व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या तीन मासांत जे मंगळ- वार येतील त्या दिवशीं प्रभातीं या व्रतिकांनीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून इर्यापथशुद्धि क्रिया- पूर्वक श्रीजिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. जिनेश्वरास पंचा- मृतांनीं अभिषेक करून त्यांची अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. पंचभक्ष्ये, पायस यांचे बारा चरु करावेत. पद्मावतीस सेवाया, पायस, साखर, तूप यांचा चरु दाखवावा. देवापुढे एका पाटावर १२ पार्ने मांडून त्यांवर बारा अक्षतांचे पुंज, सुपाऱ्या, फलें, फुलें ठेवावींत. एकमू- ठभर मीठ, वालितोडमणी (कर्णपादभूषण हिरवे मणी) सूत तिळगुळ, भिजलेले हरभरे, केळीं या वस्तू लावाव्यात. हळद कुंकू नंतर ॐ हीं श्रीं क्लीं ऐं परमब्रम्हणे अनंतानंतज्ञानशक्तये अर्हत्परमेष्ठिने नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ सुंगधी पुष्पे घालणे. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून ही व्रतकथा बाचावी. मग एक महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रद- क्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं ब्रम्हचर्यपूर्वक शक्त्यनुसार उपवासादिक करावें, सत्तात्रांस आहारादि दाने द्यावीत. या क्रमाने है व्रत १२ वर्षे, बारा महिने, बारा दिवस पालन करून अंतीं याचे उद्या- पन करावें. त्यावेळीं जिनेश्वरास महाभिषेक करून बारा लोटक्यांत बारा प्रकारचीं भक्षे तयार करून घालावींत त्याला गंधाक्षता लावून कुंकू लावावा. सूत गुंडाळावे. १२ नारळ, फणस, अनेक फले १२ चढ- बाबींत. एक सुवर्णफूल चढवावें, सरस्वती व पद्मावती देवींना वस्त्राभरण अपर्णावें. ओटीभरण करावे. चतुःसंघास चतुर्विध दार्ने द्यावीत. बारा वायर्ने बांधावीत. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रांत आर्य नामक एक खंड आहे. त्यांत कांभोज या नांवाचा एक देश असून त्यामध्ये भूतिलक नामें पट्टण आहे. तेथे पूर्वी भूपाल नांवाचा एक राजा सुखानें प्रजा पालन करीत असे. त्याला लक्ष्मीमति वगैरे पांचरों स्त्रिया होत्या. परंतु त्यांना पुत्रसंतान नव्हते. तसेच त्या पट्टणांत एक राजश्रेष्ठी वृषभ नांवाचा असून त्याला वृषभदत्ता नामे एक सुंदर स्त्री होती. त्यांच्या पोटींहि पुत्रसंतान नव्हते. त्या कारणानें तो राजा आणि तो राजश्रेष्ठी हे दोघे अत्यंत चितेत होते.
पुढे एके दिवशीं त्या बाहेरच्या उद्यानांत श्रीधराचार्य नांवाचे एक महामुनि येऊन उत्तरले, त्यांच्या बरोबर ५०० मुनींचा संघ होता. हे शुमवृत्त वनपालक द्वारे जाणून राजा परिजन व पुरजन यांच्यासह पादमार्गे उद्यानांत गेला. मोठ्या भक्तीने मुनीश्वरांस प्रणाम करून धर्मोपदेश ऐकत बसला. तेव्हां भूपाल राजा मोठ्या विनयानें आपले दोन्ही कर जोडून त्यांना वंदना करून म्हणाला, – हे स्वामिन् ! या जन्मांत आम्हांस पुत्र संतान होईल कीं करें ? हे त्यांचे नम्र भाषण ऐकून मुनिराज त्यांना म्हणाले. भो राजेंद्रा ! आतां पुढें तुम्हांस आठ पुत्र होणार आहेत. तेव्हां तो वृषभदत्त राजश्रेष्ठीहि त्यांना म्हणाला, – मो मुनींद्र ! आम्हांसहि पुत्रसंतान होईल की कसे? है बचन ऐकून ते त्यांना म्हणाले, भो श्रेष्ठिवर्य ! तुम्हांसदि पांच पुत्र होतील, तेव्हां आतां तुम्ही त्या संतानप्राप्तीकरितां फलमंगळवार व्रत है पालन करावयास पाहिजे. हा तुम्हांस आमचा महाप्रसादच आहे, असे म्हणून त्यांनी त्याचा सर्व विधि सांगितला. तो ऐकून सर्वांना मोठा आनंद झाला. मग राजाने व श्रेष्ठीने गुरूंना प्रार्थना करून है बत स्वीका- रिलें. नंतर सर्वजन त्या मुनींना नमस्कार करून आपल्या नगरी परत आले. पुढे समयानुसार दोघांनींहि है व्रत यथावत् पालन करण्यास आरंमिलें. पुढे कांहीं दिवसांनी त्या राजाला लक्ष्मीमती राणीपासून १ श्रीप्रभ २ मित्रप्रम ३ चंद्रप्रम ४ काममम ५ सूर्यमभ ६ रत्नमभ ७ विमलप्रभ ८ धर्मपभ असे आठ सुंदर पुत्र झाले. तसेच त्या वृषभदत्त श्रेष्ठीला वृषभदत्ता स्त्रीपासून १ नागदत्त २ रुद्रदच, ३ इंद्रदत्त ४ वीरदत्त ५ सुरदत्त या नांवाचे पांच पुत्र झाले. हे सकलशास्त्र प्रवीण होऊन भव्योत्तम असल्याकारणानें दानपूजादि शुभ कर्म करून स्वर्गार्गीद सुखास प्राप्त झाले.