व्रतविधि- आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि अष्टान्हिक पर्भात शु. ८ दिवशीं या व्रतधारकांनीं शुचिजलाने अभ्यंग – स्नान करून अंगावर दृढभौतवर्षे धारण करावीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावे. ईषर्वापथशुद्धादि क्रिया करून जिनें- द्रास भक्तोनें साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर संभवनाथ तीर्थकर नंदीश्वर विवासह स्थानून त्यांचा पंचामृताभिषेक करावा. एका पाटात्रर तीन स्वस्तिकें ॐ ह्रीं सम्यग्दर्शनाय नमः ॐ ह्रीं सम्यग्ज्ञानाय नमः ॐ ह्रीं सम्यक्चारित्राय नमः ।। हे मंत्र म्हणत कमाने काढून स्वांवर पार्ने, अक्षता, फुडे, फड़े मांडून वृषभ, अजित, संभव या तीन सायकरांची अर्चना अष्टद्रव्यांनी करावी. नंतर नंदीश्वर पूजा करून श्रुत्त व गगधर आणि यक्ष, यक्षी, ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. नंतर ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं संभवनाथाय त्रिमुखयक्षु प्रज्ञप्तियक्षीवहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घाला- बींत, णमोकार मंत्राचा १०८ वेळा जप करावा. ही व्रतकथा वाचात्री, नंतर एक महाध्ये करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारतो करावी, त्यादिवशीं तीन वस्तूंनी एक भुक्ति करावी. ब्रम्हचर्षपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. याप्रमाणे नऊ अष्टमीच्या पूजा पूर्ण झाल्यावर शेवटी याचे उद्यापन करावे. त्यावेळीं संभवनाथ विधानपूर्वक महाभिषेक करावा. तीन मुनीश्वरांना आहारादि दाने बाबींत. नंतर आर्यिका, श्रावक, श्राविकांनाहि दाने द्यावीत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या व्रताचा दृष्टांत म्हणजे पूर्वी है व्रत भानुदत्त नामक श्रेष्ठीने विधिपूर्वक केले म्हणून त्याला चारुदत्त नांवाचा पुत्र झाला. तो पुष्कळ दिवस संसारमुख भोगून स्वर्गास जाऊन क्रमाने मोक्षास गेला. असा दृष्टांत आहे.