व्रतविधि – आषाढ शु. ८ दिवशीं या व्रतिकांनी सुखोष्ग बजानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्र धारण करावीत. सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा मालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर जिनेंद्र प्रतिमा यक्षबक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी अर्चना करून श्रुत व गणधर यांचो पूजा करावी. यक्ष, यक्षी, ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ही श्रीं क्लीं ऐं अर्ह अष्टोत्तरसहस्रनामसहितयक्षयश्क्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्रानें सुगंधित पुष्पे १०८ घालावीत. णमोकार मंत्राचा जप १०८ वेळां करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. या दिवशीं उपवास करावा.
दुसरे दिवशीं पूजा करून सत्पात्रास आहारदान देऊन आपण ताक, मात यांनी पारणा करावी. तिसन्या दिवशीं पूर्वोक्त क्रमाने पूजा करून उपवास करावा, मग दोन दिवस पारणा करावी. (दोन पारणा कराव्यात.) नंतर पुनः पूजाक्रम करून उपवास करावा. आणि तीन पारणा कराव्यात. मग पूर्वोक्त पूजाक्रन करून एक उपवास करावा आणि चार पारणा कराव्यात. याप्रमाणें एकोणीस १९ उपवास करावेत. म्हणजे १९० एकशे नव्वद पारणा होतात.
याप्रमाणें हें व्रत चौदा १४ वर्षे, तीन ३ महिने, वीस २० दिवस, पाळावे. शेवटीं अनंतनाथ तीर्थकराचे विधानपूर्वक महाभिषेक करावा. चौदा प्रकारचे चरु दाखवावेत. चौदा मुनीश्वरांना आहारादिदाने यावीत, ६च याचे उद्यापन होय. असे हे व्रत पूर्ण केले असतां एक तप होते, असा या प्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा –
जैवृद्धोपांतील पूर्वविदेह क्षेत्रांत महापुर नांवाचे एक सुंदर नगर आहे. तेथे पूर्वी धर्मसेन नांवाचा एक राजा राज्य करीत डोता. त्याला या क्षणिक संहाराविषयी वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे तो वनांत जाऊन एका मुनी समीप जिनदीक्षा ग्रहण करून तपश्चरण करूं लागला. तेव्हां त्यांने मुनि अवस्थेत हे आचाम्ळवर्धनव्रत विधिपूर्वक पालन केले होते, आयुष्यांतीं तो सन्यासविधीने देह विसर्जन करून आरण फल्गंत महद्धिक देव झाला. तेथे तो चिरकाल सुख मोगून आयु- व्यावसानी तेथून च्यवून येथे वनिवापुर नगरी इक्ष्वाकुवंशांत वीर्य नामक राजा व त्यांची पटली सहदेवी यांच्या कुर्शी सनत्कुमार नामें पुत्र झाला. पुढे तो तरुण होऊन पटखंडाचे साम्राज्य सुख अनुभवीत असतां, एके दिवशीं प्रीतिकर नांवाचे महामुनि चर्येनिमित्त सहसा राजवाड्यांत आले. तेव्हां राजा- राणीनीं विनयाने त्यांचे प्रतिग्रहण करून पाकशाळेत त्यांना नेलें. नवधाभक्तीने विधिपूर्वक त्यांना आहारदान दिले. मग आसनावर मुनी बसले असतां त्या सुनत्कुमार चक्रवर्ति राचे त्यांना त्रिनयाने दोन्ही हात जोडून म्हणाले, हे स्वामिन् ! आतां मला हे जे मोठे ऐश्वर्य प्राप्त झालें आहे; ते कोणत्या कारणाने ? हे त्यांचे नम्र भाषण ऐकून मुनी त्यांना म्हणाले – हे भव्योत्तम राजाधिराज ! तूं पूर्वी आपल्या तिसन्या भवांत आचाम्लवर्धन है व्रत पालन केले होते. त्याकारणानें आतां तुला या मवांत हे असले चक्रवर्ती पदाचे ऐश्वर्थ प्राप्त झाले आहे. आतां तूं पुनः हैं व्रत पालन कर म्हणजे तुला मोक्षसुख अवश्य प्राप्त होईल. असे म्हणून त्यांनीं त्या व्रताचा काल व विधि वगैरे सर्व सांगितला. ते ऐकून राजास मोठा आनंद झाला. मगत्यांनी त्यांना नमस्कार करून से व्रतः स्वीकारिले. नंतर मुनीश्चर वनांत निघून गेले.
पुढे ते सनत्कुमार चक्रवर्ती राजे या संसाराविषयीं विरक्त होऊन आपल्या देवकुमार नामक पुत्रास राज्यभार देऊन वनांत गेले. तेथे शिवगुप्त नामक केवली मुनिसमीप जिनदीक्षा घेऊन घोरतपश्चयो करूं लागले. आपलो प्रतिज्ञा पूर्ण केली. तपोबलाने ते सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास गेले.