व्रतविधि – कार्तिक शु. १० दिवशी या बत ग्राहकांनी एक-सुक्ति करावी. आणि ११ दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौत वस्त्रे धारण करावीत. मग सर्व पूजा सामुओ हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन पदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्री जिनेंद्रांस भक्तीनें साष्टांग प्रणाम करावा. नंदादीप लावावा. मग श्री पीठावर भूतकाल श्री कुसुमांजलि तीर्थकर प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून त्यांचा पंचा-मृतांनी अभिषेक करावा. एका पाटावर १२ स्वस्तिकें काढून त्यांच्यावर पान, सुपारी, फलें फुलें, गंधाक्षता वगैरे ठेवावीत. निर्वाणापासून कुसुमांजली तीर्थ करापर्यंत बारा तीर्थकरांचीं अष्टद्रव्यांनीं पूजा करावी. नैवेद्ये करावीत. श्रुत व गुरु यांचे पूजन करावे. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं अर्हं श्री कुसुमांजलि तीर्थंकराय यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून कुसुमांजलि तीर्थकर चरित्र वाचावें. हीं व्रतकथा वाचावी. मग एका पात्रांत १२ पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्यै व एक नारळ ठेवून महाध्य करावा. आणि त्याने ओवाळीत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवर्शी उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दानें धावींत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें.या प्रमाणें महिन्यांतून एकदां त्याच तिथीस है व्रतपूजन करावें. अशा बारा पूजा पूर्ण झाल्यावर शेवटीं कार्तिक अष्टान्हिकांतच याचे उद्यापन करावें. त्यावेळीं कुसुमांजलितीर्थंकर विधान करून महाभिषेक करावा. १०८ कमलांची पुष्ने घालावीत चतु संवास चरी दाने द्यार्थीत दोन अनाथांना अभयदान द्यावे. १२ दंपतीस आपल्या घरी भोजन करवून त्यांना नूतन वस्त्रांचा आहेर करावा. आणि त्यांच्या ओटीत पान, सुपारी, नारळ, फळे फॐ गंधाक्षता बरे घालून त्यांचा सन्मान करावा. जोर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करावा. नूतन मंदिर बांधवून त्याचो पतिष्ठा करावी, मंदिरांत आवश्यक उपकरणे ठेवावीत असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
कथा-
है बत पूर्वी ऐरावत क्षेत्रांत वीरसेन राजानें पाळिले होते. त्या योगाने तो पुढे या भरतक्षेत्रामध्ये ब्रम्हदत्त नामक चक्रवर्ति राजा झाला. भावी कालीं तोच तोर्थकर होणार आहे. असा या बठाचा दृष्टांत आहे.