व्रतविधि – भाद्रपद शु. १ दिवशीं प्रातःकाळीं या व्रत आह- कांनीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवने धारण करावींत. सर्व पूजासाहित्य आपल्या बरोचर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा मंडपशृंगार करून देवापुढे शुद्धभूमीवर पंचव- र्षांनीं अष्टदलकमलयंत्र काढून त्याच्या सभोंवतीं चतुरस्र पंचमंडले काढावीत. चंद्रोपक बांधावे. पीठावर श्री आदिनाथ तीर्थकर प्रतिमा गोमुख यक्ष चक्रेश्वरी यक्षीप्तह स्थापून तिच्या पंचामृतांनी अभिषेक करावा, अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चा करावी. श्रुत्त व गणधर यांचे पूजन करून यक्ष, यक्षी आणि ब्रम्हदेव यांचे अर्चन कराने, पंचभक्ष्यांचे पांच नह करून अर्पावेत. ॐ पहीं श्रीं क्लीं ऐं अई आदिनाथतीर्थकराय गोमुखयक्ष चक्रेश्वरीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुर्ने घालावीत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महाध्ये करून त्याने ओवाळोत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. पांच सुवासिनी यांना हळद, कुंकू, पान, सुपारी, अक्षता, फुले बगैरे बस्तू देऊन त्यांचा सन्मान करावा. त्यादिवशीं ब्रह्मचर्यपूर्वक उपवास करून घर्मध्यानांत फाल घालवावा.
Add reaction
|