व्रतविधि – चैत्र शु. ५ ते ९ पर्यंत पांच दिवस धर्मध्यानांत काल घालवावा. प्रतिदिवशीं जिनेंद्रास पंचामृतांनीं अभिषेक करून अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षो, ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें, ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं परम- ब्रह्मणे अनंतानंतज्ञानशक्तये अर्हत्परमेष्ठिने नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्र्षे घालावींत. श्रोजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महाव्य करून त्याने गोवाळीत मेदिरास तीन प्रदक्षिणा घादन मंगळारती करावी, घरी जाऊन सत्पात्रास आहारदान द्यावे. मग आपण एकमुक्ति करावी. पांच दिवस बाग बने पाळून नंदादोष लाकवा, शेवटच्या दिवशी म्हणजे नवमोदिनीं महा- भिषेकपूजा करावी, पंचपकालाचे चह करावेत. पायस करावे. याप्रमाणे हे व्रत नऊ वर्षे अथवा नऊ महिने करून शेवटी याचे उद्या पन करावें. त्यावेळीं चंद्रमम तीर्थकर प्रतिमा श्याम यक्ष ज्वालामालिनो यशीसह नूतन तयार करवून त्याचो पंचकल्याणविधिपूर्वक प्रतिष्ठा करावो. चतुर्विधसंघास चतुर्विधदाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत अमल नांवाचा विशाल विषय (देश) आहे. त्यामध्ये रत्नपुर नांवाचे सुंदर व मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी प्रजापति या नांत्राचा पराक्रमी आणि गुणवान् राजा राज्य करीत होता. स्थाला गुणवती नांवाचो खरोखर नांवापमाणे गुणवान् राणी होती. त्यांना चंद्रचूरु नामै एक पुत्र होता. राजमंत्री सुबुद्धि नामक असून त्याला मनोहरी नाम्नी खरोखर मनोहर स्त्री होती. यांना विजय नामें एक पुत्र होता. या सर्व परिवारासह तो प्रजापति राजा सुखानें कालक्रमण करीत असतां, एके दिवशीं चारणऋद्धिधारी महामुनी चर्यानिमित्त राजवाड्यांत आले. तेव्हां त्यांनीं त्यांचे प्रतिग्रहण करून त्यांना आपल्या भोजनगृहीं नेले. नवधा भक्तीनें त्यांना आहारदान दिले. निरंतराय आहार झाल्यावर तेथे एका आस- नावर ते बसले. नंतर त्यांनीं त्यांना धर्मोपदेश केला. तो ऐकून सर्वांस मोठा संतोष झाला. नंतर राजपुत्र ( चंद्रचूल) व मंत्रीपुत्र (विजय) त्यांनी आपणास करण्यास योग्य असे एकादे उत्तम व्रत देण्याविषयीं त्यांना प्रार्थना केली. तेव्हां ते म्हणाले, – रे भव्यपुत्रांनो ! तुम्ही आतां ‘रामनवमी’ व्रत है विधिपूर्वक आचरण करा. याच्या योगार्ने तुम्हांस पुढच्या भवांत उउन सुखाचो पाप्ती होईल, असे म्हणून त्यांनी त्यांना त्याचा सर्वविधि सांगितला. तो ऐकून सर्वांस अत्यानंद झाला. नंतर ते मुनी निघून गेले. मग ते हैं व्रत विधिपूर्वक पालन करूं लागले. कर्मोदयाने राजपुत्र व पधानपुत्र हे दोघे आपल्या यौवनमदाने प्रमत्त होऊन नगरांतील सुंदर आणि सुशील स्त्रियांस शीलभ्रष्ट करूं लागले. हे त्यांचे दुराचाराचे वृत्त ऐकून प्रजापति राजा क्रोधाने अत्यंत झुब्ध झाला. त्यांनी दुष्टांचा निग्रह करणे व शिष्टांचे प्रतिपालन करणे हा आपला राजनीतिधर्म आहे. असे जाणून त्या दोन्ही पुत्रांचा शिरच्छेद करावा अशी आज्ञा आपल्या प्रधानांस दिली. हो राजाज्ञा ऐकून प्रधानाने त्या उभयतांस दोरीने दृढ बांधवून स्मशानांत नेले. परंतु तेथे तो आपल्या मनाशीं थोडा विचार केला. आणि त्यांना तसेच घेऊन एका पर्वतांत गेला. तों तेथे एक महामुनीश्वर गुर्देत तपश्चर्या करीत बसले होते. त्यांच्या चरणासन्निध जाऊन भक्तोनें नमस्कार करून बसला. नंतर विनयाने दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाला, भो स्वामिवर्य ! हे दोघे पुत्र भव्य आहेत कीं अभव्य ! त्यावर मुनीश्वर म्हणाले, – हे भव्योत्तमा प्रधाना ? हे दोघेहि पुत्र भव्य असून येथून तिसच्या भवीं राम आणि लक्ष्मण या नांवानें बलदेव व वासुदेव होऊन जन्मणार आहेत. असे त्यांचे वचन ऐकतांच त्या मुनीश्वरांच्या हस्तेच त्यांनी त्यांना जिनदीक्षा देविली. आणि नगरीं परत येऊन राजाला सर्व वार्ता सांगितली. तेव्हां राजालाहि मोठा संतोष झाला. नंतर तो त्या जिनदीक्षित पुत्रां समीप जाऊन मक्तीने त्यांना नमस्कार करून म्हणाला, हे मुनिराज हो ! आम्ही तुम्हांस शिरच्छेद करण्याची शिक्षा दिल्यामुळे मोठा अपराध केला आहे. तरी त्याबद्दल
तुम्हीं आमच्यावर क्षमा करावी. हैं राजाचे माषण ऐकून ते मुनिद्वय त्यांस म्हणाले, – महाराज ! तुमचा हा अपराध किंवा अपकार नसून तुम्हीं आमच्यावर मोठा उपकारच केला आहे. कारण, त्यायोगानेचतां आम्हांस हा पुढे स्वर्गादि सखे मिळण्याचा सन्मार्ग मिळाला आहे. हे त्यांचे वचन ऐकून राजा संतुष्ट होऊन आपल्या नगरी परत गेला. नंतर स्थाने आपण व आपल्या मुलांनी घेतलेल्या रामनवमीवताचे यथाविधि उद्यापन करून जिनदीक्षा घेतली पुढे तो घोर तरश्वर्या करून स्थायोगे सर्व कर्माचा नाश करून मोक्षास गेला. ते मुनिद्वय अनुरु पुण्य संपादन करून आयुष्यांतों समाधि साधून सर्वार्थसिद्धीत जाऊन जन्मले. तेथोल आयुष्य संपतांच तेथून च्यऊन काशी विषयांतील अयोध्यापुरांत दशरथ राजाला राम आणि लक्ष्मण होऊन जन्मले, पुढे राम हा जिनदीक्षा घेऊन तपश्चर्येने सबै कर्मक्षय करून मोक्षास गेला. लक्ष्मण हा भविष्यत्कालीं तीर्थकर होऊन मोक्षास जाणार आहे.