व्रतविधि – आषाढ शु. १३ दिवशीं या व्रतिकांनी मातःकाळीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वस्ने धारण करा- वीत. सर्व पूजाद्रव्ये हाती घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन पदक्षिणा घावन ईर्यापथशुद्धि वगैरे किया कराव्यात. जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करून पीठावर विमलनाथ तीर्थकर प्रतिमा पाताळ यक्ष व वैरोटी यक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांचो पूजा करून यक्ष, यक्षो व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं विमलनाथ तीर्थंकराय पाताळयक्ष वैरोटीयक्षीसहिताय नमः स्वाहा । या मंत्राने १०८ सुगंधी पुष्ये घालावींत णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत महार्घ्य करून स्थाने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगला- रतो करावी, यथाशक्ति उपवासादिक करावे. सत्पात्रांस आहारादि दानें बावीत. ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा.
याप्रमाणे तेरा त्रयोदशी तिथीस पूजाक्रम करून शेवटीं याचे उद्यापन करावें. त्यावेळीं विमलनाथ तीर्थकर विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दानें द्यावींत. असा याचा पूर्णविधि आहे.