व्रतविधि – भाद्रपद शु. १० दिवशीं या व्रतिकांनीं प्रभातीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्ने धारण करा- वींत. सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर २४ चोवीस तीर्थकर प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणवर यांचे पूजन करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं चतुर्विंशतितीर्थकरेभ्यो यक्षयक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ सुगंधी पुष्पें घालावीत. श्रीजिनसहस्र नामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत दहा पार्ने गंधाक्षता, पुणे, फळे, करंज्या, चगैरे पदार्थ मांडून एक नारळ ठेवून महाये करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी, ब्रम्हचर्यपूर्वक त्या दिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे.
Add reaction
|
Add reaction
|
Add reaction
|