तेथे पूर्वी बजसेन नांवाचा मोठा पराक्रमी व गुणशाळी असा राजा राज्य करीत होता. त्याला भूपणा नामक अति सुंदर, रूपवती व गुणवती पहराणी होती. हे दोघे सुखानें राज्यवैभवांत आपढ़ें आयुष्य कमीत असतां, एके दिवशी त्या नगराच्या बाहेर सौंधर नामक उद्यानांत देवचंद्र व वरचंद्र या नांवांचे दोघे अवधिज्ञानी चारणमुनि गगनमार्गे येऊन उत्तरले. त्या बनांत त्यांच्या आगमनानें सर्व वृक्ष फळे, पुष्वें, पल्लवें यांनी अत्यंत भरित होऊन शोभवंत दिसूं लागले हें पाहून तेथील वनपालक आश्चर्यचकित होऊन कांहीं सुंदर फलपुष्पें घेऊन राजसभेत गेला आणि तीं राजापुढें ठेऊन मोठ्या आदरानें दोन्ही हात बिनयानें जोडून राजांस म्हणू लागला कीं; – हे राजाधिराज ! आपलें शुभ भाग्य आज उद्यास आले आहे. कारण आज आपल्या सौंधर उद्यानांत दोघे चारणऋद्धिधारक महामुनी येऊन अवतरले आहेत. हॅ शुभवृत्त ऐकतांच राजास अत्यंत आनंद झाला. तो तत्काल सिंहासना- बरून उत्तरून ते मुनीश्वर ज्या दिशेस होते त्या दिशेकडे सात पाऊलें (सप्तपदें) चालत जाऊन मोठ्या नम्रतेनें परोक्ष नमस्कार करता झाला, आणि आपल्या अंगावरील वस्त्राभूषणें वनपालकास देतां झाला. मग सेवकांकडून सर्व नगरांत आनंदमेरी देववून सर्वपरिजन पुरजन यांच्या सह बर्तमान तो त्या मुनीश्वरांच्या दर्शनास पादमार्गे उद्यानास गेला. मुनी- श्वरांना तीन प्रदक्षिणा देऊन मोठ्या भक्तीनें वंदना, पूजादि करून त्यांच्या समीप जाऊन बसला. नंतर त्यांच्या मुखें कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्यावर राजाची पट्टस्त्री भूषणादेवी ही आपले दोन्ही हात जोडून विनयानें मुनींद्रांस म्हाणाली, भो महागुरो ! स्वामिन् ! सांप्रत मजला पुत्र संतान नाहीं. याचें कारण काय असावे ? हें निवेदन मला करावें. हे तिचें नम्र वचन ऐकून ते मुनीश म्हणाले, हे कन्ये ! तूं पूर्व भत्रांत’ कनकमाला’ व्रत पूर्ण रीतीनें पालन न करतां मध्येंच सोडून दिलेस. त्या कारणानें आतां तुला पुत्र संतानाचा अंतर पडला आहे.
ReplyForward Add reaction
|