व्रतविधि – वरील प्रमाणें सर्वविधि करावा, त्यांत फरक ज्येष्ठ कृ. ६ दिनीं एकभुक्ति व ७ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत आठ पाने लावणे, णमोकार मंत्राचे जप आठ करणे, आठ मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनीं त्यांचा सन्मान करणे.
– कथा –
पूर्वी गजपुर नगरांत राज्य करीत होता. त्यांना शिवाय पुष्कळ परिवार होता. गजदंत राजा गजगामिनी पट्टराणीसह गजकुमार पुत्र व गजवती सून होती. एकदां यांनी देवसेनाचार्य मुनीश्वरां-जवळ हे व्रत घेऊन त्याचे यथायोग्य पालन केले, त्यामुळे त्यांना स्वर्ग व क्रमाने अपवर्ग प्राप्त झाले. असा दृष्टांत आहे.