व्रतविधि – श्रावण शु. ११ दिनीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. १२ दिवशीं प्रातः काळीं प्रासुक पाण्याने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्रे घ्यावीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिन- चैत्यालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक क्रिया करून जिनेश्वरांस भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर वासुपूज्य तीर्थकर प्रतिमा षण्मुख यक्ष व गांधारी यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. नंतर वृषभापासून वासुपूज्य तीर्थ- करापर्यंत १२ अष्टकें, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत त्यांची अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी, ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. मग एका पाटावर बारा पार्ने क्रमाने मांडून त्यांवर अक्षता, फुलें, फलें ठेवून बारा प्रकारचे बारा चरु करावेत. ॐ नहीं श्रीं क्लीं ऐं अई वासुपूज्यतीर्थकराय षण्मुखयक्षगांधारीयक्षी सहिवाय नमः स्वाहा ।। १०८ ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. ( फुलें पिवळीं – सोन्याची असावीत.) ही व्रतकथा वाचावी. १०८ वेळां णमोकार मंत्राचा जप करावा. नंतर एक महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. तो दिवस ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत घालवावा. दुसरे दिवशीं चतुः संघास चतुर्विध दान देऊन आपण पारणे करावे. याप्रमाणे हे व्रत बारा महिने करून शेवटीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं वासुपूज्यतीर्थकरविधान करून महाभिषेक करावा. १२ प्रकारचे चरु करावेत. मंदिरांत आवश्यक वस्तु ठेवाव्यात. १२ मुनीश्वरांना आहारदान द्यावें. त्यांना शास्त्रादि आवश्यक उपकरणे यात्रींत. तसेच आयिका, श्रवक, श्राविका यांनाहि द्यावें. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.