व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि एका नंदीश्वर पर्वाव शु. ८ दिवशीं या व्रतिकांनीं प्रभातर्ती शुद्धजलांनीं स्नान करून अंगावर धौतवस्ने धारण करावींत. सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिनालयीं जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईयर्यापथशुद्धि- पूर्वक जिनेश्वरांस मक्तीने नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठींची प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. पंचभक्ष्यांचे व पायसांचे चरु अर्पावेत, अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी श्रुत व गुरु यांची पूजा
करून यक्ष, बक्षी व बम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ नहीं अद्देल्सि- ब्राचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहां ॥ या मंत्राने १०८ फुले घालून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. नंतर महाध्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिनों उपवासादिक ब्रम्हचर्यपूर्वक करावें. दुसरे दिनी पारणा करावी.
याच कमाने चार महिनेपर्यंत पंचमी, अष्टमी व चतुर्दशी या तिथीस पूजाक्रम करादा, पुढे येणान्या अष्टान्हिक पर्थात या व्रताचे उद्यापन करावें. त्यावेळीं पंचपरमेष्ठींस महाभिषेक पूजा करावी. पांच सुवासिनी स्त्रियांस वायर्ने द्यावीत. पांच मुनीश्वरांना आहारदान करून नंतर आपण पारणा करावी. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
हे व्रत यशोभद्र मुनीश्वरां जवळ चलना राणीनें घेऊन विधिपू- बैंक पाळिले आहे. त्यांचीच कथा येथे