व्रतविधि – माघ शु. ४ दिनीं या व्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि १ दिवशीं प्रभातीं शुचि जलाने अभ्यंग स्नान करून अंगा-वर दृढ धौत वर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. देवापुढे नंदादीप लावावा. पीठावर सन्मति (भूतकाल) तीर्थकर प्रतिमा यक्ष यक्षीसह स्थापून अभिषेकाच्या मंत्राने त्यांचा पंचामृतानीं अभिषेक करावा. शुद्ध पाटावर दहा स्वस्तिके काढून त्यांवर दडा पार्ने मांडावीत. आणि त्यांच्यावर अष्टद्रव्ये लावावीत. निर्वाणादि सन्मतीनाथ (भूतकाल) तीर्थंकरांचीं अष्टद्रव्यांनीं पूजा करावी, पंचपकानांचे चरु करावेत. श्रुत व गुरु यांचो अर्चना करावीं. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे पूजन करावें. ॐ ह्रीं अर्हं सन्मति जिनाय यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुणे घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून सन्मति प्रभूचे चरित्र वाचावे. ही व्रतकथाहि वाचावी. नंतर एका पात्रांत दहा पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्द करावा. आणि त्याने ओवाळोत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी, त्या दिवशी उपवास करून घमेध्यानांत काल घालवावा. सत्या-श्रांत व्याहारादि दाने यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे.
श्रीअनंतनाथ तीर्थंकरांच्या तीर्थसंतान कालामध्ये चंद्रसेन नांवाचा राजपुत्र त्यांच्या समवसरणांत गेला होता. तो तीन प्रदक्षिणा-पूर्वक वंदनादि करून मानत्र कोष्ठांत जाऊन बसला. असतां, – त्यांच्या मुखकमलांतून प्रकट होणाऱ्या दिव्यध्वनींचा घर्मोपदेश कांहीं वेळ श्रवण केल्यावर तो मोठ्या विनयानें दोन्हीं करकमले जोडून श्रीजयार्य गण-धरांस म्हणाला, हे भवसिंधुतारक स्वामिन् ! आतां आपण आम्हांस सर्व सुखाला कारण असे एकादें व्रतविधान निरूपण करावें. हे त्याचे नम्र भाषण ऐकून ते गणेंद्र त्यास म्हणाले, हे भव्य राजन् ! आतां हरिषेण चक्रवर्तिव्रत है तुम्हांस पालन करण्यास अत्यंत उचित आहे. असे म्हणून त्यांनीं त्या व्रताचा सर्व विधि सांगितला. ते ऐकून त्याला मोठा आनंद झाला. मग त्यानें से व्रत त्यांना वंदना करून घेतले. नंतर तो आपल्या नगरी परत आला पुढे त्याने ते व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केले.
इकडे तो हरिषेण राजा श्रावकांचीं व्रते घेऊन उत्तम रीतीने पाळू लागला. पुढे कांहीं दिवसांनी त्या पद्मनाथ मुनीश्वरांस केवलज्ञान उत्सन्न झाले. त्याचवेळीं त्या हरिषेण राजाच्या आयुध शाळेत असि, छत्र, चक्र वगैरे चौदा रत्ने व गृहीं शंख, नैसर्थ वैगैरे नऊ निधी उत्पन्न झाले. ही शुभवार्ता त्या हरिषेण राजास समजतांच तो त्या वृत्तहारकांस आपल्या अंगावरील वस्त्रालंकार देऊन प्रथम त्या पद्मनाथ केवली मुनींची पूजा करण्यासाठीं गेला. तेथे गेल्यावर तो त्या केवली मुनींस मोठ्या भक्तीनें तीन प्रदक्षिणापूर्वक नमस्कारादि करून नगरी परत रत्नाची पूजा केली. आपल्या नगरी परत सर्वांनी मिळून त्याला आला. नंतर त्यानें आयुष शाळेत जाऊन त्या चक्र मग तो दिग्विजयास जाऊंन षट्खंडपृथ्वीं साधून आला. तेव्हां राजे, महाराजे, विद्याधरराजे वगैरे साम्राज्याभिषेक केला. पुढें तो पुष्कळ काल साम्राज्यैश्वर्याचा अनुभव घेऊ लागला.