व्रतविधि-आश्विन शु. १५ दिवशीं प्रातःकाळी या व्रतिकांनी सुखोष्णजठांनीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वर्षे धारण करवींत. सर्व पूजासामग्री बरोबर घेऊन मंदिरास जावें. चैत्यालयास मदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेश्वरांस भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर पंचपरमेष्ठींची प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. श्रृंगारलेल्या मंडपांत देवापुढे शुद्धभूमीवर अष्टदल कमल यंत्र काढून त्या सभोवती चतुरस्रपंचमंडले काढून अष्टमंगलकुंभ स्थापावेत.
पंचवर्णसूत्र, नूतनधौतवस्त्र, गुंडाळावे, मध्यमार्गी सुशोभित कुंभ ठेवून त्यावर एक ताट ठेवावा. त्यांत पांच पार्ने क्रमाने लावून त्यांवर अक्षता, फुले, फलें वगैरे मांडावींत. नंतर त्यांत पंचपरमेष्ठींची प्रतिमा ठेवून नित्यपूजाक्रम करून पंचपरमेष्ठी विधान वाचावे. याप्रमाणे चार वेळां अभिषेकपूजाविधि करावा. ॐ हीं अहे अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्व- साधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ फुले घालावीत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. त्यानंतर एका पात्रांत अष्टद्रव्यांचे महार्घ्य करून त्यांत एक नारळ ठेवून ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशीं ब्रम्हचर्य- पूर्वक उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं सत्पा- त्रांस आहारदान देऊन आपण पारणा करावी.
याप्रमाणें २७ सत्तावीस पूजा पूर्ण झाल्यावर शेवटीं उद्यापन करावें. त्यावेळीं पंचपरमेष्ठीविधान महाभिषेकपूर्वक करून चतुःसंघास चतुर्विधदाने द्यावर्वोत. असा याचा पूर्णविधि आहे.