व्रतविधि – आश्विन कृष्ण १२ दिनीं या व्रतिकांनीं एकभुक्ति करावी. १३ दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून नूनन धोतवाले अंगावर धारण करावीत. सर्व पूजा द्रच्ये हातों घेऊन मंदिरास बावे. जिनालयास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर विमलनाथ तीर्थकर प्रतिमा पाताळ यक्ष आणि वैरोटी यक्षीसइ स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभि- बेक करावा. एका पाटावर क्रमाने तेरा पार्ने मांडून त्यांवर अक्षता, फुले, फळे वगैरे ठेवून आदिनाथापासून विमलनाथापर्यंत १३ तीर्थकरांची अर्चना अष्टद्रव्यांनी करावी. श्रुत व गणधर याचो पूजा करून यक्ष, मक्षी व यांचे अर्चन करावे. क्षेत्रपालास तैलाभिषेक करून शेंदूर लावावा. त्यांच्या पुढें पांच पाने मांडून त्यांवर अक्षता, फुले फले ठेवून गंध, फुलांची माळ, वस्त्र, खोबण्याची वाटी व गूळ, लाडू वगैरे अर्पण केल्यावर-अष्टक, स्तोत्र, जयमाला क्रमाने म्हणून यथाविधि अर्चन करावें, तेलाच्या पांच पांच पोळ्यांचे पांच चरु दाखवावेत. नारळ फोडावा. त्यानंतर – ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अहे विमलनाथ तीर्थकराय पाताळयक्ष वैरोटीयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचात्रो, एका वाटांत तेरा पाने लावून त्यावर अष्टद्रव्ये एक नारळ ठेवून महार्ध करायें. त्याने ओवाळोत मंदिरास तीन प्रद क्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करून ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत फाल घालवावा. सत्पात्रांत आदारादि दाने द्यावीत. उपवास होत नसल्यास तोन वस्तूंचा नियम करून एकभुक्ति करात्री. याप्रमाणे १३ महिने त्याच तिथोस पूजाकन करून शेवटीं याचे उद्यापन करावे. त्यावेळीं विमलनाथ तीर्थकर विधान महाभिषेकासह करावे. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. अता या व्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या जंबूद्रोपांतीक भरत क्षेत्रामध्ये आर्थवड आहे. त्यांतील मालव देशांत उज्जयनी नामक एक रमणोय पट्टण आहे. तेथे पूर्वी गुणपाल नावाचा महादरिद्रो पण सदाचारी श्रेष्ठो रहात असे. त्याला गुणवती नांवाचो एक लावण्यत्रतो व सुशील अशो धर्मपत्ली होती. त्यांना गुणवंत नामें एक सुंदर, सद्गुणी पुत्र होता. यांना दुर्दैवामुळे दारियावस्था प्राप्त झाल्यामुळे ते कष्टाने काल घालवींत होते.
नगरांत वारंवार मुनीश्वर आहारासाठीं येत असत. त्यांना पुष्कळ श्रावक श्राविका मोठ्या भक्तीने आहारदान देत असत. हे पाहून त्या गुणपाल श्रेष्ठीच्या मनांत सुनोश्वरांस आहारदान देण्याची इच्छा होत असे. परंतु दान देण्याची शक्ति (ऐपत) नसल्यामुळे तो चिंताकुल होऊन रहात असे.
एके दिवशीं सोमचंद्र नांत्राचे सप्तऋद्धिसंपन्न असे एक निश्रथ मुनीश्वर जिनमंदिरांत आले होते. त्यांना पाहून तो गुणपाल श्रेष्ठी आपल्या स्त्रीस म्हणाला, हे प्रिये ! या नगरांतील पुष्कळ माविक श्रावक श्राविका मुनिमहाराजांना आहारदान देऊन अतुल पुण्य संचय करीत आहेत. यास्तव आपणहि आहारदान देऊन पुण्यसंचय करावा;
अशी माझी प्रबल इच्छा आहे. याविषयीं तुझे काय मत आहे ? तेव्हां ती त्यांना म्हणाली, – हे प्राणनाथ । “मुनीश्वरांना दान देण्याची जरी आग्ल्याजवळ शक्ति नाहीं, तथापि आम्ही एकेक दिवस उपवास करून उदरनिर्वाहाच्या साधनांतून आहारदान देऊं या. ” मग ते उम- यता त्या जिनमंदिरांत गेले. जिनेश्वरांस भक्तीने प्रणिपात करून त्या सोमचंद्र सुनोश्वरांना वंदना करून त्यांच्यासमीप जाऊन बसले, कांही वेळ त्यांच्यामुर्ख धर्मोपदेश ऐकल्यावर तो गुणपाल श्रेष्ठी आपले दोन्ही हात विनयाने नोडून त्यांना म्हणाले, हे दयानिधे स्वामिन् ! आम्ही दारि- यामुळे अत्यंत गांजलो आहोत. त्याच्या परिहाराकरितां एकादें व्रतवि- धान सांगावे. आपण चातुर्मासडि येथेच करावा. अशी आमची नम्र प्रार्थना आहे. हे त्याचे वचन ऐकून ते मुनिवर्य दयार्द्र बद्धीने म्हणाले, – हे भञ्योत्तमा ! तुम्ही मंगलत्रयोदशी है बत पालन करा. म्हणजे तुमचे दारिद्य दूर होऊन तुम्ही सर्वप्रकारे अवश्य सुखी व्हाल, वगैरे सांगून त्यांनी चातुर्मासास संमति दिली. मग तो दंपती त्या व्रताचा विधि विचारून ते व्रत ग्रहण करून त्यांना पुनः वंदना करून आपल्या घरी आली.
पुढे चातुर्मासात प्रारंभ झाला. मग तो गुणपाल श्रेष्ठी व त्याची धर्मपत्नि गुणवती हे उभयता एक दिवसाच्या अंतराने उपवास करूं लागले. उपवासाच्या दिवशी आहारदानाची तयारी करून त्या मुनी- श्वरांना आहारदान देऊ लागले.
याप्रमाणें चार महिने आहारदान देण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे चातुर्मासांत आहारदान देत असतां, – आश्विन कृ. १३ दिवशीं त्यांनीं आपले व्रतपूजाविधान करून त्या सोमचंद्र मुनीश्वरांना महामक्तीने आहारदान दिले त्यानंतर त्यांना पोंचविण्यासाठीं तो गुणपाल श्रेष्ठी त्यांच्या बरोबर उद्यानाकडे निघाला. तेव्हां ते मुनीश्वर त्यांना म्हणाले- हे भव्योत्तमा ! आतां आम्ही जातो. तुम्ही येथून घरी परत जा. तेव्हां तो म्हणाला, हे दयालु मुनित्रये ! आपले आज्ञेप्रमाणे मी घरी जातो. असे म्हणून नमस्कार करूं लागला. तोच त्यांनी त्याला ‘ सद्धर्मवृद्धिरस्तु’ असा आशिर्वाद देऊन त्यांच्या ओर्टीत एक दगड ‘ हा प्रसाद घ्या’ म्हणून घासला. तेव्हां तो दगड गुणपाल मोठ्या आदराने घेऊन आला. हा दगड गुरुप्रसादाने मिळाला असल्याने मला पूज्य आहे, असे म्हणून त्याने त्याची पूजा केली. इतक्यांत त्या श्रेष्ठीचा तो गुणवंत नांत्राचा कुपार आपल्या हातांन खुरर्षे घेऊन खेळत असतां ते खुरर्षे त्याच्या हातांतून निसटून त्या दगडावर पडले. तेव्हां ते खुरखें सुवर्णमय झाले. हे योग्यच आहे. कारण, हा दगड सप्तऋद्धि- संपन्न मुनीश्वरांच्या हस्ते मिळाला असल्याने त्यांत परिसाचा गुण कां असू नये ! व त्याच्या संपर्काने लोखंडाचे सोने कां होऊं नये ? अवश्य होणार ! असो. हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. ‘ हा दगड ब्रह्मज्ञानी मुनीश्वरांनी दिला असल्याने त्यांत परीस दगडाचा गुण आला आहे.’ अशी त्यांची मनाचो पूर्ण स्वात्री झाली. हो वार्ता नगरांउ हां ! हां ! म्हणतां चोहोंकडे पसरली. त्यामुळे नगरांतोल पुष्कळ लोक तेथे जमले. त्याची प्रत्यक्ष सर्व हकीगत यथार्थ जाणून लोकांना जैनधर्माचे महत्व दिसून आले. आणि त्या श्रेष्ठींचो सर्वांनीं प्रशंसा केली. तो दिवस आश्विन कृ. १३ चा असल्याने त्याला मंगलत्रयो- दशी (धनत्रयोदशी) असे लोक म्हणू लागले. तेव्हां पासून धनत्रयो- दशी नांत्र प्रचारांत आले आहे. असो. पुढे तो गुणपाल श्रेष्ठी मोठा श्रीमान् होऊन दान पूजादि क्रिया करीत आनंदाने काल घालवू लागला.
या प्रमाणे त्या श्रेष्ठीनें चातुर्मासासंबंधी घेतलेला नियम यथास्थित पार पडला. पुढे कालांतराने त्यांनीं है मंगलत्रयोदशीव्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केले. त्यायोगाने त्यांना सद्गति सौख्य प्राप्त झालें.