व्रतविधि – आश्विन कृ. १३ दिवशी या व्रतिकांनीं शुचिर्भूत होऊन मंदिरास जाऊन मंडपश्रृंगार करावा. त्रिपदक्षिणापूर्वक इंर्यापथ- शुद्धि वगैरे करून जिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. जिनेश्व- रास पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. श्रीक्षेत्रपालास तैलाभिषेक करून शेंदूर, गंध लावून फुले चढ- वावींत, ब्रम्हवस्त्रांनी विभूषित करावें. फुलांची माळ गळ्यांत घालावी. त्याचे अष्टक, स्तोत्र व जयमाला हीं म्हणत यथोचित अर्चन करावे. पक्वान्नांचे चरु करून दाखवावेत. नारळ फोडावा. ॐ हीं श्रीं क्लीं ऐं अई श्रीजिनेंद्राय यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुर्षे घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. नंतर एका पात्रांत पांच पाने लावून त्यावर अष्टद्रव्ये मांडून मध्ये एक नारळ ठेवून महार्थ करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशीं एकभुक्ति करावी. आणि १४ चतुर्दशीच्या दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून नूतनधीत त्रस्त्राभूषणें अंगावर धारण करावींत. सर्व पूजासाहित्य घेऊन मंदिरास जाऊन पूर्ववत् क्रिया करून श्रीपीठावर चोवीस तीर्थकर प्रतिमा आणि महावीर तीर्थकर प्रतिमा मातंग यक्ष सिद्धायनी यक्षी सहित स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. एक लक्ष दिवे मंदि- रांत लावावेत, देवापुढे शुद्धभूमीवर पंचवर्णांनी आठ आणि सोळा दलांचे गोल मंडल काढून त्या सभोंवतीं चतुष्कोण पंचमंडळे काढावींत. अष्टमंगलकुंभ व प्रातिहार्ये ठेवावीत. त्यांस नूतनवस्त्र आणि पंचवर्णी सूत गुंडाळावे. मध्यभागीं एक श्वेतसूत्रवेष्टित शोमिवंत कलश ठेवून त्यावर एक पात्र चोवीस पार्ने, फुले, फले वगैरे सहित लावून ठेवावा. त्यामध्ये चतुर्विशतितीर्थकर यंत्र काढलेले असावे. त्यांत चोवीस तीर्थ-
कर प्रतिमा आणि महावीर पतिमा स्थापून त्यांची अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. महावीर मगवंतांची जल, गंध, अक्षता, पुष्प, चरु, दोप, धूप, फल व अर्थ ही प्रत्येकी एक लक्ष लक्ष अर्पण करावीत. अर्थात् एक लक्ष वेळां जल अर्पण करावें. याप्रमाणे बाकीची द्रव्येही अर्पण करावीत. यांत विशेषतः प्रज्वलित व दैदीप्यमान असे प्रदीप पंक्तीच दृष्टि पडतात. यावरून ” दीपावली ” अथवा ” लक्षावळी” अशी संज्ञा दिली आहे. याममाणें पूजेत काल घालवीत. रात्र कपीत रात्रींच्या अंत समयीं श्रीमहावीर प्रतिमा यांचा पंचामृतांनी पुनरपि अभिषेक करावा. त्यांचे अष्टक, स्तोत्र, जयमाला म्हणून त्यांना निर्वाणलाडू चढवावेत. त्या लाडूंत सुवर्ण, मोती, चांदी वगैरे यबाशक्ति घालावे. ॐ हीं श्रीं क्लीं ऐं अई श्रीमहावीरतीर्थकराय मातंगयक्ष सिद्धायनीयक्षीसहि- ताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ सुवर्ण, रजत, सुगंधी पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. एका पात्रात चोवीस पार्ने लावून त्यावर अष्टद्रव्ये मांडून मध्ये एक कूष्मांड फल • ठेवून चोवीस वातीचा दीप लावून महार्घ्य करून त्याने ओवा- ळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. महा- वीर चरित्र वाचावें. ही व्रतकथाहि वाचावी. त्या दिवशीं तर उप- बास असतोच. (सदर दिवशीं निर्वाणक्षेत्रपूजाविधान अथवा सम्मेद शिखरजी विधान किंवा सिद्धचक्रविधान अवश्य करावे. रात्रीं दीपो- त्सव करावा.) दुसरे दिवशीं (म्हणजे अमावस्ये दिवशीं ) सत्पात्रांस आहारदान देऊन आपण पारणे करावे. याप्रमाणे हे व्रत २४ वर्षे करून शेवटीं याचे उद्यापन करावें. त्यावेळीं श्रीवर्धमान तीर्थकर प्रतिमा मातंगयक्ष व सिद्धायनी बक्षीसह नूतन तयार करवून तिची पंचकल्याण *विधिपूर्वक प्रतिष्ठा करावी. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. चोवीस बायर्ने चोवीस प्रकारच्या वस्तूंसह मुख्य सुवर्ण, मोती, रजत युक्त लाडू घालून बांधार्थीत. तीं देवापुढे ठेवून देव, शास्त्र, गुरु, यक्ष, यक्षी,ब्रम्हदेव पुरोहित यांना क्रमाने देऊन यथाशक्ति दंपतींना द्यावे. आपण आशीर्वाद म्हणून दोन घेऊन जावें. त्रयोदशीस एक्भुक्ति, चतुर्दशीस उपवास, अमावस्येस एकमुक्ति करावो.
या विधिमध्ये ज्यावेळीं श्रीमहावीर तीर्थकरांना निर्वाणपद प्राप्त होते, त्यानंतर श्रीगौतम गणधरांनाहि केवलज्ञान उत्पन्न होते, म्हणून श्रीगौतमगणधरांचीहि केवलज्ञानपूजा त्यावेळीं करावी. या व्रताला पुनः कुष्मांडव्रतही म्हणतात. याप्रमाणे या व्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रांत मगध नांवाचा एक अत्यंत विस्तीर्ण देश आहे. त्यांत राजगृह नामक अतिशय मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी श्रेणिक राजाचा पुत्र कुणिक या नांवाचा राजा राज्य करीत होता.
एके दिवशीं सुधर्म नामक मुनीश्वरांस केवलज्ञान उत्पन्न झाले. तेव्हां चतुणिकाय देवांनी आपल्या अवधिज्ञानानें केवलज्ञान झाल्याचे जाणून तेथे येऊन गंधकूटीची रचना केली. आणि केवलज्ञानोत्सव केला. हे वर्तमान त्याला कळतांच तो आपल्या धर्मपत्नीसह तेथे गेला. नंतर त्यांनीं त्यांच्या गंधकुटीसह त्यांना तीन प्रदक्षिणा घालून त्यांची वंदना, पूजा केली. मग तो योग्यस्थळीं जाऊन बसला. आणि त्यांच्यामुस्खे धर्मोपदेश ऐकू लागला. नंतर तो कुणिक राजा त्या सुधर्म केवलींना विनयानें दोन्ही हात जोडून म्हणाला, हे अनंतभवसागरतारक स्वामिन् ! आतां आम्हास उत्कृष्ट सुखाला कारणीभूत असे एकादें व्रतविधान निरोपावे. हे त्यांचे नम्र वचन ऐकून ते केवली मुनीश्वर त्यांना म्हणाले, हे भव्य राजन् ! आतां तुम्हांस दीपावली ( लक्षावळी, कुष्मांड ) व्रत है पालन करण्यास उचित आहे. है व्रत जे भाविक भव्य लोक गुरुजवळ घेऊन यथायोग्य पालन करितात, त्यांना उत्कृष्ट पुण्यबंध होतो. आणि त्यायोगाने त्याला ऐहिक सुखसंपत्ति व पारलौ- किकतुखसंपत्ति प्राप्त होऊन कमाने मोक्षमाप्ति होते. असे या व्रताचे माहाम्य आहे. असे म्हणून त्यांनी त्या व्रताचा सर्वविधि सांगितला. भाणि म्हणाले कीं; – या व्रताचा प्रचार कोणो व कीं केला याविषयीं तुम्हांस माहिती सांगतो, शांतमनाने ऐका. –
या जंबूद्धोपांतील भरतक्षेत्रामध्ये विदेह नांवाचा विशाल धनधा- न्यादिकांनीं भरलेला देश आहे. त्यामध्ये कुंडलपुर नामक एक मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी नाथवंशीय सिद्धार्थ नांवाचा एक राजा राज्य करीत होता. तो मोठा पराक्रमी, रूपवान्, गुणवान् असा होता. तो धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थाचे उत्तम रीतीने साधन करीत असल्या- मुळे त्याला सिध्दार्थ हे नांव सार्थक पडले होते. त्याला प्रियकारिणी नाग्नी अत्यंत लावण्यवती, गुणवती, सुशील अशी पट्टराणो होतो. राज- श्रेष्ठो, पुरोहित, मंत्रो वगैरे अनेक परिवारजन होते. त्याच्यासह तो मोठ्या सुखाने राज्य करीत असे. तसेच दयार्द्ररीतीने आणि नीतीनें सर्वप्रजांचे रक्षण करीत असे.
काळंतराने जगन्माता महासती अशी त्रिशलादेवी अर्थात् प्रिय- कारिणी गर्भवती होण्यापूर्वी सहा महिने अगोदर राजवाड्यावर इंद्राज्ञेने कुबेर रत्नवृष्टि करीत होता.
एके दिवशी ती प्रियकारिणी सुंदरी आपल्या पत्तीसह रात्रीं विलासमंदिरांत सुख शय्येवर निद्रीत झाली असतां, – तिला हत्तो, बैल, सिंह वैगैरे सोळा शुभस्त्रने दिसली. त्यावेळीं आषाढ शु. ६ उत्तरा फाल्गुनी नक्षत्रों चंद्र असतां सोळाव्या अच्युत स्वर्गातील पुष्पोत्तर विमानांतून देव तिच्या गर्भात येऊन अवतरला. नंतर प्रातःकाळ होतांच स्नान, वस्त्रालंकार यांनीं विभूषित होऊन आपल्या पतीजवळ गेली, आणि रात्री आपल्याला पडलेलीं स्त्रने सांगून त्यांचीं फले त्यांना विचारून अत्यंत संतुष्ट झाली. तेव्हां चतुर्णिकायदेव येऊन त्यांनी गर्भकल्याणिकाचा महोत्सव केला. ५६ कुमा- रिका जिनमातेचो सेवा करण्यासाठी येऊन राहिल्या आणि सेवा करूं लागल्या. याप्रमाणे ९ नऊ महिने पूर्ण झाल्यावर ती श्रीषिय- कारिणी महादेवी चैत्र शु. १३ दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्री चंद्र असतां सुंदर पुत्ररत्न पसवली. त्यावेळी मवनवासींच्या येथे शंख, व्यंतरवासींच्या येथे मेरो, ज्योतिर्लोकांत सिइनाद आणि कलवासींच्या येथे घंटानाद होऊ लागला. सर्व बायें आपोआप वाजू लागली. इंद्रा- दिक देवांचों आसने कंपायमान झाली, त्यांचीं मुकुरे ही चचायमान झालीं. या शुभलक्षणावरून आपल्या अवधिज्ञानाने अंतिम तीर्थकरांचा जन्म झाला, असे जाणून सिहासनावरून उठून मोठ्या विनयानें नम- स्कार करते झाले. मग सौधर्म इंद्र आपल्या इंद्रायणीसह ऐरावत हत्तीवर बसून देवसमूहासह कुंडलपुरास आला. नंतर ते सर्वजन नग- रास तीन प्रदक्षिणा घालून राजवाड्याच्या अंगणांत येऊन उभे राहिले. मग ती इंद्रायणी त्या प्रियकारिणीच्या प्रसूतिगृहांत जाऊन तिला मोहनिद्रा आणून मायामयी बालक तिच्या सन्निध ठेवती झाली. त्या जिनबालकास हातीं घेऊन बाहेर येऊन इंद्राच्या हातीं देती झाली. नंतर सौधर्मेंद्र जिनबालकाचें मुख पाहून अत्यंत संतुष्ट झाला. आणि ऐरावत हत्तीवर इंद्रायणीसह बसून त्या जिनबालकास घेऊन सर्व देवसमूहासइ आकाशमार्गे मेरुपर्वतावर गेला. तेथील शुभ्र अशा पांडुक शिळेवरील सिंहासनावर त्या जिनबालकांस बसवून क्षोरसमुद्राच्या पाण्याने चैत्र शु. १४ दिवशीं अभिषेक कराता झाला. सर्व देव हात हाताच्या अंत- रार्ने उभे राहून क्षीरसमुद्राचे पाणी आणून देत होते. अनेक वाद्यांच्या घोष होत होता. अभिषेक पूर्ण झाल्यावर वस्नालंकारांनीं विभूषित करून त्याचा नामकरणविधि करून त्या जिनवाळकाचें वर्धमान असे नांव ठेवण्यांत आहे. मग पूर्ववत् समारंभाने ते सर्व देव त्या बालकासह कुंडलपुरास परत आले तेथे नाटकादि नृत्य, गायन वगैरे करून ते सर्व देव आपल्या ठिकाणीं. निघून गेले. पंधरा महिने रोज रत्नवृष्टी होत होतो, भगवान् जसजसे वाढू लागले, तस तसे माता, पिता, बंधु क तिन्ही लोकांतील सर्व जीव यांना मोठा आनंद झाला. देवांनी आण- लेल्या भोगोपभोग वस्तूंचा भोग घेत ३० वर्षे निघून गेलो. त्यानंतर प्रभूना या क्षणिक संसाराविषयीं वैराग्य उत्पन्न झाले. तेव्हां सारस्व- तादिक आठ प्रकारचे लोकांतिक देव येऊन त्यांनीं प्रमूंची स्तुति करून धर्मोपदेशाने त्यांचे वैराग्य दृढ केले. मग चतुर्णिकाय देवांनीं येऊन प्रभूचा अभिषेक, पूजा करून त्यांना चंद्रमस नामक पालखींत बसविले. राजे, विद्याधर, देव यांनीं ती वाहून बनांत नेली. तेथे एका शुद्ध शिले- वर बसून भगवंतांनों पंचमुष्टो केशलोच करून मार्गशीर्ष कृ. ११ दिवशीं उत्तराफाल्गुनी नक्षत्रो चंद्र असतां बेला करण्याची (दोन उप- वास करण्याची) प्रतिज्ञा करून दिगंबर दीक्षा धारण केली. मग बारा वर्षे पर्यंत त्यांनी उत्तम रीतीने बारा प्रकारचे तपश्चरण केले. पुष्कळ देशोदेशीं ग्राम, खेट, खर्चट, पुर, पट्टण वगैरे ठिकाणीं विहार करीत करीत ऋजूकूला नंदीच्या काठीं जुंभिका गांवच्या वनांत आले. त्या ठिकाणीं एका शामली वृक्षाखालीं सुंदरशा शिलेवर बसून आतापनयोग धारण करून तपःप्रभावानें क्षपकश्रेणीवर आरूढ झाल्यामुळे चार घातिकर्माचा – ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय, मोहनीय आणि अंतराय यांचा-नाश-क्षय झाल्यामुळे त्यांना वैशाख शु. १० दिवशीं उत्तरा- फाल्गुनी नक्षत्री चंद्र असतां केवलज्ञान प्राप्त झालें. तेव्हां समस्त देव येऊन त्यांनीं केवलज्ञान कल्याणिकाचा महोत्सव केला. समवसरणाचा रचना केली. परंतु गणधराशिवाय त्याचा दिव्यध्वनी प्रकट होईना. ६६ सासष्ट दिवस प्रभु मौन राहिले. नंतर महावीर स्वामींचे समवस- रण विपुलाचल पर्वतावर येऊन उभे राहिले. मग इंद्र वेष पालटून राजगृह नगरांत जाऊन इंद्रभूति, (गौतम) अग्निभूति, वायुभूति असे तीन बाम्हणांस समवसरणांत आणते झाले. प्रत्येकांचे पांचरों पाचशें शिष्य होते. त्यावेळीं समवसरणापुढील मानस्तंभास पाहतांच त्यांच्या अंतःकरणांतील मिथ्याभिमान नष्ट होऊन त्यांना वैराग्य उत्पन्न झालें. मग समवसरणांत प्रवेश करून प्रर्मूना तीन प्रदक्षिणा देऊन मोठ्या भक्तीनें वंदना केली. सकल परिग्रहांचा त्याग करून महावीर सन्निध जिनदीक्षा धारण केली. तेव्हां इंद्रभूति (गौतम) मुनीश्वरांस चौथे मनःपर्ययज्ञान उत्पन्न झालें. मग महावीर प्रभुंच्या मुखकमलांतून दिव्यध्वनि प्रकट झाला आणि धर्मोपदेशास सुरवात झाली. याप्रमाणे प्रभूनीं ३० वर्षे विहार करून सर्व भव्यात्म्यांना उपदेश केला. त्यानंतर प्रसूनो पावापुरच्या उद्यानांतील पद्म सरोवराच्या मध्य भागीं जाऊन सर्व समवसरणाचा त्याग केला. आणि तेथे एका उत्तम शिलेवर बसून त्यांनीं बोग धारण केला. मम ते शुक्लध्यानानें सर्व अधातिकर्मांचा नाश करून आश्विन कृ. १४ दिवशीं रात्रोंच्या शेवटीं (सूर्योदया- पूर्वी) मोक्षास गेले. त्यावेळीं प्रभूचे शरीर कापराप्रमाणें विरघळून गेले. नख, केश ही शिलक राहिलीं. तेव्हां चतुर्णिकाय देव येऊन त्यांनी तसेंच मायावी शरीर तयार केलें. मग चंदनादि सुगंधी द्रव्यांनी युक्त अशा चितेस अग्निकुमार नमस्कार करून आपल्या मुकुटाचा स्पर्श करतो, तेव्हां अग्नि लागतो. शरीरदहन होऊं लागल्यावर चोहोंकडे सुगंध सुटला. देव जयजयकार करूं लागले. शेवटीं जळून राहिलेले भस्म देव आपल्या कपाळास लावून त्या स्थानास नमस्कार करते झाले. त्यावेळींच गौतम गणधरांना केवलज्ञान उत्पन्न झाले म्हणून देवांनीं त्यांची केवलज्ञानाची पूजा करून तसेच इतर गणधरांची ही पूजा केली. नंतर ते सर्व आपापल्या स्थानीं निघून गेले.
याप्रमाणे देवांनीं जो महावीर निर्वाणकल्याणिकाचा उत्सव केला. तेव्हांपासून ह। दीपावळी ( लक्षावळी) व्रताचा प्रचार झाला आहे.
असे हे कथन सुधर्म केवडी मुनीश्वरांकडून ऐकून कुणिक राजा- दिकांस मोठा आनंद झाला. मग राजानें त्यांना प्रार्थना करून है दीपावली व्रत स्वीकारिलें. नंतर तो आपल्या पत्निसह त्यांना नम- स्कार करून नगरी परत आला. पुढे कालानुसार है व्रत यथाविधि पाळून याचे त्यांनीं उद्यापन केले. या व्रतपुण्योदयाने त्याला सद्गति प्राप्त झाली.