व्रतविधि – श्रावण शु. ५ दिवशीं या व्रतिकांनीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्र ध्यावींत. पूजा- सामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियापूर्वक जिनेंद्रास भक्तोनें साष्टांग नम- स्कार करावा. पीठावर पार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा धरणेद्रयक्ष व पद्मावती यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्ठ द्रव्यांनी त्यांचीं अर्चना करावी. त्यांच्यापुढे एका पाटावर पान, सुपारी लाह्या, भिजलेले हरभरे, लही पिठाच्या पांच मुष्टी, (बेलदच्चु ) गुळाच्या वड्या, वाळूक दूध, तूप, सास्बर हे अर्पण करावेत. मग ॐ न्हीं श्रीं क्लीं ऐं अहे पाश्र्श्वनाथतीर्थकराय धरणेद्रपद्मावती सुहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य फरून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. पांच सुवासिनो स्त्रियांना तांबूल, गंधाक्षता, लाह्या, भिजलेले हरमेरे, बेलदच्चु, वाळूक, हळद, कुंकू युक्त बायने द्यावींत तो दिवस ब्रह्मचर्यपूर्वक धर्मध्यानांत घालवावा उपवासाचा नियम करावा.
पुनः षष्ठो दिनीं (दुसरे दिवशीं) शुचिर्भूत होऊन नेमिनाथ तीर्थकर प्रतिमेस सर्वाण्डूयक्ष कुष्मांडीयक्षीसह पंच मृताभिषेक करून अष्टद्रव्यांनीं अर्चना करात्री. श्रुत, गणधर यांचो पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे, ॐ न्हीं श्रीं क्लीं ऐं अर्ह नेमिनाथ तीर्थकराय सर्वाण्हयक्षकुष्मांडीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुर्षे घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. वरीलप्रमाणें पांच सुवासिनी स्त्रियांना पांच वायर्ने तयार करून द्यावींत. चतुःसंघास चतु- विध दाने द्यावीत. नंतर आपण पारणे करावे.
याप्रमाणें हें व्रत पांच वर्षे करून शेवटीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं पार्श्वनाथ आणि नेमिनाथ तीर्थकरांस महाभिषेक करावा. चतुःसंघास चारप्रकारचीं दाने द्यावीत. मंदिरांत आवश्यक वस्तु आरत्या, धूपाटणे, कलश, थाळी, चमर, चांदवें, समई, झारी वगैरे पांच पांच द्याव्यात. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या जंबूदीपांतील भरतक्षेत्रांत विजयार्ध पर्वताच्या दक्षिण श्रेणी- वर रत्नपुर ( चक्रवाळपुर) नांवाचे एक रमणीय नगर आहे. तेथे पूर्वी गरुडवेग नामक विद्याधर राजा आपल्या गरुडवेगा राणीसह सुखानें राज्य करीत होता.
एके दिवशीं तो नित्यनियमाप्रमाणे अकृत्रिम जिन चैत्यचैत्याल- यांची वंदना करण्यासाठीं विमानांत बसून गेला होता. वंदनपूजन करून परत येत असतांना पूर्वभवांतरीचा शत्रु मार्गांत गांठला. त्यानें त्यास पाहून पूर्ववैर साधण्यासाठीं त्यांच्यांर्शी युद्ध करून त्याच्या सर्व विद्या हरण केल्या. तेव्हां तो विद्याधर जमिनीवर खाली पडला. त्या ठिकाणीं समाधिगुप्त नामक महामुनीश्वर दिसले. तेव्हां त्यांच्या समीप जाऊन मोठ्या भक्तीने त्यांना नमस्कार करून बसला. मग त्यानेंने आपलीं सर्व दुःखद वार्ता त्यांना सांगितली. ते ऐकून मुनीश्वरांच्या अंतःकरणांत दया उत्पन्न झाली. नंतर त्यांनीं त्याला गतविद्या पुनः प्राप्त व्हाव्यात व त्यांचे दुःख निवारण व्हावे, या हेतूने त्याला है ‘ नागपंचमी’ व्रत दिले आणि त्याचा सर्वविधिही सांगितला. यास्तव हे व्रत तूं यथाविधि पालन कर. म्हणजे तुजवर धरणेंद्रपद्मावती प्रसन्न होऊन तुझी विद्या तुला देतील व तुझें दुःख निवारण करतील. तेव्हां तो विद्याधर म्हणाला, हे मुनि महाराज ! है व्रत कोणी पालन केले ? त्यांना काय फल मिळाले? हैं एवढे कृपा करून सांगावे. हे त्यांचें नम्रभाषण ऐकून ते मुनिराज त्यांना कथा सांगू लागले, -मालव देशांतील चिंच गांत्री नागगौड नांवाचा एक सभ्य गृहस्थ होता. त्याला कमलावती नाम्नी गुणवती स्त्री होती. तिच्यापासून त्याला अतिबल, महावल, परवल, राम, सोम असे पांच पुत्र होते. चारित्रमति नांवाची एक सुंदर कन्या होती. ती उपवर झाल्यावर तिला तेथेच समीप चंप गांवीं धनदगौड यांच्या मनोहर नांवाच्या पुत्रास दिले. पुढे ती दंपती आनंदाने सुखोपभोगांत काल घालवीत असतां, त्यांना शांत नामक एक पुत्र झाला.
पुढे एके दिवशीं मुनिगुप्त या नांवाचे चारणमहर्षि चर्यानिमित्त त्यांचे गृहीँ आले. तेव्हां चारित्रमतीनें त्यांचे प्रतिग्रहण करून त्यांना नवधामक्तीनें निरंतसय आहारदान दिले. नंतर ते महान् ऋषी त्यांना ‘ अक्षयवृद्धिरस्तु’ असा शुभाशिर्वाद देऊन तेथे कांहीं वेळ बसले. त्या समयीं तिच्या माहेरगांवाहून (चिंचगांवहून) एक दूत आला. त्याने तुझे आई बाप मूर्च्छागत होऊन पडले आहेत. म्हणून हकिगत सांगितली. तेव्हां ती त्या महर्षीना प्रणिपात करून म्हणाली, हे ऋषिवर्य | माझे मातापिते एकदम असे मूच्छित पडण्याचे कारण काय? हे तिचे नम्र वचन ऐकून ते महर्षि म्हणाले, हे कन्ये । तुझ्या बापाच्या शेतांत एक वृक्ष असून त्याखाली एक वारुळ होते. त्या वृक्षाचा आणि त्या वारुळाचा त्याने दुष्टबुद्धीने विध्वंस केला. त्या वारुळांत पार्श्वनाथ आणि नेमिनाथ तीर्थकरांच्या दोन प्रतिमा होत्या. भवनवासी देव त्यांची नित्यपूजा, सेवा करीत असत. त्या प्रतिमेस त्याने उपसर्ग केल्यामुळे ते देव क्षुब्ध होऊन त्यांनीं विषयुक्त क्रूर दृष्टीने त्यांजकडे पाहिल्याने ते मूच्छित होऊन पडले आहेत. तेव्हां ती कन्या म्हणाली, हे महर्षे ! आतां यास उपाय काय करावा ? तो कृपा करून सांगावा. हे तिचे दीनभाषण ऐकून ते म्हणाले, हे पुत्री ! तूं नागपंचमी आणि त्रियाळषष्ठी हे व्रत यथाविधि कर आणि गंधोदक नेऊन त्यांच्या अंगावर सेचन कर, म्हणजे त्यांच्या विषाचा परिहार होऊन ते सचेतन होतील. हे ऐकून ती त्या महर्षी जवळ हैं व्रत घेऊन माहेरी गेली आणि तेथे तिने शेतांत जाऊन महाऋषी वर्षांनी सांगितल्या प्रमाणें व्रतपूजन केलें आणि गंधोदक नेऊन आपल्या मातापित्यावर सेचन केलें. त्यामुळे त्यांच्या विषाचा परिहार होऊन ते सचेतन झाले. तेव्हां लोक आश्चर्यचकित होऊन तिला विचारूं लागले कीं; – तूं हैं कोणते व्रतपूजन केलेस. तेव्हां ती म्हणाली, – तुम्ही मिथ्यात्वी असल्याने तुम्हांस सांगत नाहीं. त्यावेळीं तिजबरोबर आलेल्या दूतानें लोकांस सांगितले कीं; – तिनें दूध, तूप, साखर, लाह्या वगैरे वस्तूंनीं वारुळाचे पूजन केले. तसे तुम्हीही करा. म्हणजे झाले. तेव्हांपासून लोक चिखलाचा नागफणा करून त्याची व वारुळाची पूजा करूं लागले. असो. त्यादिवशीं श्रावण शु. ५ भी होती. तेव्हां नागफणालंकृत पार्श्वनाथ तीर्थकरांची पूजा वारुळाजवळ बसून केली असल्याने ही विथी नागपंचमी या नांवाने प्रचारांत आली आहे, अस्तु । मग ती त्यांना म्हणालो, मी माझं पष्ठीत्रत करण्यासाठी आपले गांवीं परत जाते. मुलाला सोडून आल्ये आहे. तेव्हां तिचे आई बाप तिला म्हणतात, हे कन्थे ! तूं आपल्या गांरीं न जातां ते षष्ठोव्रतहि येथेच पूर्ण कर. तुला लागणारे सर्व पूजासाहित्य आणवून देतो. हैं ऐकून ती सर्व पूजासामग्री घेऊन त्या शेतांतील सरोवराचे काठीं गेली. तेथें शुचिर्भूत होऊन ते षष्ठीव्रत यथासांग करूं लागली. इतक्यांत ते पूर्वीचे मुनिगुप्त चारणमहर्षि त्याठिकाणीं आले आणि तिला ते म्हणाले, हे चारित्रमते ! तुझ्या मुलास तुझ्या सासूने सरोव- रांत टाकिले. हे वृत तुला सांगण्यासाठीं आलों आहे. तेव्हां ती त्याना म्हणाली, – आतां यावर कोणता उपाय करावा ? हे सांगावे. मग ते म्हणाले, है व्रत तूं पूर्ण कर आणि पद्मावतीची व कुष्मांडी देत्री यांचो आराधना कर म्हणजे त्या देवी तुला प्रसन्न होऊन तुझ्या मुलास सुखरूप आणून देतोल. त्यांची चिंता करूं नको. गुरुवचन प्रमाण मानून त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिने तें व्रतपूर्ण केले. त्या व्रतप्रभावाने त्या देवींनीं तिच्या मुलास सुखरूपाने आणून तःकाल पोंचविले. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. ही वार्ता राजास समजतांच त्यानें ही महासाध्वी आहे असे जाणून तिला तिच्या मुलांसह पालखींत बसवून समारंभाने आपल्या राजवाड्यांत नेऊन तिचा चांगल्या वस्त्राभूषणांनी आदर सत्कार केला. नंतर तशाच समारंभाने पुनः तिला घरी पाठविले, मग ती आपल्या मुलांसह घरी जाऊन आईबापांची आज्ञा घेऊन आपल्या गांवीं गेली. पुढे विनें हें व्रत पांच वर्षे पूर्ण विधीने पाळून याचे उद्या- पनहि केले. त्यायोगें तो स्त्रिलिंग छेडून स्वर्गास गेलीं. तेथे पुष्कळ काल दिव्यसुख ती भोगून तेथून च्यवून या लोकीं राजपुत्र झाली. नंतर तो राजपुत्र कांही निमित्ताने वैराग्ययुक्त होऊन वनांत एका मुनीश्वरांजवळ गेला. तेथे त्यानें त्यांना प्रार्थना करून त्यांच्याजवळ जिनदीक्षा घेतली.
मग तो घोर तपश्चर्या करून त्यायोगे सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास गेला.
ही कथा ऐकून त्या गरुडवेग विद्याधरांस मोठा आनंद झाला. नंतर त्यानें त्या मुनीश्वरांस मार्थनायुक्त मोठ्या भक्तोनें नमस्कार करून हे व्रत स्वीकारिले. आणि घरी जाऊन कालानुसार है व्रत यथाविधि पाळिले तेव्हां या व्रतमाहात्म्याने त्याला पद्मावती देवी आणि कुष्मांडी देवी यांनी प्रसन्न होऊन सर्व विद्या परत दिल्या. मग त्या विद्येच्या साधनाने पुनः तो आपल्या भियपत्निसह या लोकांतील अकृत्रिम जिन- चैत्यचैत्यालयांची वंदना, पूजा करून पुण्योपार्जन करूं लागला. पुढे कांहीं दिवसानीं त्याच्या मनांत या संसाराविषयी विरक्ती झाल्याने तो वनांत जाऊन गुरुजवळ दिगंबर जिनदीक्षा घेऊन घोर तपश्चर्या करूं लागला. त्या तप प्रभावानें तो केवलज्ञानी होऊन मोक्षास गेला.