या जंबूद्वीपातील भरतक्षेत्रांत आयखंड आहे. त्यांत कर्नाटक नामक विस्तीर्ण देश असून त्यामध्ये त्रयोदशपुर (तेरदळ) नामक एक सुंदर नगर आहे तेथे पूर्वी बंकभूपाल नांवाचा महापराक्रमी राजा होता. त्याला लक्ष्मीमति नाम सुंदर व धर्मनिष्ठ अशी एक पट्टराणी होती. मंत्री, पुरोहित, राजश्रेष्ठी, सेनापत्ति वैगैरे परिवारजन होते. यांच्यासह वर्तमान तो राजा सुखाने कालक्रमण करीत असतां, एके दिवशीं विद्यानंदी व माणिक्यनंदी या नांवाचे दोषे निश्रेथ महा-सुनीश्वर चर्षे निमित्त राजवाड्यासमीप आले तेव्हां त्या बंकभूपाल राजानें त्या मुनीश्वरांच्या समीप नाऊन त्यांचे यथाविधी प्रतिग्रहणकरून त्यांना आपल्या पाकगृहांत नेले, तेथे त्यांना यथाविधी नवधा-मक्तीने आहारदान दिले. मग ते मुनीश्वर एका आसनावर बसले, नंतर त्या राजाने विनयाने त्या मुनीश्वरांस पार्थना करून म्हटलें, हे भवसिधुनारक स्वामिन् । आतां आपण आम्हांला सर्व सुखाला कारण असे एकादें बतविधान सांगावे. हे त्याचे नम्र वचन ऐकून ते मुनीश्वर त्याला म्हणतात, हे भव्य राजन् ! तुम्हाला नागश्री हे व्रत पालन करण्यास अत्यंत योग्य आहे. आतां या व्रताचा काळ व विधि सांगतो.
व्रतविधि – चैत्रादि द्वादशमासांतून कोणत्याहि मासाच्या शुक्ल पक्षांतील द्वितीया दिवशीं एकभुक्ति करावी. आणि तृतीये दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे बारण करावीत, मग सर्व पूजाद्रव्ये आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा करून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रांस मक्तीने साष्टांग प्रणिपात करावा, नंदादोप लावावा. नंतर श्रीमूकनायक पीठावर श्रीरत्नत्रय प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. आणि देवापुढे एका पाटावर तीन स्वस्तिकें काढून त्यांवर तीन पाने मांडावींन, त्यांवर गंधाक्षता फलें, फुळे वगैरे ठेवावीत. आणि रत्नत्रय तीर्थकरांचीं (अरनाथ, मल्लिनाथ व मुनिसुव्रत यांचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनी पूजा करावी. पंचपकान्नांचे चरु करावेत. श्रीसरस्वती व गणधर यांची अर्चना करावी. नंतर यक्ष, यक्षों व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं अर्हं अरमल्लिमुनिसुव्रत तीर्थंकरेभ्यो यक्षयक्षी-सहितेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्धे घालावीत. णमो कार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून रत्नत्रय तीर्थकर चरित्रे वाचावीत. ही व्रतकथाहि वाचावी. मग एवा पात्रांत तीन पार्ने मांडून त्यांच्यावर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करावा. आणि त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करून धर्मध्यानांत काल घाल वावा, सत्पात्रांत आहारादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे, तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.