व्रतविधि – श्रावणमासाच्या शुक्त पक्षांतील पहिल्या आदि- त्यवारी (रविवारी) प्रातःकाळीं या व्रतिकांनी अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौतवस्ने धारण करावींत, सर्व पूजासादित्य बरोबर घेऊन चैत्यालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनांस मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठांत सिद्धप्रतिमा व रत्नत्रयजिनप्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृडांनी मत्रपूर्वक अभिषेक कररावा. अष्टद्रव्यांनीं रत्नत्रयजिनांची (अरनाथ, मछिनाथ, मुनिसुन्नत यांची) आणि सिद्धपरमेष्ठींचो अर्चना करावी. श्रुत व गुरु यांचो पूजा करून आदिभट्टारक, अरिंजय, व अमितंजय या तीन तपोधन गुरूंचीही पूजा करावी. एका पाटावर तीन स्वस्तिके काढून त्यांवर तीन पार्ने लावून अक्षता, फुलें, फलें, लाडू ठेवावेत. तीन चरु अपावेत. ॐ नहीं अईं अरमल्लिमुनिसुव्रतरत्नत्रयाख्यतीर्थकरेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पे आणि ॐ नहीं सिद्धप्नरंमष्ठिभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ फुले घालावीत. णमोकार मंत्राचा या प्रमाणें तीन वर्षे अथवा तीन महिने किवा तीन आदित्यवार्थी हा व्रतविधि करावा. नंतर याचे उद्यापन करावे, त्यावेळीं तीन दिवस सिद्धचक्राची आराधना यथोक्तविधीने करावी. चतुःसंघास चतुर्विष दानें द्यावींत. आवश्यक उपकरणे मंदिरांत ठेवावींत असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील मरतक्षेत्रामध्ये सुरम्य नामक मोठा देश असून त्यांत जयंति नांवाची एक सुंदर नगरी आहे. तेथे पूर्वकालीं क्षेमंकर नांवाचा शूरवीर राज्जा राज्य करीत होता. त्याला लक्ष्मीमति नाम्नी रूपवती व गुणवत्ती पट्टराणी होती. हे घन-पुत्र-यांसह सुखाचा अनुमव घेत असतां, – एके दिवशीं या नगराच्या उद्यानांत मुनिगुप्तनामक्क भट्टारक निर्भथ महामुनि आले होते. तेव्हां है शुमवृत्त तेथील वनपालकद्वारे राजास कळतांच तो आपल्या सर्व परिवारासह मुनीश्व- रांच्या दर्शनास मोठ्या थाटाने निघून गेला आणि मुनींना तीन पदक्षिणा देऊन अति भक्तीनें नमस्कार करून त्यांच्या समीप बसला. कांडी वेळ त्यांच्या मुखै दयाधर्माचा उपदेश ऐकल्यानंतर लक्ष्मीमती राणीनें आपले हस्तकमल जोडून अति विनश्रार्ने म्हटले, हे संसार सिधुतारक महासाधो ! आज आपण मला माझे नियपत्ति व पुत्र यांना सतत सुख व्हावे, असे एकादें व्रत द्यावे. हे तिचे नम्र भाषण ऐकून मुनीश्वर तिला म्हणाले, हे भव्यचूडामणे कन्ये ! आतां तुला हे सिद्धव्रत पालन- करण्यास अत्यंत योग्य आहे, जे भव्य स्त्रीपुरुष है व्रत भक्तीने पाळतात; त्यांना ऐहिक सर्व सुखसंपत्ति व स्वर्ग आणि क्रमाने मोक्ष प्राप्त होतो. असे म्हणून त्यांनीं तिला याचा सर्वविधि सांगितला. ते ऐकून लक्ष्मी- मतीस मोठा आनंद झाला. तेव्हां तिर्ने त्या गुरुजवळ प्रार्थना करून हे व्रत घेतले. मग सर्वजन त्या मुनिगुप्त मुनींद्रास वंदना करून नगरी परत आले. पुढे योग्यकालीं तिने है व्रत यथाविधि पाळून त्याचें उद्या- पन केले. त्यायोगें सुखाने राज्यैश्वर्य भोगून ती स्वर्गास गेली.