व्रतविधिः- पौषमासांत पहिल्या शुक्रवारी या व्रतिकांनी प्रातः काळीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगांवर दृढधीत वखे धारण करावीत. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यायपथशुद्धिपूर्वक जिनेद्रास मक्तोनें साष्टांग नमस्कार करावा, नंदादीप लावावा. पोठावर ‘पार्श्वनाथतीर्थंकर प्रतिमा धरणेद्रयक्ष व पद्मावती यक्षोसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षो व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावे. चरु अर्पण करावेत. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं पार्श्र्वनाथतीर्थंकराय धरणेद्रयक्ष पद्मावतीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा बाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्यांत नारळ ठेवून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रर्दाक्षणा घालून मंगलारती करावी. यथाशक्ति उपवास करावा. ब्रह्मचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहार- दान द्यावें.
या प्रमाणें आठ शुक्रवारी पूजा करून नवव्या शुक्रवारी याचे उद्यापन करावं. त्यावेळीं पार्श्वनाथविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघात चतुर्विध दाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
हे व्रत पूर्वी धर्मराजादि पांच पांडवांनीं बदरीवनामध्ये करून त्याचें उद्यापन केले. विद्याधरांकडून पूजनीय झाले. पुढे हे संसारसुख अनुभवून जिनदीक्षा घेऊन स्वर्गास गेले व क्रमाने मोक्षसुखहि अनुभवू लागले, असा दृष्टांत आहे. श्रेणिक राजा व चलनादेवी यांची कथा येथे घ्यावी.