व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासांत ज्यादिवशी अमृतसिद्धियोग असेल त्या दिवशीं प्रातःकाळीं या व्रतिकांनीं शुचि जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवर्षे धारण करार्थीत. आणि सर्व पूजासामश्री हाती घेऊन जिनालयास जावें, तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियापूर्वक श्रीजि नेद्रांस भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. मग श्रीपीठावर श्रीशांतिनाथ तीर्थकर प्रतिमा गरुडमहानानसी यक्षयक्षो सहित, गणधरपादुका, ज्वालामालिनी यक्षो प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. त्यांचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनीं पूजा करावी. पंचभक्ष्य पायसांचे चरु करावेत. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें ॐ ह्रीं अर्हं श्रीशांतिनाथाय गरुडयक्षमहामानसीयीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ सुगंधी पुर्ने घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून श्रीशांतिनाथचरित्र वाचून ही व्रतकथाही वाचावी. एका पात्रांत पांच पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महाय करावे. आणि त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास किंवा पांच वस्तूंचा नियम फरून एकमुक्ति करून धर्मध्यानांत घालवावा. सत्यात्रांस आहारादि दानें द्यावीत. ब्रम्हचर्य पाळावे. याप्रमाणें अमृतसिद्धियोगाच्या दिवशींच हे व्रतपूजन करावे. अशा पांच पूजा पूर्ण झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे. त्यावेळीं श्रीशां- तिनाथविधान करून महाभिषेक करावा. पांच मुनीश्वरांस आहारदान देऊन त्यांना पांच शास्त्रे, श्रुतवस्त्रे वगैरे आवश्यक वस्तू द्याव्यात. तसंच ५ आर्थिकानाहि आहार देऊन त्यांना आवश्यक वस्तूं धाव्यांत. पांच दंपतीस भोजन करवून त्यांना ओठ्यांत पान, सुपारी, नारळ फळे, पुष्पें घालून त्यांचा सन्मान करावा, दीन अनाथांना अमयदान द्यात्रे. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
कथा – श्रेणिक महामंडलेश्वर राजा आणि चलना राणी यांची आहे.