व्रतविधि – वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ कृ. १४. दिनीं एकमुक्ति व ३० दिवशीं उपवास, पूजा वगैरे. अशा नऊ पूजा झाल्यावर उद्यापन करणे, पात्रांत दोन पार्ने लावणें, दोन दंपतीस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करावा. दोन मुनींना शास्त्र, जपमाळा देणे.
– कथा –
पूर्वी किन्नरगीत नामक नगरांत श्रेष्ठ किन्नरकांत राजा किन्नर-देवी पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना किनरेंद्र नामे पुत्र व सुकिन्नरी सून होती. शिवाय किन्नागंगद मंत्री व त्याची स्त्रो किमित्रादेवी, कीर्तिकांत पुरोहित व त्याची मार्या कीर्तिमुखी, कीर्तिदत्त श्रेष्ठी व त्याची पत्नि कीर्तिवंती असा परिवार होता. या सर्वांनी एकदां कीर्तिसागर नामक मुनिराजाजवळ हे व्रत घेऊन याचे उत्तमरीतीने पालन केल्यामुळे त्यांना स्वर्गीय दिव्यसंपत्ति व क्रमाने शाश्वतसुखसंपत्ति मिळाली आहे. असा दृष्टांत आहे.