व्रतविधि – ज्येष्ठ शु. १ दिवशीं या व्रत ग्राहकांनीं प्रातःकाळीं शुद्ध जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर पवित्र दृढ धौतवस्ने धारण करावींत सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईयापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास सक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. मंडप श्रृंगार करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा व श्रुतस्कंधयंत्र, यक्ष, यक्षो यांना स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी. द्वादशांग श्रुतदेवी व गणधर यांची पूजा करून यक्ष, यन्नी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं ह्र: अर्हं असिआउसा अनाहतविद्यायै नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत. तत्त्वार्थसूत्राचा पाठ म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळा जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्थ्य करून त्याने ओवाळींत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. शक्तीप्रमाणे उपवासादिक करावे. ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दानें द्यावीत.
याप्रमाणें चार दिवत्त (१ ते ४ पर्यंत) पूजाक्रम करून पांचव्या दिवशीं (ज्येष्ठ शु. ५ दिवशी) श्रुत भांडारांतील सर्व शास्त्रे स्वच्छ करून नूतन वस्त्र प्रावरण घालावें. देवापुढे शुद्ध भूमीवर पंच- वर्णांनी श्रुतस्कंध यंत्रदळ काढून सभोवतीं चतुरस्र पंचमंडले काढावीत. श्रुतस्कंधाराधना करावो. त्यादिवशी उपवास करावा. षष्ठीदिनीं मुनि व आर्थिका बांना आहार दान द्यावें श्रावक श्राविकांना मोजन करवून त्यांचा सन्मान करावा, अप्ता या व्रताचा पूर्णविधि आहे.