व्रतविधि – कार्तिक शु. ११ दिवशीं प्रमानीं या ब्रतिकांनी प्रासुक उदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावींत, सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि पूर्वक जिनेंद्रात भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. नंदादीप लावावा. मग पीठावर नवदेवता आणि चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्षबक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. आणि अष्ट द्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. चरु करावेत. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं अर्हं अत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुजिनधर्मजिनागमजिनचैत्य- चैत्यालयेभ्यो नमः स्वाहा ॥