अर्थ – उत्तमजाति, उत्कृष्ट गृहस्थपणा, उत्तम योगित्व, उत्तम इंद्रपदवी, सहा खंडांचे आधिपत्य, उत्कृष्ट अर्हतपद आणि मोक्ष अशी सात परमस्थानें आहेत. बज्रदंत राजेंद्रांनी ज्या सात परमरथानांची भावना केली; त्यांची नांवें सांगितली. असो. आणि आपल्या अंगावरची सर्व वस्त्राभरणें उतरून त्या वनपालकांस दिली व सेवकांकरवी नगरी आनंदमेरी देवविळी. त्यानंतर आपण मत्तगजावर बसून सामंत, मांडलिक, परिजन व पुरजन यांच्यासह वर्तमान मोठ्या समारंभानें उद्यानवनांत गेले.
पुढें काळानुसार त्यांनी हें व्रत यथाविधि पाळून त्याचें उद्यापन केले. या व्रतप्रभावानें पुष्कळ काळपर्यंत चक्रवर्तिविभूतीचा सुखानें उपभोग घेऊन अंती या दुःखद संसाराविषयीं मनांत वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे वनामध्ये जाऊन त्यांनी एका निर्ग्रथ मुनीश्वरांच्या समीप जिनदीक्षा घेतली. दीर्घकाल घोरतपश्चर्या करून ते शाश्वत अश। मोक्षपदी विराजमान झाले. तेथें ते अनंत व अक्षय सुखाचा अनुभव घेऊं लागले. त्या सिद्धपरमेष्ठींस आमचा साष्टांग नमस्कार असो. आणि ते आम्हांस अखंड सुख प्राप्त करून देवोत. असा या व्रताचा महिमा आहे.
ReplyForward Add reaction
|