पंचभक्ष्यपावसांचे चरु करावेत. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षी व अश्हदेव बांचे अर्चन करावें. ॐ हीं श्रीं क्लीं ऐं अहे चतुर्विं-शतितीर्थकरेभ्यो यक्षयक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुष्र्षे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ जप एक करात्रा. एका पात्रांत २४ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महाये करावे, त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी, सलात्रांस आहारदान द्यावे. आपण उपवास शक्तीप्रमाणे करावा. ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालत्रावा.
याप्रमाणें प्रत्येक अष्टमी व चतुर्दशी दिवशीं पूजा करावी. नित्य क्षोराभिषेक करावा. असा क्रम चार महिने चालवून शेवटीं कार्तिक शु. १५ दिवशीं याचे उद्यापन करावें. त्यावेळीं सम्मेदशिखरजी विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दानें द्यावींत. अस याचा पूर्णविधि आहे.
पूर्वकालीं वृषभादि चोवीस तीर्थकरांच्या गर्भावतार, जन्माभिषेक, दीक्षा, केवलज्ञान व निर्वाण या पांच प्रसंगीं पूजा करण्यामध्ये चाळीस भत्रनेद्र, बत्तोस व्यंतरेंद्र, चोवीस कल्पामरेंद्र, एक सूर्य, एक चंद्र, एक नरेंद्र आणि एक मृगेंद्र असे हे शंमर इंद्र येऊन मक्तीने महो-त्सव करून पाहून पुण्य संपादन करतात. यांनीं क्रमाने अनंतसुख मिळविले आहे.
– कथा –
घातकीखंडांतील मंद्र नामक मेरूपर्वताच्या उत्तरभागीं ऐरावत नांवाचे एक क्षेत्र आहे. त्यांत भूतिलक नांवाचे एक सुंदर पट्टण आहे. तेथे पूर्वी अभयघोष नांवांचा एक नीतिमान् व पराक्रमी राजा राज्य करीत होता. त्याला कनकलता नांवाची एक रूपवती, गुणवती पट्टराणी होती. तिच्या पोटीं जय व विजय नांवाचे दोघे पुत्र होते. सर्वपरिवारासह सुखानें कालक्रमण करीत असतां, एके दिवशीं सिद्धकूट चैत्यालयांचे दर्शन
करण्यासाठीं तो गेला होता. तेव्हां तेथील चैत्यचैश्यालयांचे दर्शन करून सभामंडपांत आला. तेथे चारण मुनीश्वरांचे दर्शन करून धर्मोपदेश ऐकत त्यांच्या समीप बसला. कांहीं वेळाने आपला मवपपंचदि ऐकून आनंदित झाला. मग एकादै व्रतविधान निरूपण करण्यास राजांनी विनंती केल्यावरून त्यानीं है शतेंद्र व्रत करण्यास सांगून सर्वविधि कथन केला. मग राजांनी हे व्रत ग्रहण केले. मग सर्वजन आपल्या नगरीं परत आले, पुढे कालानुसार है व्रत सर्वांनीं विधियुक्त पाळिले. पुढे कोणत्याहि निमित्तानें मनांत वैराग्य उत्पन्न झाल्याने राजाने वनांत जाऊन एका निर्मथ मुनीजवळ जिनदीक्षा घेतली. घोर तपश्चर्येने आणि त्या व्रतपुण्यफलानें स्वर्गात देव झाला. पुढे तेथून च्यवून उत्तम राज-कुळांत उत्पन्न झाला. तेथे त्यांनीं पुष्कळ काल संसारसुख भोगून शेवटीं निर्मंथदीक्षा घेऊन खडतर तपश्चर्या केलो, त्यामुळे ते सर्व कर्माचा नाश करून मोक्षास गेले आहेत.