व्रतविधि-चैत्रादि बारा मासांतून कोणत्याही मासाच्या शुम-दिवशींच्या पूर्व दिवशीं या व्रतधारकांनी एकमुक्ति करावी. आणि दुसरे दिवशी पालुकजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वस्ने धारण करावीत. आणि सर्व पूज्जाद्रव्ये हातीं घेऊन मंदिरास जात्रे, तेथे गेल्यावर जिनालयास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेद्रास भक्तोने साष्टांग पणिपात करावा. नंदादीप लावावा. आणि कन्या हमावर ओपीठावर श्रीसुमतिनाथ तीर्थकर प्रतिमा तुंबरु पुरुषइत्ता यज्ञयक्षोसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा, एका पाटावर पांच स्वस्तिक काढून त्यांवर पांच पाने मांडावीत. आणि त्यांच्यावर गंधाक्षता, फलें, फुले वगैरे द्रव्ये ठेवावीत. आणि वृषभा-पासून सुमतिनाथापर्यंत पांच तीर्थकराचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनीं पूजा करावी. पंचभक्षपायसांचे चरु करावेत, श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षो व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं अर्हं श्रीसुमतिनाथाय तुंवरुपुरुषदत्ता-यक्षयक्षी सहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्र्षे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून सुर्मात तीर्थकर चरित्र आणि ही व्रतकथाहि वाचावी. मग एका पात्रांत पांच पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावा, आणि त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी, त्यादिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घाल-वावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. दुसरें दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.