व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-ज्येष्ठ कृष्ण १ दिनी एकभुक्ति आणि ६ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत सात पाने लावणे, णमोकार मंत्राचे सात जप करणे, सात ७मिथुनांत भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करावा.
– कथा –
पूर्वी नागपूर नगरांत नागसेन राजा आपल्या नागदत्ता पट्ट-राणीश्ह राज्य करीत होता. त्यांना नागेंद्र नामक पुत्र व नागवसु नामे सून होती. बाकी सर्व परिवार होताच. एके दिवशीं शिवगुप्त-भट्टारक महामुनीश्वराजवळ यांनीं है व्रत ग्रहण केले. पुढे कालानुसार त्याचे पालन करून त्यांनी स्वर्गसुख व क्रमाने मुक्तिपुख मिळविले. असा दृष्टांत आहे.