व्रतविधि – आषाढ शु. ८ दिवशीं या व्रतिकांनीं शुचिजलांनीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावींत. सर्व पूजाद्रव्यें आणि लाह्या आपल्या हातीं घेऊन जिनालयीं जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथ शुद्धि वगैरे क्रियापूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर श्रीजिनेश्वराची प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा, अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. श्रुत, गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें.
देवापुढे कोणत्याहि धान्याच्या छाह्यांचे तीन पुंज घाढून त्यांवर तीन पुष्पें ठेवावीत. भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. ॐ हीं अईदभ्यो नमः स्वाहा ।।’ या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत. श्रीजिनसहस्रनाम स्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. मग एक महार्थ करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रद- क्षिणा घालून मंगळारती करावी. मध्यंतरी येणाऱ्या अष्टमी, चतुर्दशीस शक्तिप्रमाणें उपवासादिक करावें.
याच क्रमानें पुढे प्रतिदिनीं कार्तिक शु. १५ मे पर्यंत पूजा करून शेवटी (पौर्णिमे दिवशींच) याचे उद्यापन करावें. त्यावेळीं यथाशक्ति महाभिषेक पूजा करून तीन लाह्यांच्या पुंजावर तीन सुवर्ण पुष्पें ठेवून महार्थ करावें. चतुः संघास चतुर्विधदानें द्यावीत. असा या व्रताचा पूर्ण विधी आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत अवंति नामक एक मोठा देश असून त्यांत कनकपुर या नांवाचे रमणीय नगर आहे. तेथे पूर्वी जयंवर नांवाचा वीर्यशाली, नीतिमान् व धर्मशील असा राजा आपल्या पृथ्वीदेवी नामक पट्टत्रीसह राज्य करीत असे. याच वेळीं तेथे धनपाल नामें वैश्य राहात असे. त्याला धनश्री नाम्नी सुशील, सुंदर अशी बी होती. मात्र हे दोघे दारित्र्यावस्थेत आपले आयुष्य कंठीत होते. एकदां त्या नगरांत श्रुतसागर नांत्राचे महामुनिमहाराज चर्यानि- मित्तानें आले. तेव्हां त्यांना पाहून धनपाल वैश्यानें पडगावून गृह्रीं नेलें व यथाविधि नवधाभक्तिपूर्वक निरंतराय आहारदान दिलें. आहारानंतर तेथे कांहीं वेळ शांतवृत्तीनें बसले असतां थोडा वेळ त्यांच्या मुखें धर्मो- पदेश ऐकला. नंतर घनश्री ही अपलें करयुग जोडून विनयानें त्यांना म्हणाली; भो गुरुवर्य ! आतां आम्हांस इतकें दारिच कां आलें आहे ? हे तिचे नम्रवचन ऐकून ते मुनींद्र म्हणाले, या जंबूद्वीपांतील
भरत क्षेत्रांत काश्मीर नांवाचा एक मोठा देश असून त्यांत हस्तिनापुर या नांवाचें एक मनोहर पट्टण आहे. तेथे प्राचीन काळीं वृषभाक नांवाचा एक राजा आपल्या वृषमती नांवाच्या राज्ञीसह सुखानें राज्य करीत असे. त्याच नगरी सोमशर्मा नांवाचा पुरोहित असून त्याला सोमश्री नाम्नी श्री होती. यांना सुवर्णमाला’ नामें एक सुंदर अनुपम कन्या होती. ती यौवनावस्थेत आली असतांना एके दिवशी देशभूषण नामें महातपोनिधी मासोपवासी पारण्याच्या निमित्तानें नगरांत आले. तेव्हां ही त्यांना पाहून आपल्या मनांत ” एवढा द्ररिद्री माणूस जगांत कोणी नसेल. याच्या अंगावर वस्त्राचा तुकडा नाहीं. उघडा हिंडत आहे. खावयास पोटभर अन्न न मिळाल्या मुळे किती रोडका झाला आहे, ” असे निंद्य विचार मनांत आल्यामुळे त्या पापोदयाने ती मरून आतां तू येथे अशा दारिद्यावस्थेत जन्मली आहेस. हे मुनींचे भाषण ऐकतांच तिला फार वाईट वाटलें. मग ती विनयानें पुनः म्हणते, – हे दयासागर गुरुराज ! आतां माझे हे दारिय कसें दूर होईल ? याला एकादां उपाय सांगा. हे ऐकून मुनी म्हणाले, हे कन्थे ! आतां तूं ‘ त्रिमुष्टिलाजा’ हे व्रत ग्रहण करून यथाविधि पालन कर, म्हणजे त्यायोगें तुझ्या त्या पूर्वभवांतील पापांचा परिहार होऊन पुढें तुला चांगलें सुख अवश्य प्राप्त होईल आणि क्रमानें मोक्षसुखहि मिळेल. असे म्हणून त्यांनी त्या व्रताचा सर्वविधि तिला सांगितला. ते ऐकून तिला मोठा आनंद झाला, मग तिने हे व्रत त्यांच्या जवळ स्वीकारिलें. नंतर ते मुनीश्वर निघून गेले. पुढे काळानुसार तिनें हैं व्रत पाळले. त्यायोगें त्याच भवांत शंभरकोटी द्रव्याचे अधिपति ती दंपती होऊन सर्व सुखांत निमग्न झाली. पुढें सम्यक्त्वपूर्वक धर्माचरण करीत गेल्यामुळे ते पतिपत्नि स्वर्गादिसुखें अनुभवून क्रमानें मोक्षास गेले. मग तेथे ते अनंतसुख अनंतकाळ भोगूं लागले. पूर्वी हें व्रत केल्यानेंच सीतादेवी ही राम- चंद्राची पट्टस्त्री झाली, चेलनादेवी श्रेणिक महामंडलेश्वराची पट्टस्त्री झाली. रेवतीराणी वरुणरायाची प्रियकांता झाली. रतिदेवी ही काम- देवाची (प्रद्युम्नाची) प्राणवल्लभा झाली. याप्रमाणें अनेक त्रीपुरुष धनकनकादिनीं समृद्ध झाले आहेत.