व्रतविधि – भाद्रपद कृ. ६ षष्ठी दिवशीं प्रातःकाळीं या व्रति- कांनी सुखोष्णजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर शुद्ध दृढधौत वस्खें धारण करावीत. सर्व पूजासामग्री हातीं घेऊन मंदिरास जावें. जिना- लयास तीन प्रदक्षिणा करून ईर्यापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रांस भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. मंडप श्रृंगार करून चंद्रोपक बांधून देवापुढे शुद्धभूमीवर पंचवर्णानीं-षष्ठदल – चंद्रषष्ठीयंत्र-दळ-कमल काढून सभों- वतीं चतुरस्रपंचमंडळे काढावीत. अष्टमंगल कुंभ व द्रव्यें ठेवून मध्यें सुशोभित कुंभ ठेवावा. अशा रीतीनें सर्व सुसज्जित करावें. नंतर पीठावर चंद्रप्रभ तीर्थकर प्रतिमा अजित (श्याम) यक्ष ज्वालामालिनी यक्षीसह आणि चंद्रषष्ठीयंत्र स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. नंतर तीर्थकर प्रतिमा यक्षयक्षीसह व यंत्र त्या मध्यकुंभावर एका पात्रांत सुशोभित करून ठेवावा नित्यपूजाक्रम सर्व करून नंतर चंद्रषष्ठी व्रतपू- जाविधान करावें. या प्रमाणें सर्व पूजाविधि यथार्साग करावा.
याच क्रमानें चार वेळां पूजाविधान करावें. ३६ चरु करावेत.
त्यानंतर श्रुत व गुरु पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचें अर्चन करावें. आणि ॐ हीं श्री क्लीं ऐं अई श्रीचंद्रप्रभतीर्थकराय श्याम- यक्ष ज्वालामालिनीयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. मग एका पात्रांत सहा पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्यें लावावींत.
त्यांत एक सुवर्ण पुष्प व एक नारळ ठेवून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी.
सहा वेळबांच्या सुपांत पार्ने गंधाक्षता, फळें, फुलें, करंज्या, यज्ञो- पवीत, पैसा, जायफळ, वेलदोडे, लवंग, पेरू, सुपारी, केळी, खारीक, बदाम व नारळ ही द्रव्ये घालून त्यांवर सहा सुपें झांकून त्यांच्यावर सूत गुंडाळावें. त्यांस हळद, कुंकू लावून देवांपुढे ठेवावीत. त्यांतून दोन सुवासिनी स्त्रियांना देऊन आपण एक घरी आशिर्वाद घेऊन जावें.
त्या दिवशी उपवास करून ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काळ घाल- बावा. दुसरें दिवशीं सत्पात्रांस आहारदान देऊन आपण पारणें करावें.
याप्रमाणें हें त्रत सहा वर्षे ६ करून शेवटीं याचें उद्यापन करावें. त्यावेळीं श्रीचंद्रप्रभ तीर्थकर प्रतिमा श्यामयक्ष ज्वालामालिनी यक्षीसह निर्माण करवून पंचकल्याणपूर्वक प्रतिष्ठा करावी. उद्यापन विधानाप्रमाणे पूजात्रिवि करावा. चतुःसंघांस चतुर्विधदानें आवश्यक वस्तूंसह द्यावीत. सहा मुनीश्वरांस आहारदान द्यावें. सहा दंपतीस भोजन करवून त्यांचा बस्त्र, तांबूल, फलादिकांनी सन्मान करावा. नूतन जिनमंदिर बांधावें. जीर्णोद्धार करावा. तीर्थयात्रा करावी. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांमध्यें अवंती नामें विस्तीर्ण देश असून त्यांत उज्जयनी नांवाची एक सुंदर नगरी आहे. तेथे पूर्वी सिंहसेन नामक मोठा पराक्रमी, गुणवान् असा राजा राज्य करीत होता. त्याला लक्ष्मीमती नाम्नी एक लावण्यवती पट्टस्त्री होती. त्यांचा जिनदत्त या नांत्राचा एक राजश्रेष्ठी असून त्याला जिनमती नामें सुशील, सदाचारिणी अशी स्त्री होती. हे दोघे सुखानें नांदत असतां, – एके दिवशीं अतिमुक्त नांवाचे एक निर्भथ महामुनी चर्येकरितां श्रेष्ठींच्या घरासमीप आले. तेव्हां श्रेष्ठीनें त्यांचें प्रतिग्रहण करून त्यांना आंत आणिलें आणि नवधाभक्तिपूर्वक निरंतराय आहार दिला. मग मुनीश्वर
त्यांना आशिर्वाद देऊन वनांत निघून गेले. नंतर तीन दिवसांतच श्रेष्ठीच्या शरीरांत कुष्ठरोग उत्पन्न झाला. हे पाहून त्याची धर्मपत्नि जिनमती ही ‘ आपला पति कुष्ठरोगी झाला. आतां याला काय उपाय करावा. वगैरे म्हणून चिंताकुल होऊन बसू लागली. परंतु जिनेश्वरांवर तिची अति दृढभक्ति असल्यामुळे ती आपल्या पतीचे शरीर पूर्ववत् निरोगी व्हावें’ या उद्देशानें प्रतिदिवशीं जिनेश्वरांचा अभिषेक करून त्यांचें गंधोदक आणून आपल्या पत्तीस देत असे. मग ह्या जिनमतीची दृढभक्ति पाहून ज्वालामालिनी देवीचे आसन कंपायमान झालें. तेव्हां ती देवी अवधिज्ञानानें या जिनमतिचे दुर्धर संकट जाणून तत्काळ तिच्या सन्निध आली. आणि म्हणूं लागली कीं; हे सौभाग्यशालिनी जिनमते ! तूं अशी चिंताक्रांत कां झाली आहेस ? हे ऐकून ती म्हणते, हे देवी! माझ्या पतीचें शरीर कुष्ठ रोगानें ग्रस्त कां झालें आहे ? आतां कोणत्या उपायांनें दूर होईल ? इत्यादि विचाराने मी दुःखाकुल झाली आहे. तेव्हां ती देवी म्हणते, हे जिनभक्ते ! जेव्हां अतिमुक्त मुनि हे तुमच्या गृहीं आहारासाठीं आले होते, तेव्हां तूं रजस्वला होतीस. त्यामुळे त्यांना आहार देण्याची इच्छा तुझ्या मनांत नव्हती; तथापि दुराग्रहानें तुझ्या पतीनें तुझें सहाय घेऊन त्यांना आहारदान दिलें. त्या कारणानें आतां त्याला कुष्ठरोग झाला आहे. आतां तूं चंद्रषष्ठत्रित पाळून त्याचें गंधो- दक नेऊन त्यांना दे. म्हणजे त्या रोगाचा परिहार तत्काल अवश्य होईल.” असे म्हणून तिनें त्या व्रताचा सर्वविधी यथासांग सांगितला. ते सर्व ऐकून जिनमती म्हणते, हे भगवती देवी ! आपण कोण आहात ? आपलें स्थान कोणते ? या व्रताचा विधी वगैरे आपणांस कोणी सांगितला ? हे तिचे प्रश्न ऐकून देवी म्हणाली, – मी ज्वाला- मालिनी देवी आहे. पूर्वविदेह क्षेत्रांत पुंडरीकिणी नांवाचे एक सुंदर नगर आहे. तेथील सीमंकर नामक उद्यानांत मी राहतें. तेथें एक
चैत्यालय आहे. त्यांत एकदां सुमती नांवाची आर्थिका आली होती. कांही भक्तलोक त्या ठिकाणीं येऊन त्या आर्थिकेजवळ चंद्रषष्ठी व्रताचे विधान विचारीत होते. तेव्हां तिच्या मुखानें मी या व्रताचा सर्व विधी ऐकिला आहे. तोच सर्वविधी मी तुछा आतां सांगितला आहे. असे म्हणून ती अदृश्य झाली.
हे सर्व ऐकून तिला मोठा आनंद झाला. मग तिनें हैं व्रत यथा- विधि कालानुसार करून त्याचें गंधोदक आपल्या पतीस आणून दिलें. त्यायोगानें त्याचा कुष्ठरोग सर्व नाहींसा होऊन तो पूर्वीसारखा निरोगी झाला. तेव्हां ते उभयता कामदेव व रतिदेवी किंवा चंद्र व रोहिणी यांच्याप्रमाणें शोभू लागले. अशा प्रकारें ते भोगोपभोगांत सुखानें काल घालवू लागले.
एकदां जिनमतीला आदित्य (सूर्य) मंडल छिन्नभिन्न कलंकित दिसल्यामुळे आपल्या भावी आयुष्याचे काळज्ञान असे झालें कीं;- आतां आपले आयुष्य केवळ १० दिवस राहिलें आहे. मग तिच्या मनांत संसाराविषयीं वैराग्य झालें. तेव्हां तिनें पति, पुत्र, वगैरेचा मोह सोडून एका आर्थिकेजवळ जाऊन दीक्षा घेतली. ती आपल्या तपोबलानें त्रीलिंग छेदून समाधिमरणानें सोळाव्या अच्युत स्वर्गात देव झाली आणि तेथे बावीससागरवर्षे सुख भोगूं लागली.
त्यानंतर तो जिनदत्त श्रेष्ठीहि आपल्या प्रियस्त्रीच्या वियोगामुळे विरक्त होऊन आपल्या श्रेष्ठीपदाचा अधिकार आपल्या मुलाकडे देऊन वनांत गेला. तेथे श्रुतसागर भट्टारक महास्वामी यांच्या जवळ दीक्षा घेऊन तपश्चरण करूं लागला. मग त्या तपः प्रभावानें समाधिमरणाने तोहि त्याच स्वर्गात देव झाला. नंतर ते दोघे देव तेथे कल्याणमित्र होऊन स्वर्गीय सुख भोगून परंपरेनें जन्मांतरी मोक्षास गेले,