है व्रत पूर्वी अनंतवीर्य, अपराजित, यांनीं पाळीले म्हणून दोघे चक्रवर्ती झाले. आणि विजयकुमार सेनापति झाला. जरासंध प्रतिनारायण झाला. जयकुमार व सुलोचना हे अनुकमें गणधर व स्वर्गांत महर्द्धिक देव झाले. श्रीपाल राजाचा कुष्ठरोग गेला. असे या व्रताचे पुष्कळ दृष्टांत आहेत. पैकीं पुढे एक कथा सांगतों.
या जंबू द्वोपांतील भरत क्षेत्रांत आर्य खंडामध्ये अयोध्या नगरींत पूर्वी इक्ष्वाकु वंशीं हरिषेण नांवाचा चक्रवर्ती राजा न्यायपूर्वक राज्य करीत होता. तो मोठा सम्यग्दृष्टी होता. त्याला गंधर्वश्री प्रिय- मित्रा, श्रीमती अशा तीन प्रिय श्रेष्ठ होत्या याशिवाय त्याला शाण्णवहजार ९६ स्त्रियां सुंदर होत्या. अशा रीतीनें सुखाने राज्यो- पभोग करीत असतां – एके दिवशीं वसंत ऋतूच्या वेळीं वनक्रीडेस नगर जनांसह गेला होता. तेथे क्रीडा करीत असतां, – एका महा अशोक वृक्षाखालीं स्फटिक चंद्रकांत शिलेवर अत्यंत क्षीण शरीरी अरिंजय व अमितंजय या नांवाचे दोघे परम दिगंबर महान् तपस्वी चारणऋद्धिधारी अवधिज्ञानी पंथाविचार दोष दूर होण्यासाठीं प्राय- श्चित्त पाठ म्हणत बसले होते. त्यांचा ध्वनि ऐकून तो राजा मंत्रीस बोलावून म्हणाला, हे मंत्रिन् ! तूं पाहिलास कां ? हा ध्वनि कोठून ऐकू येतो ? तेव्हां मंत्र्याने शिपायांकडून शोध करवून राजास सांगितले कीं, हे सार्वभौम राजन् ! अनशनांदि कठिण तपांर्ने क्षीणशरीरी, उत्तम क्षमादि सम्यक्त्वगुणांनीं पुष्ट, असे दोघे मुनीधर आहेत. हैं ऐकून हर्षित होत्लाता राजा आपली पट्टराणी जी गंधर्वश्री तिजला बरोबर घेऊन त्यांच्या समीप जाऊन त्यांना तीन प्रदक्षिणा पूर्वक वंदनादि क.रून बसला. तेव्हां मुनीश्वरांनीं त्यांना सद्धर्मवृध्यादि आशीर्वाद दिला. नंतर थोरले अरिंजय ऋषि म्हणाले, हे राजन् ! फोनलवृक्षासारख्या या असार संसारांत सर्वज्ञ जिनांनी सांगितलेला श्रेष्ठ असा जो धर्म तोच शरणागतास आधार आहे. म्हणून त्यास शरण जा. राजा ! जेणे करून या जीवाच्या संसारांतील जन्ममरणाच्या पीडा दूर होतील आणि सर्व प्राणिमात्रांवरील रागद्वेष जाऊन समभाव होऊन सर्व जीवांस आपल्या
जीवादिषट्दव्यांस त्रिकालवर्ति समस्त गुणपर्यायांनी अनादि- कालापासून आणणारा, क्षुषादि आठरा दोषांनी रहित व अनंतगुणांनी विराजमान असा बीतराग, सर्वज्ञ, हितोपदेशी देव आहे. सर्वज्ञ भगवं- तांनी सांगितलेली, फितीहि वादपतिवाद केल्याने जिचे वाक्य बदलत नाहीं, प्रत्यक्ष अनुमान, प्रमाण यांनी हरमकारे ज्या वाक्यास बाधा येत नाहीं, जिच्यांत सत्यार्थ वस्तूंचे स्वरूप सांगितले आहे, सर्व प्राण्यांचे हित व एकांत मार्गाचा नाश आणि पूर्वापार विरोध रहित आहे, स्याद्वाद, सप्तभंगीनय अनेकांवरूप अशी परमागमश्रुति म्हणजे शास्त्र आहे, जो पंचेद्रियांची विषयवांछारहित, बाह्याभ्यंतर परिग्रहरहित, शुद्धात्मस्वरूपरानुभवी तल्लीन असे परम वीतरागी दिगंबर गुरु आहे. हे धर्म मार्गासंबंधी दीक्षा, शिक्षा देणारे धर्मोपदेश दाते आहेत. माता- पितादि कर्म कार्याचे गुरु होत. कठोरपणा, वक्रस्वभाव, उद्धटपणा, रूप, मानकषाय हे सर्व पूज्यमान गुरुजनांचे पूजादिसेवेचे उल्लंघन करणारे आहेत. परवस्तूंची अभिलाषा, भविष्यकालीं विषय भोगाची इच्छा हे अनर्थाचे व पापासवाचे मूळ आहे. निर्दोष शीलव्रत पाळणे हेच नरनारीच्या शरीरांचे अलंकार आहेत. आरंभीं परहिताहित पाहून काम करणारा तो विज्ञानी महिमावान् होय. परनिंदा, यूत, मांसाहर, मद्यपान, गणिकासेवन, पारष, परद्रव्यहरण व परस्त्रीसंग ही सप्त व्यसने त्याज्य आहेत. जीं इद लोकी भाणि परकोफी दुःख देणारी,
मलेपणास व सम्यक्त्वास धक्का देणारी अशीं कामे करण्यास योग्य नाहींत. स्त्री, पुत्र, मित्र, धनसंपत्ति वगैरे क्षणभंगुर आहे. अमध्य- भक्षणाचा त्याग, निर्दोष पापकर्म रहित न्यायी व्यापार असावा. जै केल्याने या लोकीं यश वाढेल आणि परलोकीं उत्तमपद मिळेल ते कार्य करावें. त्रिकाल सामायिक, जिनपूजा, गुरुसेवा करणे, आणि प्रमत्तगुण- स्थानवर्ति अनगार महामुनि, पंचमगुणस्थानवर्ति देशव्रती श्रावक श्राविका, अथवा परममहत्तपत्रतधारी आर्थिका, चतुर्थगुणस्थानवर्ति अविरत सम्य- दृष्टी या तीन (उत्तम, मध्यम, जघन्य) सत्पात्रांस यथायोग्य यथा- शक्ति चतुर्विध दान देणें, परमागमाचे अध्ययन करणे, करविणे, ऐकणे, ऐकविणे; शक्त्यनुसार संयम पाळणे, हीं सहा कर्म नित्य श्रावकांनीं करात्रींत. इत्यादिक धर्मोपदेश मुनीनीं दिल्यावर राजा मोठ्या विनयानें आपले दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाला, हे संसारसिंधुतारक गुरो ! मी पूर्वजन्मीं कोणते असे पुण्य केले होतें कीं; ज्या योगें आतां मी या लोकीं चक्रवर्ति राजा झालों आहे? तसेच तुम्हां दोघांवर मजला फार स्नेह कां झाला आहे ? हे ऐकून ते मुनिराज म्हणाले, राजन् ! तुझा आणि आमचा पूर्वजन्म संबंध वगैरे तुला सांगतो ते तूं लक्षपूर्वक ऐक. पूर्वी या अयोध्या नगरींत कुबेरमित्र नामक एक वैश्य होता. त्याला सुंदरी नांत्राची स्त्री होती. तिचे पोटीं तूं आणि आम्ही दोघे असे तीन पुत्र १ श्रीवर्मा २ जयकीर्ति ३ जयचंद झालों. यांत पहिला जो श्रीवर्मा तो तुझा जीव. त्याने एकदां श्रीधर नामें मुनीश्वरांस नमस्कार करून आठ दिवसाचे नंदोश्वरव्रत विधिपूर्वक ग्रहण करून केले. कित्येक वर्षे तो या व्रताचे पालन करून आयुष्यांतीं संन्यास विधीनें मरण पावून स्वगर्गात महर्द्धिक देव झाला. तेथे असंख्यातकाल दिव्य भोग भोगून आयुष्या- वसांनी तेथून व्यवून त्या व्रतमाहात्म्याने या अयोध्या नगरींत शूर, वीर, उदार, विवेकसंपन्न, सत्य, न्यायी असा चक्रबाहु राजा आणि त्याची महागुणवती साध्वी विमलादेवी बांचे उदरी तूं हरिषेण नामें पुत्र झाला आहेस. तसेच चौदा रत्ने, नऊनिधि, प्राप्त करून षट्लंडाधिपति झाला आहेस आणि तुझे ते बंधु जयकीर्ति व जयचंद त्यांनी श्रीधर्मधर गुरुपाशीं पंचाणुव्रते, तीन गुणवते, चार शिक्षाव्रतें घेऊन आठ दिव- सांचे है नंदीश्वरव्रत करून त्या पुण्यबलाने आयुष्यावसांनी या भरत क्षेत्रीं हस्तिनापुरांत षट्कर्मरत, क्षायिकसम्यक्त्वादि गुणांनीं युक्त, मोहमायादि अंधकार दूर करणारा धर्मसूर्य असा विमल नामें वैश्य आणि त्याची घर्मपत्नि रतीहून स्वरूपी, अईमद्भक्तिपवित्र, साध्वी गुणशालिनी अशी लक्ष्मीमति नाने असे. त्यांचे उदरी अरिंजय व अमितंजय नामक आम्हीं दोघे बंधु जन्मलों. आमच्या बापाने सातवें वर्षी जैनउपाध्यायासमीप आम्हां दोघांस अध्ययन करण्यासाठीं घालून अनुयोगादि शास्त्रे पढविलीं. नंतर तो आम्हां दोघांच्या विवाहाचा आरंभ करूं लागला. तेव्हां आम्हीं गृहस्थाश्रम ही कैद समजून लग्न करून घेतलें नाहीं. लहानपणीच संयमधारी गुरुपासून उपदेश मिळत अस- ल्यामुळे वाह्याभ्यंतर सर्व परिग्रहांचा त्याग करून आम्हीं निरावरणीं भगवती जिनदीक्षा घेतली. हे नंदीश्वरव्रत धारण करून चतुर्णिकाय देवांत आश्चर्यकारक असे कठिण तप आचरून चारणऋद्धि संपादून आम्ही दोघे चारणऋषि झालों. हे राजा ! असा तूं चक्रवर्ति राजा झाला आहेत. व पूर्व संबंधामुळे आम्हांस पाहून तुला स्नेह उत्पन्न झाला आहे. असे म्हणून त्यांनी त्याला नंदीश्वर द्वीपाचो माहिती सांगण्यास सुरवात केली- ती पुढोल प्रमाणें –
Add reaction
|
Add reaction
|
Add reaction
|
Add reaction
|
Add reaction
|
ReplyForward Add reaction
|