व्रतविधि-ज्येष्ठ शु. १३ दिवशी या मतभारकांनी एकमुक्ति करावी, आणि १४ दिनी प्रभावो शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर हदधीतवर्षे धारण करात्रीत. सर्व पूजासामश्री हाती घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तोंने साष्टांग नमन करावें. पीठावर चंद्रनाथ तोर्वेकर प्रतिभा श्यामयक्ष व ज्वालामालिनी यक्षोसह स्थापून तिला पंचा मृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी, श्रुत व गणधर यांचो पूजा करून यश, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें, ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं चंद्रप्रभ तीर्थंकराय श्यामयक्षज्वाला- मालिनीयक्षीसहिताय नमः स्वाहा । या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. तसेंच ॐ ह्रीं अष्टांगयोगधारकसप्तर्द्धिसंपन्नगणधर देवोभ्यो नमः स्वाहा, या मंत्राने हो १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही मतकथा वाचावी, नंतर एका पात्रांत आठ पार्ने, अक्षतपुंज, पुष्पें, फलें आठ वाल्यांचे कणिकेचे दीप लावून एक नारळ ठेवून एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन मदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशी उपवास करावा. दुसरे दिनी पूजाभिषेक दान करून आपण पारणे करायें तीन दिवस नम्डचर्यपूर्वक धर्मध्यानांत फाल घालवावा.
बापमाणे आठ महिने पूजाकम करून शेवटीं उद्यापन करावे. त्यावेळी चंद्रनाथविधान महाभिषेकपूजेसह करून आठ प्रकारची नैवेथे दाखवून आठ मुनीश्वरांना आहारादि दाने द्यावीत. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
– कथा –
वासुपूज्य तीर्थकरांच्या तोर्थात (तीर्थकालांत) नरपती या नांवाचा राजा होऊन गेला. त्याने हे व्रत ग्रहण करून यथाविधि पालन केले. पुढे तो राजा दीक्षा घेऊन घोर तपश्चर्या करून समाधिविधिन मरण पावला. या व्रतपुण्यफलाने मध्य मैत्रेयकांत अहमिद्र होऊन जन्मला. तेथे सत्तावोस सागरोपम काळपर्यंत सुखावा अनुभव घेऊन अयुष्यांती तेथून च्यवून धर्मनाथ तीर्थकरांच्या कालीं या जंबू द्वोपांतील भरत क्षेत्रांत आर्य खंड असून त्यांत कौशल नांवाचा देश आहे. त्यामध्ये साकेता (अयोध्या) नामक नगरांत इक्ष्वाकु वंशांत सुमित्र नामक राजाच्या उदरीं मघव नामे पुत्र होऊन जन्मला. तेव्हां त्या राजाचे शरीर बेचाळोत धनुष्यें उंच असून सुत्रर्णापमाणे तेजस्वी होते. त्याचे परमायुष्य पांच लक्ष वर्षाचे होते. मधवराजा भरत व सगर चक्रवर्ती प्रमाणें ऐश्वर्याचा अनुभव घेत असे. एके दिवशीं उद्यान वनांत अमय- घोष केवली मुनीश्वरांचे दर्शन घेण्यासाठीं गेला होता. तेव्हां त्याच्या चरणीं भक्तीने साष्टांग नमस्कार केल्यानंतर कांहीं वेळ त्याने त्यांच्या मुखे धर्मोपदेश ऐकिला. त्यामुळे त्याच्या अंतःकरणांत दत्त्वार्थ श्रद्धान (सम्यग्दर्शन) उत्पन्न झालें. संसारासंबंधी दृढ वैराग्य आहे. मग नगरी परत येऊन आपल्या प्रियभित्र नामक पुत्रांस बोलावून आपला सर्व राज्यभार त्याने दिलें. नंतर पुनः त्या मुनीश्वरांच्या सन्निध जाऊन बाह्य व अभ्यंतर परिग्रहांचा त्याग करून त्यानें संयमभार घेतला. घोरतपश्चर्येच्या बळाने तो सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास गेला. असा या बताचा संक्षिप्त दृष्टांत आहे.