व्रतविधी – आषाढ शु. ८ दिवशी प्रभाती या व्रतिकांनीं शुचि जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत. सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयीं जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करून जिनेंद्रांस भक्तींनें नमस्कार करात्रा. पीठावर जिनेंद्राची प्रतिमा यक्षयक्षीसहित स्थापून तिचा पंचा- मृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची पूजा करून श्रुत व गुरुयांची पूजा करावी, तसेंच यक्ष, यक्षी, ब्रम्हदेव यांचें अर्चन करावें. ॐ हीं श्रीं क्लीं ऐं अई परमब्रम्हणे अनंतानंतज्ञानशक्तये अईत्परमेष्ठिने नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रानें १०८ फुलें घालावीत. जिन सहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी.
या क्रमानें सात दिवसपर्यंत त्रिकाळपूजा करावी. मात्र त्या वेळीं पंचवर्णानीं चतुष्कोनाकृति पंचमंडळें भूमीवर काढून त्यामध्ये तांदूळ पसरून मध्यभागी एक कलश ठेवावा. त्यावर एका पात्रांत जिनबिंव स्थापून त्याची अर्चना अष्टद्रव्यांनीं करावी. चार कोनामध्यें चार समयांत चार दिवे लावून ठेवावेत. चतुर्दशींच्या दिनीं या व्रताचे उद्यापन करावें. त्या वेळीं चार वेळां जिनेंद्र भगवंतास अभिषेक करून अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी. पंचभक्ष्य, ४ नैवेद्ये करून त्यांस अर्पण करावी. ४ निरंजनें, ४ कलश, हीं उपकरणें देवापुढे ठेवावींत. चार वायनें करून त्यांतून देव, शास्त्र, गुरु यापुढें एकेक ठेवून आपण एक घ्यावें घरों जाऊन चार ऋषींना आहारदान देऊन आपण पारणा करावी. हाच या व्रताचा उद्यापन विधी होय.
– कथा –
नित्य नियमाप्रमाणें मागधाधिपति महामंडलेश्वर श्रेणिक महाराज हे एकदां आपले सर्व स्वजन व परिजन आणि पुरजन यांच्या सह वर्तमान विपुलाचलावर महावीर स्वामींच्या दिव्य समवसरणांत मोठ्या आनंदानें प्रवेश करून त्यांच्या चरणीं भक्तीनें वंदना पूजादि करून मनुष्य कोष्ठांत जाऊन बसले. तेव्हां भगवंतांच्या मुखकमळांतून उत्पन्न होणाऱ्या दिव्यध्वनिचा उपदेश शांतचित्तानें श्रवण केल्या नंतर ते आपले दोन्ही कर जोडून नम्रतेनें गौतमगणेंद्रास म्हणाले- हे भव- सिंधुतारक जगद्गुरो ! आमच्या या बारा प्राणवल्लभा स्त्रियां आपल्या पूर्वभवांत कोण कोणती व्रतें पालन करून पुण्यसंचविल्या ? ज्यामुळे आमच्या येथे एकत्र मिळाल्या आहेत. हे कृपा करून आतां आपण आम्हांस निवेदन करावें. ही त्याची विनयोक्ति ऐकून ते गौतम गणेश त्यास म्हणाले, हे भव्यशिखामणे राजन् ! आतां तुम्हांस या स्त्रियांचा पूर्वभवींचा वृत्तांत सांगतो, चित्त देऊन ऐका, या तुझ्या बारा प्रिय कांता मार्गे आपल्या तृतीय भवांत उज्जयनी पट्टणांत एका प्रधानाच्या सहोदर कन्या होत्या. त्यांनी एका पिहितास्रव नामें भट्टारकांच्या सन्निध अन्योन्य-एकमेकव्रतें भक्तीनें घेऊन यथाविधी पालन केलीं होती. ह्या व्रताच्या माहात्म्याने ह्या सर्व स्त्रिया आपल्या आयुष्यावसांनीं समाधि- विधीनें मरण पावून सौधर्म स्वर्गात देवी झाल्या व तेथें पुष्कळ सुखाचा अनुभव घेऊन आयुष्यांती च्यवून या लोकीं आतां निरनिराळ्या राज- कुलांत राजकन्या झाल्या आहेत आणि तुझ्या प्राणप्रिया झाल्या आहेत. आतां क्रमानें त्यांचें वृत्त सांगतो ऐका, १ चलना देवीनें आपल्या पूर्वभवांत हे विनयसंपन्नता व्रत श्रीगुरूंच्या सन्निध ग्रहण करून यथाविधी पालन व उद्यापन केले होते. त्यामुळे तुमची आवडती राणी झाली आहे. बिजयावती देवानें कल्पामर व्रत केलें होतें. ३ जयावती देवीनें केवळबोधव्रत ४ सुमती राज्ञीनें चारित्रमान ५ वसुधा राणीनें श्रुतस्कंध, ६ नंदा देवीनें त्रैलोक्यसार, ७ लक्ष्मीदेवीनें दुर्गतिनिवारण, ८ मळ्यावती पत्नीनें कल्याणतिलक, लळितांगीनें अनंतसुख, १० सुभद्रेनें समाधिविधान, ११ श्यामादेवीनें भवदुःखनिवारण १२ बिमला कांतेनें मोक्षलक्ष्मीनिवास असे या द्वादश खियांनीं द्वादशव्रतें केळी होतीं. म्हणून त्या पुण्यप्रभावाने आतां तुमच्या माणवल्लभा झाल्या आहेत. असो.
ह्या शिवाय एकदां श्रीकुंदकुंदाचार्य महामुनि हे आकाशमार्गानें विमानांतून विदेहक्षेत्रामध्ये सीमंधर तीर्थकरांच्या समवसरणांत गेले होते. तेथे गेल्यावर त्यांनीं तीर्थकरांच्या चरणीं भक्तीनें वंदना करून त्यांच्या दिव्यध्वनीच्या द्वारे आपल्या मनांतील सर्व तत्त्वपदार्थाविषयीं शंका निरसन करून घेतल्या आणि भव्य प्राण्यांच्या हितार्थ व स्वर्ग- मुक्ति प्राप्ती करून देण्यास उपायभूत अर्शी बारा महिन्यांतील हीं बारा व्रतें सविस्तर समजून घेतलीं. असो.
आतां चलना देवीनें पूर्वभवांत केलेल्या या विनयसंपन्नता व्रताचा काल व विधि सांगतो ऐका. असें म्हणून त्यांनी या व्रताचा सर्व विधी सांगितला. हे सर्व कथन गौतम स्वामींच्या मुखें ऐकून सर्वास अत्यानंद झाला. मग त्या सर्व स्त्रियांनीं हैं व्रत श्रीगुरूंच्या सन्निध ग्रहण केलें. नंतर नगरी परत आल्यावर काळानुसार हे व्रत यथाविधी पाळून त्याचें उद्यापन केलें. पुढें व्रतमाहात्म्यानें त्यांना सद्गती प्राप्त झाली.