व्रतविधि-चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासांत शुभ
दिवशीं या व्रतपूजनास पारंभ करावा. त्या दिवशीं प्रातः काळीं या व्रतधारकांनीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्रे घारण करावीत. आणि सर्व पूजासाहित्य आपल्या हातीं घेऊन श्रीजि- नालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर सिद्धप्रतिमा आणि पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. नंतर त्यांचीं अष्टके स्तोत्रे व जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनीं पूजा करावी. पंचपकान्नांचे चरु करात्रेत श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी आणि ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. आणि ॐ न्हीं अर्ह असिआउसा अनाहत विद्यायै नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पे घालावींत. णमोकार मंत्राने १०८ जप करावेत.