फल मिळते. कार्तिक कृ. १२ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा. या उपवासास प्रातिहार्य असे नाम आहे. या उपवासाने बार हजार पत्त्य उपवास केल्याचे फळ मिळते, असे दोन उपवास कार्तिकांत होतात.
मार्गशीर्ष शु. ११ दिवशीं पूर्ववत् सर्वपूजाविधि करून उपवास करावा. या उपवासाला जितेंद्रिय उपवास म्हणतात. या उपवासाने पांच पल्य उपवास केल्याचे फल मिळते.
मार्गशीर्ष कृ. ३ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा. या उपवासास पंक्तिमान असे नांव आहे. या उपवासाने सहापल्य उपवास केल्याचे फल मिळते.
मागशीर्ष कृ. १२ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा. या उपवासाला सूर्य है नांव आहे. या उपवासाने सातपल्य उपवास केल्याचे फळ मिळते. या प्रमाणें तीन उपवास मार्गशीषर्षांत होतात.
(१) पौष शु. १ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि फरून उपवास करावा. या उपवासास पराक्रम हे नांव आहे. या उपवासाने नऊ पल्य उपवास केल्याचे फल मिळते.
(२) पौष शु. ११ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उप- वास करावा. या उपवासाला जयपृथु हे नांव आहे. या उपवासाने दहापल्थ उपवास केल्याचे फक्त मिळते.
(३) पौष कृष्ण २ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उप- वास करावा. या उपवासास अजित असे नांव आहे. या उपवासाने आठ पल्ल्य उपवास केल्याचे फल मिळते.
(४) पौष कृष्ण ‘५ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उप- वास करावा. या उपवासास स्वयंप्रभ असे नांव आहे. या उपवासाने ११ पल्ल्त्य उपवास केल्याचे फल मिळते.
(५) पौष कृ. ३० दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा. या उपवासास रत्नप्रभा हे नांव आहे. या उपवासानें
बारापल्य उपवास केल्याचे फल मिळते. या प्रमाणे पांच उपवास पौषांत होतात.
माघ शु. ४ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा या उपवासाला चतुर्मुख हे नांत्र आहे. या उपवासार्ने तेरा पल्य उपवास केल्याचे फल मिळते.
माघ शु. ७ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा. या उपवासास शील असे नांत्र आहे. या उपवासाने चौदापल्य उपवास केल्याचे फल मिळते.
माघ शु. ११ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा. या उपवासाला पंचाशीति असे नांव आहे. या उपवासाने पंधरापल्य उपवास केल्याचे फळ मिळते.
माघ कृ. ३ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा.
या उपवासानें १६ सोळा पल्य उपवास केल्याचे फल मिळते.
माघ कृ. ८ दिवशीं पूर्ववत् पूजाविधि करून उपवास करावा. या उपवासार्ने १७ सतरा पल्य उपवास केल्याचें फल मिळते.
माघ कृ. १४ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजाविधि करून उपवास करावा. या उपवासानें आठरा पल्य उपवास केल्याचे फल मिळते. याप्रमाणे सहा उपवास माघांत होतात.
फाल्गुन गु. ५।११ कृ. ३।८।११ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजा-
विधि करून उपवास करावा. याप्रमाणें फाल्गुनांत पांच उपवास होतात. चैत्र शु. १।५।८।११ कृ. ३।८।१४ दिवशीं पूर्ववत् पूजाविधि करून उपवास करावा. या प्रमाणे सात उपवास चैत्रांत होतात.
वैशाख शु. १।५/८/११ कृ. ३।८।१४ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजा- विधि करून उपवास करावा. याप्रमाणें सात उपवास वैशाखांत होतात. ज्येष्ठ शु. ५।८।१४ कृ. ८।१४ दिवशीं पूर्ववत् पूजाविधि करून उपवास करावा. याप्रमाणें पांच उपवास ज्येष्ठांत होतात.
आषाढ शु. १।५/८/१४ कृ. १/१/८/१० दिवशीं पूर्ववत् पूजा- विधि करून उपवास करावा. याप्रमाणे आठ उपवास आषाढांत होतात.
श्रावण शु. ३।५।८।१४ कृ. १/८/१४ दिवशीं पूर्ववत् सव पूजा- विधि करून उपवास करावा. असे सात उपवास श्रवणांत होतात. माद्रपद शु. १।११।१४ कृ. ५/८/१४ दिवशीं पूर्ववत् सर्व पूजा-
विधि करून उपवास करावा. याप्रमाणे सहा उपवास माद्रपदांत होतात. याप्रमाणे ६३ सासष्ठ उपवास पूर्ण झाल्यावर शेवटीं या व्रताचे उद्यापन करावे. त्यावेळीं पंचामृत महाभिषेकपूर्वक श्रीपंचपरमेष्ठि विधान करावे. चतुःसंघास आहारादिदानें बाबींत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा – श्रेणिक राजा आणि चलना राणी यांचीच कथा असल्याने आणि ती प्रथमच आल्यामुळे पुनः येथे दिली नाहीं.