व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या महिन्यांतून येणाऱ्या कोणत्याहि एका नंदीचरपवाँत अष्टमी दिवशी या व्रतिकांनी प्रमाती शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत बर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये आपल्या हाती घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर ईर्वापथशुद्धि वगैरे किया करून जिनेंद्रास मक्तीनें सष्टांग प्रणिपात करावा. मग पीठावर श्रीजिनेंद्र प्रतिमा स्थापन करून तिला पंचामृ- तांनी अभिषेक करावा. अध्ष्टद्रव्यांनीं पूजा करावी. ॥ ॐ हीं अष्टोत्तर शतसहस्रनामसहित श्रीजिनेंद्राय नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे यथोचित मंत्रानें अर्चन करावें. सहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां एक जप करावा. शास्त्रस्वाध्याय करून ही व्रतकथा वाचावी. देवापुढें नंदादीप लाबाबा. महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालाव्यात. मंगलारती करावी. या दिवशीं ब्रम्हचर्य राहून एकाच वस्तूनें एकाशन (एक वेळ खाणें) करावें.
नवमीदिवशी पूर्वोक्तप्रमाणें पूजा करावी. णमोकार मंत्राचे दोन जप करावेत व दोन वस्तूंनी एकाशन करून राहावें. दशमीदिनीं पूर्वोक्त पूजादि करून णमोकारमंत्र जप तीन करावेत. आणि तीन वस्तूंनी एकाशन करावें. एकादशी दिवशी पूर्वीप्रमाणें पूजा करून णमोकार मंत्राचे चार जप करावेत. व चार वस्तूंनीं एकाशन करावें. द्वादशी दिनीं पूर्वोक्त क्रमानें पूजा करून णमोकार मंत्र जाप्य चार करून चार वस्तूंनीं एकाशन करावें. त्रयोदशीं रोजी पूर्वोक्त पूजा करून णमोकारमंत्र जाप्य तीन करून तीन वस्तूंनी एकाशन करावें. चतुर्दशी दिनीं पूर्वोक्त क्रमें पूजा करून णमोकार मंत्र जोप्य दोन करून दोन वस्तूंनीं एकाशन करावें. पूर्णिमे दिवशीं पूर्वीप्रमाणें पूजा करून णमोकार
मंत्र जाप्य एक करून एका वस्तुने एकाशन करावें. आठदिवस ब्रह्मचर्य असावें. कृष्ण प्रतिपदे दिनी पूर्वोक्त पूजाक्रम करून एकमुक्ति करावी.
या कमाने आठ वर्षे हैं व्रत पाळावें. नंतर याचे उद्यापन करावें, त्यावेळीं श्रुतस्कंधाची प्रतिष्ठा करावी. त्याची अर्चना करावी. बारा बेळवाच्या करंड्या आणून त्यांत साखर, करंज्या बगैरे बायन द्रव्ये-जलगंधाक्षतपुष्पफलपान घालून बारा वायनें बांधावीत. त्यांतून देव, शास्त्र, गुरु, पद्मावती, रोहिणी देवी, नोपीवाले, कथा सांगणारे, आर्थिका, सुवासिनां या प्रत्येकांस एकेक देऊन आपण एक घ्यावें. चोवीस मुनीश्वरांस पुस्तकें, पिंछी, कमंडलु द्यावीत. आर्यिकांनाहि आवश्यक द्यावें. यथाशक्ति आहारदान द्यावें. यथाशक्ति हैं व्रत पाळावे. व्रतिकांना इहपरलोकी अनेक भोगादि वैभव प्राप्त होतें. पुढें क्रमानें मुक्तिसुखहि मिळते. असा या व्रताचा विधी व काळ आहे.
कथा
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत आर्यखंड आहे. त्यांत मगध नांवाचा विशाल देश असून त्यामध्ये राजगृह नांवाचें एक सुंदर नगर आहे. तेथें पूर्वकालीं श्रेणिक नामक एक महामंडलेश्वर राजा राज्य करीत होता. त्याला चेलनादेवि या नांवाची एक सुशील, रूपवती, मनोहर अशी पट्टसणी होती. श्रेणिकाचा एक धनमित्र नांवाचा श्रेष्ठ प्रधान होता. त्याला धनवति नामें धर्मशील, गुणवती अशी स्त्री होती. त्या दंपत्तीस नंदिमित्र नांवाचा एक पुत्र होता. तो सप्तव्यस- नांत अगदीं आसक्त झाला होता.
पुढें एकेदिवशीं त्या नगराच्या उद्यान वनांत सहस्रकूट नांवाचें एक जिनचैत्यालय होतें. त्याच्या दर्शनाच्या निमित्तानें एक पिहितास्रव नामक महामुनि आपल्या सर्व मुनिसंघासह येऊन उतरले. तेथे ते एका- ठिकाणी शास्त्रस्वाध्याय करीत बसले असतांना नंदीमित्र आपल्या जारांगणे समवेत् तेथे आला आणि तो त्या मुनिसमुदायास पाहून
अतिशय कोभाने व कामाकाराने संतत होऊन त्यांना मारून तेथून दाचे’तून त्या प्रयास लागला. तोवर ते मुनि पारणा कर- व्यासाठी नगरांत निजून गेले. तेव्हां ते कार्य आपणांस साथले नाही असे जाणून त्याने ते सुनी ज्या विकाणी राहतात, त्याठिकाणी * क्षेत्र शुद्धि असे नये’ म्हणजे त्यांना तेथे बसलो पुस्तके ठेवतां येऊ नये. या बुच वासनेमुळे त्यांच्या बसण्याच्या स्थळी एक प्रेताचे कलेवर (शरीर) आणून वाकले. याप्रमाणे त्याने त्या मुनीश्वरांना पुष्कळ उपसर्ग केला. त्या पापफलाने तो महाकुष्ठ रोगाने अति कुजून मरण पावला.
पुढे तो एका घोर अरण्यांत मोठा व्यात्र होऊन जन्मला. तेथे एकद। त्याला बेरडांनी ठार मारल्यामुळे तो मरून प्रथम नरकांत नारकी होऊन जन्मला. तेथे पुष्कळ काळपर्यंत भयंकर दुःख भोगून आयुष्यावसानी मरण पावून तो या मृत्युलोकी एका शेळीच्या पोटी बोकड होऊन जन्मला. तेथे मरण पावून पुनः तो दुसऱ्या नरकांत गेला. तेथे तीन सागरोपम कालपर्यंत तो जीष पुष्कळ दुःखाचा अनुभव घेऊन आयुष्यांतों मरून या सुत्युलोकी कलिंग देशांत एका डुकरीच्या पोटीं दुक्र होऊन जन्मला. तेथे त्याला कुत्रा चावल्यामुळे तो मरून तिसऱ्या नरकांत नारकी झाला. तेथे तो सात सागरोपम बर्षे अनेक घोर दुःखे भोगून पुनः तो यालोकी कर्नाटक देशांत सर्व होऊन जन्मला. तेथेद्धि त्याला एका सारंगानें (गारुडीनें) मारल्यामुळे तो मरून चौक्या नरकांत नारकी जीव झाला. त्यामध्ये तो जीव दहा सागरोपम कालपर्यंत अत्यंत घोर दुःखें भोगून तो पुनः या लोकांत एक रेडा होऊन जन्मला. तेथे तो पुनः मरण पावून पांचच्या नरकांत नारकी झाला. मग तो तेथे सतरा सागरोपम बर्षे नाना दुःखें अनुभवून या लोकी पुनः मंडुक (बेडूक) शाळा, नंतर तो तेथे एका हत्तीच्या पायाखाली सांपडून मरून सहान्या नरकांत नारकी झाला. तेथील बाबीस सागरोपम बर्षे भयंकर दुःखें
भोगून शेवटी मरून यालोकीं पुनः फोशल नांवाचा जो एक देश आहे. त्यांतील कोरांची पुरांत एका ब्राम्हणाच्या घरी गायीच्या पोटी पाडा (खोड) होऊन जन्मला. तेथे तो एकदां पावसाळ्यांत मोठ्या पावसांत सांपडल्यामुळे अकस्मात् त्याच्या अंगावर बीज पडून कंठगत प्राण होऊन पडला असतांना एका मुनीनी दयार्द्रबुद्धीनें त्याच्या कौत पंचनमस्कार मंत्र सांगितला. तो मंत्र ऐकत शांतवृत्तीनें मरण पावल्या- मुळे पुष्कलावती देशांतील पुंडरिकिणी पुरांत विद्युत्प्रभ राजाच्या विमलावती नामें पट्टराणीच्या उदरीं पुत्र होऊन जन्मला. तो जन्मतःच हातापायांनीं लुला, (पांगळा) कुब्जांगी झाला होता. त्याकारणाने राजा त्याचें मुख पाहतांच अत्यंत खेदखिन्न झाला. मग त्या बालकाचें नामकरणविधि वगैरे केलें नाहीं. पुढें तसाच तो बालक अनेक सुखदुःखें सहन करीत वाढून चार वर्षाचा झाला. त्याला बोळतां येत नव्हतें. म्हणून त्यास चंधु, चंबु बोलवू लागले.
त्यानंतर एकेदिवशीं त्या बालकाच्या पुण्योदयानें दोघे चारणमुनि त्या नगराच्या उद्यानवनांतील जिनचैत्याळयांत देवदर्शनास्तव आका- शमार्गे येऊन उतरले. तेव्हां त्या वनांतील वनपालकानें हर्षित होऊन ही शुभवार्ता राजास कळविली. त्यावेळी त्या वनपालकास त्या राजानें आपल्या आंगावरील वस्त्राभरणें उतरून दिलीं. मग राजानें सेवकांकडून नगरांत आनंदभेरी देवविळी. सर्व स्वजन, परिजन, पुरिजन यांच्यासह राजा पादमार्गे उद्यानांत मुनीश्वरांच्या दर्शनास गेला, तेथे गेल्यावर त्या मुनींद्रांस तीन प्रदक्षिणा घालून त्यांचीं बंदना, स्तुति, पूजा करून धर्मोपदेश ऐकण्यासाठीं त्यांच्या समीप जाऊन बसला. कांहीं वेळ त्यांच्या मुखें धर्मस्वरूप ऐकल्यानंतर राजा विनयानें आपलीं दोन्हीं करक- मलें जोडून मुनीश्वरांस म्हणाला, – भो भवसिंधुतारक महा- स्वामिन् ! आतां आपण आम्हांस या कुमाराचा भवप्रपंच सांगावा. हे त्यांचे विनय वचन ऐकून त्या मुनीशांनी त्याचा सर्व पूर्वजन्मींचा
वृत्तांत सांगितला. या कुमाराने आपल्या पूर्वजन्मांत मुनीश्वरांस मोठा उपसर्ग केला होता. त्या पापाच्या फळानें आतां याला असे दुःख भोगावे लागत आहे. या भवांत याची कुरुपावस्था दूर होऊन सुरूपा- बस्था प्राप्त व्हावी. अशी इच्छा असेल तर वस्तुकल्याणव्रत पालन करावें. म्हणजे कामदेवासमान सुंदर होईल, असे म्हणून त्यांनी त्यांना त्याचा सर्व विधि सांगितला.
पुढे कालानुसार त्यांनी है व्रत पाळून त्याचें उद्यापन केलें. त्यामुळे त्यांना इहलोकी अनेक भोगादि वैभवें मिळून त्यांची इच्छा पूर्ण झाली. आणि क्रमाने ते सद्गतीस गेले.