व्रतविधि-वैषाख शु. ८ दिवशीं प्रातःकाळीं या व्रतिकांनीं उष्णपाण्याने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे घ्यावींत, सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यायथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठीची प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. देवापुढें शुद्धभूमीवर पंचवणौनीं अष्टदलकमल यंत्र काढावें, मध्ये अक्षता घालून हीं अक्षरयुक्त स्वस्तिक काढून त्यावर एक सुशोभित कुंभ ठेवावा. एका ताटांत पांच पार्ने गंधाक्षता, फुले, फळे, वगैरे लावून हो कुंभावर ठेवावा. मग त्यांत पंचपरमेष्ठी मूर्ति बसवून त्यांची अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव बांचे अर्चन करावे. पांच प्रकारच्या पकालांचे पांच चरु करून अर्पावेत. ॐ व्हां नहीं हूं हौं हः असिआउसा अनाहतविद्यायै नमः स्वाहा।। या मंत्राने १०८ पुष्पे घ’लावींत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. षोडशभावना भावाव्यात. पंचगुरुभक्ति म्हणावी, दी व्रतकथा वाचावी. ब्रम्हचर्यपूर्वक उपवास करून धर्मध्यानांत काल घाल- वावा. नंतर महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. दुसरे दिवशीं सत्पात्रांस आहारदान देऊन आपण पारणा करावी. याच क्रमाने है व्रत पांच वर्षे अथवा पांच महिने करून शेवटीं उद्यापन करावं. त्यावेळीं नूतन पंचपरमेष्ठी प्रतिमा तयार करवून तिची पंचकल्याणविधिपुरःसर प्रतिष्ठा करावी. अथवा पंचपरमेष्ठीस महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.