व्रतविधि – श्रावण शु. ६ दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करात्री. ७ दिवशीं प्रभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वस्ने धारण करावीत. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिना- लयास जायें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमन करावे. पीठावर सुपार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा नंदिविजय यक्ष कालीयक्षीसह स्थापून तिला पंचा- मृतांनीं अभिषेक करावा. वृषभादि सुपार्श्व तीर्थकरांचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनी अर्चना करावी, श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी, ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. एका पाटावर सात पार्ने क्रमाने मांडून त्यांवर अक्षता, पुष्पें, फलें, करंज्या वगैरे ठेवून सात प्रकारच्या भक्ष्यांचे सात चरु करावेत. नंतर ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं सुपार्श्वनाथतीर्थकराय नंदिविजययक्ष कालीयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। वा मंत्राने १०८ पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा
१०८ वेळां जप करून दी मतकथा वाचावी, मग एक महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घाल मेगकारती करावी, त्या दिवशी उपवास करून मध्ध्र्यपूर्वक ध्यान कराने दुसरे दिवशीं चतुःसेघास चतुर्विध दाने देऊन पारणे करार्वे, या ममाणे है बत सात महिने प्रतिमासांतील त्याच तिथीस करून शेवटी याचे उद्यापन करावे. त्यावेळी सुपार्श्वनाथ विधान करून महाभिषेक करावा. संत भक्ष्यांची सप्त नैचेचे अर्पावीत, सात मुनि व आर्थिका यांना अलदान देऊन त्यांना आवश्यक वस्तु थाम्यात सात सुवासिनी क्षियांस आपल्या परी भोजन करवून त्यांना फलपुष्पादिकांची वाथने चाबींत. भता या मताचा पूर्णविधि आहे.
– कथा-
श्वसुर गृहीं वसुदेव राजा देवकी राणी हे उभयता मधुरा नगरी होते. तेव्हां एके दिवशी अतिमुक्त नामक महानुनीधर त्यांच्या परी चर्या निमित्त आहे, त्या समर्थी कंसाची खो जीवंयशा ही त्यांना म्हणाली, मो गुरुराज ! आपण नश्त को आला आहात? तुम्हांस नेस- ण्यास बस्न नसल्यास है बश्व व्या, असे म्हणून तिने देवकीचे रजोमरित लुगडे – तुमच्या बहिणीचे आनंदाचे लुगडे ध्या, म्हणून त्यांच्यापुढे आणून टाकिले. तेव्हां ते सुनी परत निभाले, हे पाहून ती त्यांच्यापुढे आडवे होऊन म्हणाली, परत को निषाला ? मग ते म्हणाले, – ” देवकीच्या गर्मी येणारा पुत्र तुझ्या पतीचा व पित्याचा वध करील.” हे ऐकून ती शोकाकांत झाली. नंतर तिने (जीवंयशेने) अनुपात करीत आपल्या पतीस है वृत्त सांगितले. मग कंस भयाकांत होऊन वसुदेवाकडे पूर्वोक्त बर मागण्यासाठी गेला. आणि तेथे म्हणाला, -हे स्वामिन् ! आपल्या भांडारांत असलेला माझा वर मला भातां था. ते ऐकून वसुदेव म्हणाले, तुला काय पाहिजे ते माग. मग त्याने असा बर मागितला कीं; – देवकीची प्रसूती माझ्या घरांत व्हावी. तेव्हां पूर्वी
ठरल्याप्रमाणे हा वर त्यांनीं त्यांना दिला. (अभिवचन दिले) मग अतिमुक्त मुनीश्वरांचें वचन ऐकून वसुदेवाला आपण अभि- वचन दिल्याबद्दल पश्चात्ताप झाला. वसुदेव आणि देवकी मिळून वनामध्ये चारणऋद्धिधारी महा अवधिज्ञानी त्या अतिमुक्त मुनीश्वरां- कडे गेले. त्याना तीन प्रदक्षिणा घालून नम्रतेने नमन करून त्यांच्या जवळ जाऊन बसले. कांहीं वेळ धर्मामृत प्राशन केल्यावर मोठ्या विनयाने उठून दोन्ही हात जोडून नम्रतेने वसुदेव त्यांना म्हणाले, – हे ऋषिवर्य ! कंस हा आपल्या पित्याचा शत्रु कसा ? हे सांगा. तेव्हां महर्षिनीं पूर्वभवांतील परस्परांचा वैरसंबंध कसा आहे ? वगैरे वृत्तांत निवेदिला. मग चिंताक्रांत होऊन ते घरी परत आले.
इकडे उत्तर मथुरा नगरांत सूरसेन राजाचा रविदत्त नांवाचा राजश्रेष्ठी राहात असे. त्याला यमुना नाम्नी खीहोती. तिच्या पासून त्या श्रेष्ठीला सुभानु, भानुमित्र, भानुषेण, सूर, सूरदेव, सूरदत्त आणि सूरसेन असे सात पुत्र होते. त्यांना क्रमाने कालिंद्री, तिलका, कांता, श्रीकांता, सुंदरी, द्विती, चंद्रकांता अशा सात मायर्या होत्या. कांहीं दिवसांनी रविदत्त अभयनंदी गुरुजवळ दिगंबर दीक्षा घेऊन गेला. मग त्याची भार्या यमुना ही जिनदत्ता आर्थिके समीप आर्यिका झाली. पुढे ते सातही चंधु द्यूतक्रीडा, वेश्यासंगादि सप्त व्यसनांत ८४ कोटी द्रव्य नाश केले. नंतर ते अत्यंत दरिद्री बनल्यामुळे निर्वाहासाठीं मोठमोठ्या चोच्या करूं लागले. त्यावेळीं उज्जयनी नगरामध्ये वृषभध्वज राजा आपल्या कमलावती राणीसह राज्य करीत होता. त्यांचा दृष्टिमुनि नांवाचा पराक्रमी सेनापति असून त्याला वप्रश्री नामें प्रियपत्नि होती. त्यांचे पोटीं वज्रमुष्टी नामक पुत्र होता. यानें विमलचंद्र राजा व विमलावदी राणी यांची कन्या मंगी इच्याशीं विवाह केला होता. मंगी ही सुंदर असून आपल्या प्राणपतीस अत्यंत आवडती नि प्रिय होती. परंतु तीपापल्या सासूसी मात्र विरुद्ध होती, त्यामुळे तिची सासू हो मंगी आपल्या पतीशी विरताव्दावी अगर मरावी म्हणून मयत्न करीत होती.
एके दिवशी बजपुदी दा फांदी कार्यासाठी एका खेड्याका गेला बोता. त्यावेळी इकडे संगीच्या सातूनै सुतरीतीने गारुड्याजवळ एक सर्व मासून भाजून एका घागरीत घातला, आणि कपटानें तींत पुष्पमाळा आहे, तो काढून घेऊन भापल्या गळ्यांत घाल, असे सांगितले. तेव्हा श्रमीचे स्था घागरीत दात घातला, तोंच त्यांतील सर्पाने तिच्या हाताला देश केला त्यामुळे ती तत्काळ मरण पावलो, मग तिने ते प्रेत महाकाल नांवाच्या स्मशानभूमीत नेऊन टाकण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनीं तेथे स्वसानांत ठेवून ढाकिले, तोंच वज्रमुष्टी घरी आला. माणि मातेल विचारू लागला, की-मेगी कोठे गेलो ? तेव्हां माता म्हणाली, – तिय सर्पदंश शाका, त्याच वेळी त्या नगरीच्या राजास पुत्र झाल्यामुळे तिला सचेतव करण्यास कोणी भाले नाहींत, म्हणून तिचे मेत गांवाबाहेर नेवून वाकले आहे, असे ऐकतांच तो हातांत एक नंगी तलवार भाणि दिवटी (मशाल) घेऊन तिच्या शोधार्थ गेला. तोच तेथे एक वरधर्म नामक निर्देष महावुनि त्याला दिसले. तेव्हां मानें त्यांना तीन प्रदक्षिणा घालून नबन केले, नंतर ते त्यांना म्हणू लागले कीं; हे पूज्यपाद स्वामिन् ! माझी पत्नि मला मिळाल्यास भाणि ती जिवंत झाल्यास मी १००८ कमले चरणी वाहीन (कमलपुष्पांनी आपली पूजा करीन.) असे म्हणून तिचा शोध करू लागला इतक्यांत एके ठिकाणी तिचा शव दृष्टि पडला. तो त्यानें उचलून आणून त्या सुनौसमीप ठेविला. ते मुनि सर्वोषधद्धिसंपन्न असल्यामुळे त्यांच्या अंगावरून वाहात येणाऱ्या वायुचा सर्श तिला होऊन ती तत्काळ सचेतन झालो. हे पाहून वज्जबुडीला फार आनंद झाला. भापल्या हातांतील तलवार तिच्या जवळ देऊन तिला मुनीसमीप बस- वून आपण कमले आणण्या करितो सरोवराकडे गेला.
पूर्वोक्त सात चौरापैकी एकटा सूरसेन नांवाचा सातवा चोर त्याच झाला, नंतर त्या सप्तबंधूंच्या स्त्रिया आपल्या पतींचे सर्ववृत्त कळल्या- धुळे त्या देखोल तेथील जिनदत्ता आर्थिकेजवळ दीक्षा घेत्या झाल्या. आणि स्थाहि उज्जयनीस आल्या. तेव्हां मंगीलाहि सर्व वृत्तांत कळल्याने तिने हा संसार निंध आहे असे जाणून आपल्या खोट्या चारित्राचो (मायाचारी वागणूकीची) निंदा करून गृह सोडून आर्थिकेचो दीक्षा घेतली,वरील सातही मुनीश्वर पहिल्या स्वर्गात एकसागर आयुष्य धारण करणारे त्रायखिशत जातीचे देव झाले. आयुष्यातीं तेथून च्यवून ते धातकी खंडांतील पहिल्या भरतक्षेत्रांत विजयार्थ पर्वताच्या दक्षिण श्रेणीवर नित्यविलोक नामक एक सुंदर नगर आहे. तेथे चित्रचूल नांवाचा एक राजा असून त्याला मनोरमा नांवाची राणी होती. तिच्या उदरी चित्रांगद, गरुडकांत, गरुडसेन, गरुडध्वज, गरुडवाइन, मणिचूल व हेमचूल असे सात पुत्र होऊन जन्मले. ते सातही पुत्र सर्व विद्येत निपुण होते. त्यांना कुमारावस्थेतच वैराग्य उत्पन्न होऊन ते मुनी झाले. मरणांतीं समाधिमरण साधून चौथ्या माहेंद्र स्वर्गामध्ये सातसागर आयुष्य धारण करणारे सामानिक जातीचे देव होऊन सुख भोगूं लागले. तेथून चित्रांगदचर देव च्यवून भरतक्षेत्रांतील कुरुजांगण देशांत हस्तिनापुरामध्ये श्वेतवाहन श्रेष्ठी व त्याची धर्मपत्नि बंधुमति यांच्या पोटीं शंख नांवाचा पुत्र होऊन जन्मला. बाकीचे सहा देव त्या स्वर्गातून च्यवून त्याच नगरींचा राजा गंगदेव त्यांची प्रियराणी नंद- यशा इच्या पोटीं गंग, गंगदत्त, गंगरक्षक, नंद, सुनंद नंदिषेण, या नांवाचे सहा पुत्र होऊन जन्मले. ते अतिशय सुंदर होते. ते सहाहि बंधु पुढे आपल्या युवावस्थेत त्या वैश्यपुत्र शंख यांच्यासह या संसारा- विषयी विरक्त होंऊन वनांत जाऊन एका निर्मथमुनीजवळ जिनदीक्षा घेते झाले, पुढे ते सर्वही निर्मल तपश्चर्या करून त्या पुण्याईनें सर्वार्थ- सिद्धीस गेले. तूं पूर्व जन्मीं नंदद्यशा होतीस. त्यावेळीं ते सात पुत्र माझ्या पोटी येऊन जन्मोत, असे निदान केल्यामुळे या जन्मांत ते सर्व तुझ्या उदरी येऊन जन्मणार आहेत. या करितां तू, सप्तयक्षीव्रत यथा- विधि पालन कर म्हणजे त्या योगार्ने पुढे येणारे संकट निवारण होईल. असे सर्व पूर्वीचे भवांतर सांगून त्या मुनींनीं व्रतविधिही सांगितला. मग ती त्या मुनीश्वराजवळ ते व्रत घेऊन घरी परत आली. नंतर पुढे काला- नुसार तिर्ने ते व्रत पालून त्यांचे उद्यापन केले.
या प्रमाणें ही कथा व पूर्वोक्त व्रतविधान ऐकून सर्वांना मोठा संतोष झाला.