व्रतविधि – चैत्र मासाच्या शुक्लपक्षांतील प्रथम सोमवारी या व्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि मंगळवारी प्रभावीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्ने धारण करावीत. सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर अनंतनाथ तीर्थकर प्रतिमा किन्नरयक्ष व अनंतमतीयक्षीसइ स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी, श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे, देवापुढे नंदादीप लावावा. पंचरकालाचे बारा चरु करावेत. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐंं अर्हं अनंतनाथतीर्थंकराय किन्नरयक्ष-अनंतमती यक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें बाळा-बींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी, एका पात्रांत महार्थ करून त्याने ओवाळीत मंदिरास हीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी, त्यादिवशी उपवास करावा, संस्पात्रांत आहा-रादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारण करावें, तीन दिवस ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत घालवावेत.