व्रतविधि – फाल्गुन मासांत उत्तराफाल्गुनी नक्षत्र ज्या तिथीस पूर्ण असेल त्या तिथीस या व्रतधारकांनीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत, मग सर्व पूजासामग्री आपल्या करी घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रांस भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर श्रीआदिनाथ तीर्थकर प्रतिमा गोमुखचक्रेश्वरीयक्षयक्षीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. त्यांचीं अष्टकें, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनीं पूजा करावी. श्रीसरस्वती व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं अर्हं श्रीआदिनाथाय गोमुखचक्रेश्वरी यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून श्री आदिनाथ चरित्र वाचावे. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत महार्घ्य करून ओवाळीत तीन प्रदक्षिणा देऊन मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहा- रादि दाने द्यावीत. ब्रम्हचर्य पाळावें. दुसरें दिवशीं पारणे करावें.
Add reaction
|
Add reaction
|
Add reaction
|