व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ कृ. १२ दिनीं एकभुक्ति व १३ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत पांच पार्ने लावणें, णमोकार मंत्राचे पांच जप करणे, पांच दंपींस भोजन करवून वस्त्रादिकांनीं त्यांचा सन्मान करणे,
– कथा –
पूर्वी महींद्रपूर नगराच्या महिपाल राजाने आपल्या महिला देवी राणीसह तथा महेंद्रकुमार पुत्र व महीदेवी सून इत्यादि परिवारासह एका महादिव्यज्ञानी मुनीश्वांजवळ हे व्रत स्वीकारून त्याचे यथाविधि पालन केले. त्यायोगे त्यांना स्वर्ग व क्रमाने अपवर्ग संपत्ति मिळाली. असा दृष्टांत आहे.