व्रतविधि- आश्विन शुक्लपक्षांतील प्रथम गुरुवारी या व्रतिकांनी एकभुक्ति करावी. आणि शुक्रवारी प्रातःकाळीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतत्रस्खें धारण करात्रींत. नंतर सर्व पूजा सामग्री आपल्या बरोबर घेऊन जिनमंदिरास जावं. तेथे गेल्यावर चैत्यालयांस तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणाम करावा. श्रीपीठावर पंचपरमेष्ठो प्रतिमा यक्ष यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. एका पाटावर पांच पार्ने क्रपाने मांडून त्यांवर गंधाक्षता, फळे, फुले वगैरे द्रव्ये लावावींत. नंतर पंचपरमेष्ठींचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत पूजा करावी. पंचपकांनांचे पांच चरु करावेत. नंदादीप लावावा. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी, यक्ष, यक्षी व क्षेत्रपाल यांचे अर्चन करावे.
ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं अर्हं अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने सुगंधी पुणे १०८ वेळां घालावींत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून शास्त्र स्वाध्याय करावा. ही व्रतकथा वाचावी. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. मग एका पात्रांत पांच पाने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करावे. आणि त्याने ओवाळीत तीन प्रदक्षिणा देऊन मंगलारती करावी. त्या दिवशीं उपोषण करावें, धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं सत्पात्रांस आहारादि दाने देऊन आपण पारणा करावी. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
याप्रमाणे हे व्रतपूजन पांच शुक्रवारी करून शेवटीं कार्तिक अष्टा-न्हिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळीं श्रीपंचपरमेष्ठिविधान करून त्यांस महाभिषेक करावा. चतुःसंघास आहारादि दानें द्यावेत. पांच मिथुनास भोजन करवून वस्त्र, तांबूल, पानसुपारी, हळद, कुंकू, केळीं व इतर फळे वगैरे देऊन त्यांचा सन्मान करावा. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
आतां हे व्रत पूर्वी ज्यांनीं यथाविधि पाळून सद्गती सावली आहे; त्यांची कथा सांगतों. ऐका, –
– कथा –
देवील नांवाचें एक सुंदर शहर आहे. तेथे पूर्वी देवसेन या नांवाचा एक मोठा बलवान्, नीतिमान् असा राजा राज्य करीत होता. त्याला देवकी नामें रूपवती, सुशोल अशी पट्टत्त्री होती. त्यांना देव-कुमार नामक पुत्र असून त्याला देवमतो नांवाची एक सुंदर व गुणवती श्री होती. तसेच त्यांचा देवाकर नांवाचा मंत्री असून त्याला देवसुंदरी नामें स्त्री होती. देवकीर्ति नामें पुरोहित असून त्याला देवकांती नांवाची स्त्री होती. देवदत्त नांवाचा राजश्रेष्ठी असून त्याला देवदत्ता नामक धर्मपत्नि होती, यांच्यासह तो राजा आनंदाने राज्यैश्वर्य मोगित असतां, एकदां त्या नगराच्या उपवनांत देवसागर नामक एक निर्भथ महामुनि आपल्या संघासह येऊन उतरले. हे वर्तमान राजांस कळतांच तो आपल्या परिवार व प्रजाजन यांसह पादमार्गे त्या मुनीश्व-रांच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर संघास तीन प्रदक्षिणा घालून भक्तीने साष्टांग नमस्कार करतां झाड़ा. नंतर त्यांच्या समीप बसून त्यांच्या मुखाने कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्यानंतर मोठ्या विनयाने आपले दोनी हात जोडून त्या मुनीश्वरांना म्हणतो, हे दयासागर स्वामिन् ! आज आम्हांस सर्वं सुखाला कारण असे एकादें व्रतविधान निरूपण करावें. हे त्यांचे विनय वचन त्यांनीं दारिद्यविनाशक है व्रत करण्यांस सांगून त्याचा काल व विधिही सांगितला मग त्या देवसेन राजाने त्यांना प्रार्थना करून हैं व्रत घेतले नंतर सर्वजन त्या मुनीश्व-रांना नमस्कार करून आपल्या नगरी परत आले. त्यानतर योग्य काळीं त्यांनीं ते व्रत पाळून त्याचे उद्यापन केले. त्या व्रतपुण्यवलानें शेवटीं समाधीनें मरण पावून स्वर्गात गेले. तेथे पुष्कळ काल सुख भोगून क्रमानें मोक्षास गेले आहेत. असा हा पूर्ण दृष्टांत आहे.