व्रतविधि-फाल्गुन शु. ७ दिवशीं या व्रतिकांनी एक मुक्ति करावी. आणि ८ दिवशीं प्रातःकाळीं शुचि जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौत वस्ने धारण करावीत. मग सर्व पूजा साहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रांस मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रोपीठावर नंदीश्वर बिंब आणि तीर्थंकर (भूनकाल तीर्थकर प्रतिमा यक्षयक्षीसहित स्थापून त्याचा पंचामृतांनी अभिषेक करावा. नंतर त्या प्रतिमा पंचमंदरावर स्थापून एका पाटावर नऊ स्वस्तिकें काढून त्यांवर नऊ पाने मांडावीत. आणि त्यांवर अष्टद्रव्ये ठेवावींत. निर्वाणापासून अंगीरापर्यंत नऊ भूतकाल तीर्थकरांचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला ह्रीं म्हणत अष्टद्रव्यांनीं पूजा करावी. पंचभक्ष्यपायतांचे चरु करावेत. श्रुत व गुरु यांचो अर्चना करावो, यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे पूजन करावे. ॐ ह्रीं अर्हं अंगिर तीर्थंकराय यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुष्पे घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्र नामस्तोत्र म्हणून शास्त्रस्वाध्याय करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत नऊ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावा. आणि त्यानें ओवाळत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करावा. सत्पात्रास आहारादि दानें द्यावीत. धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे, तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
है व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केल्यामुळे ज्यांना पूर्वी सर्व अभ्युदय सुखे प्राप्त होऊन पुढें क्रमाने मोक्षसुखहि प्राप्त झाले आहे त्याची कथा तुम्हांस सांगतो. एकाग्र मनाने ऐका, –
पुढे एके दिवशी रात्रींच्या वेळीं आकाशांतून होणारा उल्कापात त्या प्रजापाळ राजाच्या दृष्टीस पडला. त्यामुळे त्याच्या मनांत या संसा राविषयीं प्रबल वैराग्य उत्पन्न झाले. तेव्हां तो आपल्या पुत्रास राज्यभार देऊन वनांत गेला. आणि तेथील शिवगुप्ती मुनीश्वराजश्ळ जिनदीक्षा घेऊन घोर तपश्चर्या करू लागला. त्यायोगाने तो अंतकाळीं समाधिविधीने मरण पावून अच्युत स्वर्गात देवेंद्र शाला, तेथे तो इंद्र दीर्घकाळ पुष्कळ सुख भोगून आयुष्यांतीं तेथून च्यवून – या जंबुद्धोपांतील भरतक्षेत्रांत काशी देशांत वाराणसी नामक मनोहर नगर आहे. पूर्वी तेथे इक्ष्वाकुवंशो पद्यनाम नांवाचा एक मोठा शूर न्यायवंत व धार्मिक असा राज राज्य करीत होता. त्याला पद्यावती महादेवी नामक एक अत्यंत रूपवती, लावण्यवती व गुणवती अशी महाराणी होती. तिच्या उदरीं तो पूर्वोक्त देवेंद्र ‘पद्मदत्त’ नामक पुत्र झाला. तो युवावस्थेंत आल्यावर चक्रवर्ति राजा होऊन साम्राज्यैश्वर्य भोगूं लागला.