व्रतविधि – आषाढ शु. ५ दिनीं या व्रतिकांनीं शुचि जलानें अभ्यंगस्नान करून आंगावर दृढधीत वर्षे धारण करावींत. सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करून जिनेंद्रास भक्तीनें नमस्कार करावा.
श्रीपीठावर पंचपरमेष्ठी मूर्ति स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक कराया. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. आणि पंचपरमेष्ठींच्यापुढे त्यांची नांवें उच्चारून पांच अक्षतांचे पुंज घालून त्यांवर पांच सुपाऱ्या, पांच पुष्पें, लाडू, फले वगैरे ठेवावें, ॐ प्हां हीं हूं हाँ हः असिआ- उसा नमः सर्वशांतिर्भवतु, स्वाहा ।। या मंत्रानें अथवा ॐ नमः पंचपरमेष्ठिभ्यः स्वाहा ॥ या मंत्रानें त्यांना एकेक अर्थ द्यावें. आणि शेवटीं १०८ पुष्पें घालावीत. ही व्रतकथा वाचावी. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत
मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. उपवासादि शक्ती- प्रमाणें करावें. ब्रम्हचर्य पाळावें. याच क्रमानें प्रत्येक मासांतील शु. ५ दिवशी पूजाक्रम करावा. पांच महिने पूजा करावी. व प्रतिदिनीं पंचपरमेष्ठीस क्षीराभिषेक करावा. शेवटीं याचे उद्यापन करावें. त्यावेळीं श्रुतस्कंधाची यथाविधि प्रतिष्ठा करावी. त्या सर्व देवांस सेवायांचे पांच, पायसांचे पांच, कोडबुळ्यांचे पांच, करंज्यांचे पांच व पोळ्यांचे पांच चरू करावेत. चतुःसंघास आहा-
रादि दानें द्यावीत. असा या व्रताचा पूर्ण विधी आहे.
– कथा-
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत मगध नांवाचा विशाल देश आहे. त्यांत सौंदर नांवाचे एक मनोहर नगर आहे. तेथे पूर्वी विश्वसेन या नांवाचा राजा राज्य करीत असे. तो पराक्रमी पण धर्मशाली होता. त्याला सौंधरी नामें एक सुंदर, गुणवती पट्टराणी होती. हे दोघे सुखानें व सत्कथा विनोदानें राज्योपभोग करीत असतां, – एके दिवशीं वनपालक फलपुष्पादि घेऊन येऊन राजापुढें सभेत मोठ्या विनयानें ठेवून नमस्कार करून म्हणाला, – हे राजाधिराज ! आज आपल्या भाग्योदयानें आमच्या उद्यानांत श्रीमहावीर स्वामींचे
समवसरण आलें आहे. ही शुभवार्ता ऐकतांच आनंदानें तत्काल सिंहा- सनावरून उठून त्या उद्यानदिशीं सात पाऊलें चालून भक्तिभावानें परोक्ष नमस्कार राजानें केला. आणि आपल्या आंगावरील बत्रालंकार त्याला दिले. नंतर नगरांत आनंदमेरी देववून तो आपल्या पांचशें राण्या, परिजन, पुरजन, बंधुजन यांसर्वासह मोठ्या थाटानें समवसरणांत गेला. भगवंतांस तीन प्रदक्षिणा देऊन वंदन, पूजनादि करून तसेंच गौतमादि गणधर मुनीश्वरांना नमस्कार, पूजा आटोपून मानव कोष्ठांत जाऊन बसते झाडे. तेव्हां वीरप्रभूच्या दिव्यवाणीचा उपदेश कांहीं वेळ ऐकल्यावर ते विश्वसेन महाराज आपले दोन्ही करकम- लास कळीप्रमाणें जोडून नम्रतेनें गौतम गणधरांस म्हणाले, हे संसार- सागरोत्तारक जगद्गुरो ! आतां आपण आम्हांस अनंतसुखाला कारण असें एकादें व्रतविधान सांगावें. हे त्यांचे विनयपूर्ण वाक्य ऐकून ते गणेश म्हणाले, हे भव्योत्तम राजन् ! आतां तुम्हांस ‘पंचालंकार’ हे व्रत पालन करावयास अतिशय योग्य आहे. हें व्रत जो मानव भक्तीनें ग्रहण करून विधिपूर्वक पाळतो त्यांस उत्कृष्ट पुण्यबंध होतो आणि त्याच्या अशुभ कर्माचा नाश होऊन त्यास स्वर्गादि संपत्ति आणि क्रमाने मोक्ष मिळतो. असे म्हणून त्यांनीं या व्रताचा सर्वविधी सांगितला. हे ऐकून सर्वास अतिशय आनंद झाला. मग त्यांनी त्या गुरुवयास नमस्कार करून हे व्रत त्यांच्याजवळ ग्रहण केलें. नंतर सर्वजन भक्तीनें जिनेंद्रादि सर्व विभूस वंदना करून आपल्या नगरी परत आले. पुढें समयानुसार त्या विश्वसेन महाराजांनीं हूँ व्रत विधिपूर्वक पालन करून त्याचे उद्यापन केलें.
त्या नंतर संसाराविषयी त्यांच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाल्यानें त्यांनीं गुरुकडून जिनदीक्षा घेऊन खडतर तपश्चर्या केली व अंतीं समाधिविधीनें देहत्याग करून पांचव्या स्वर्गाची प्राप्ति करून घेतली. तेथे ते पुष्कळ सुख पुष्कळ काळ भोगून आयुष्यांतीं तेथून च्यवून या
मानवलोकी चक्रवर्ति राजे झाले. तेथे अनेक ऐश्वर्याचा अनुभव घेऊन शेवटीं दीक्षा धारण करून घोर तपश्चर्या करते झाले. त्या तपोबठानें सर्व कर्माचा क्षय करून ते मोक्षास गेले.