व्रतविधि – फाल्गुन वद्य ३० दिवशी या व्रतधारकांनीं एक-भुक्ति करावी. आणि चैत्र शु १ दिनीं प्रभातीं सुखोष्ण जलानें अभ्यं-गस्नान करून अंगावर दृढधौतत्रस्ने धारण करावीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तोन प्रदक्षिणा घालून ईर्या-पथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर आदिनाथ तीर्थकर प्रतिमा गोमुखयक्ष चक्रेश्वरी यक्षीसह स्थानून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टदव्यांनीं त्यांची अर्चना करावी.